युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही जगातील कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यासाठी चिकाटी जिद्द तर हवीच, पण उत्तम कोचिंग, मार्गदर्शनही मिळालं पाहिजे असाच सर्वसामान्य समज आहे. इतकं सगळं असेल तर अविरत मेहनतीच्या जोरावर अगदी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असते. त्यातही युपीएससी नुसतं उत्तीर्ण होण्यापेक्षा रँकिंग मिळवण्यावर भर असतो. तरच आयपीएस किंवा आयएएसचं स्वप्नं पूर्ण होतं. पण कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासेसला न जाता केवळ स्वत: अभ्यास करून पहिल्याच फटक्यात युपीएससी उत्तीर्ण होणं तस अवघडच. त्यातही वरचा रँक मिळवूनही आयएएस किंवा आयपीएसला न जाता देशाची सेवा करण्यासाठी आयएफएसचा (IFS) पर्याय निवडणं हे तर अगदी आश्चर्यकारकच म्हणावं लागेल. पण आपल्या स्वत:च्या अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होण्याची किमया करून दाखवली आहे विदुषी सिंह हिनं. इतकंच नाही तर युपीएससीत देशात तिला १३ वा रँक मिळूनही केवळ आजीआजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून तिनं IFS चा पर्याय निवडला.

राजस्थानमधल्या जोधपूरच्या विदुषीची ही यशोगाथा प्रेरणादायी अशीच आहे. विदुषीचं कुटुंब मूळचं अयोध्येतलं. विदुषी केवळ २१ वर्षांची आहे. वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा इतक्या वरच्या रँकनं उत्तीर्ण होण्याचा विक्रम विदुषीनं केला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून तिनं अर्थशास्त्र या विषयात बीए ऑनर्सची पदवी मिळवली. त्यानंतर तिनं युपीएससीची तयारी सुरू केली. खरं तर युपीएससीसाठी स्वत:च्या अभ्यासाबरोबरच कोचिंगही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण विदुषीचा स्वत:वर आणि स्वत:च्या अभ्यासावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे तिनं कॉलेजमध्ये असतानाच स्पर्धा परीक्षांचीही तयारी सुरू केली होती. कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासेसला जाण्याऐवजी स्वअभ्यासावर तिनं भर दिला.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Vulgar Dance in Mangesh Kudalkar Election Campaign
Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप

हेही वाचा – अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही जन्मनोंदणीचा हक्क

युपीएससी परीक्षेत अभ्यासाचा पाया मजबूत असणं गरजेचं असतं. त्यामुळेच एकदा स्पर्धा परीक्षा द्यायच्या असं ठरवल्यावर कॉलेजमध्ये असतानाच विदुषीनं अगदी एनसीआरटीची शालेय पुस्तकंही पूर्ण आणि पुन्हा पुन्हा वाचून काढली. त्याशिवाय अन्य काही आवश्यक पुस्तकांच्या अभ्यासावर तिनं भर दिला. अर्थशास्त्र हा तिचा ऑप्शनल विषय होता. झालेल्या अभ्यासाच्या जोरावर तिनं जून २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात भरपूर टेस्ट सिरीज आणि मॉक परीक्षा दिल्या. तिला २०२२ च्या युपीएससी परीक्षेत मुलाखतीच्या फेरीत मिळालेल्या १८४ गुणांसह एकूण १०३९ गुण मिळाले होते.

तिला युपीएससीत १३ वी रँक मिळाली. खरंतर या रँकसह तिला IAS किंवा IPS पद सहज मिळालं असतं. पण विदुषीनं IFS चा पर्याय निवडला. त्यामागे एक भावनिक कारण आहे. विदुषीनं भारतीय विदेश सेवेत सहभागी होऊन विदेशात राहून देशसेवा करावी, तिनं भारताचं राजदूत किंवा परराष्ट्र अधिकारी बनावं असं तिच्या आजीआजोबांचं स्वप्नं होतं. त्यांचं हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी म्हणूनच इतकी वरची रँकिंग मिळूनही विदुषीनं परराष्ट्र सेवेचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे तर विदुषीचं जास्त कौतुक होत आहे.

हेही वाचा – वैवाहिक नात्यातही गोपनीयता महत्त्वाची!

कोचिंग क्लासेसमुळे मार्गदर्शन नक्की मिळतं. पण युपीएससीसारख्या परीक्षेत महत्त्वाचा असतो तो विद्यार्थ्यांचा सेल्फ स्टडी. त्याचं सखोल आणि नीट नियोजन केलं तर कोचिंग क्लासेसची गरज भासत नाही असं विदुषीचं म्हणणं आहे. एनसीआरटीच्या इयत्ता ६ वी ते १२ वीच्या इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकांचा तिनं अगदी नीट अभ्यास केला. आणि आपल्या अभ्यासाच्या नियोजनावर तिनं भरपूर सराव परीक्षा दिल्या. त्यामुळे परीक्षेमध्ये नेमकी आणि अचूक उत्तरे कशी लिहावीत हे तिला लक्षात आलं. तुमची उत्तरं लिहिण्याची शैली एकदा नक्की झाली की मग परीक्षेतल्या अनेक गोष्टी सोप्या होतात असं विदुषीला वाटतं. त्यासाठीच तिनं पेपर सोडवण्याचा भरपूर सराव केला. परीक्षेतली विशेष गोष्ट म्हणजे, विदुषी मूळची अयोध्येची असल्यानं तिला मुलाखतीच्या फेरीत अनेक प्रश्न अयोध्येबद्दल विचारण्यात आले होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थ्यांचा कस लागतो. प्रचंड आणि अविरत मेहनत, सातत्य हे अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचं गमक असतं. पण स्वत:वर विश्वास आणि स्वत: केलेला अभ्यास हे सगळं महत्त्वाचं असतं, हे विदुषीनं दाखवून दिलं आहे. स्पर्धा परीक्षेत पहिल्याच फटक्यात यशस्वी होण्याचं गाजर दाखवणारे अनेक महागडे कोचिंग क्लासेस आहेत. पण विदुषीनं मूलभूत अभ्यासावर भर देत स्वअभ्यास हाच यशाचा मार्ग असतो हे दाखवून दिलं आहे.