आराधना जोशी

How to Reduce Children’s Screen Time : अन्न, वस्त्र आणि निवारा या पूर्वीच्या तीन जीवनावश्यक गोष्टींमध्ये हल्ली इंटरनेट, स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया यांचा समावेश झाला आहे. कोविडच्या काळात ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे सगळ्यांच्याच हातात स्वतःचे स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप आले आणि मुलांच्या वाढत्या ‘स्क्रीन टाइम’बद्दल पालक काळजीत पडले. आजही हा प्रश्न सुटलेला नाही.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

‘स्क्रीन टाइम’ म्हणजे फोन, लॅपटॉप, टॅब, टीव्ही यांच्या मदतीने घालवलेला एकूण वेळ. आजची तरुण पिढी इंटरनेट, स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया या तीन डिजिटल डाएटवरच मोठी होत आहे. तो त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. पालकांना मात्र मानसिक पातळीवर ही गोष्ट समजून घेणं किंवा पचनी पाडून घेणं जमत नाही, मुलांच्या आयुष्यात आलेलं हे आभासी जग त्यांना फारसं आवडलेलं नाही. अर्थात, मुलांच्या स्क्रीन टाइमबाबत सजग असणारे पालक स्वतःच्या स्क्रीन टाइमबद्दल फार जागरूक नाहीत. इंटरनेट वापराबाबतची बंधनं पालकांनाच जिथे आवडत नाहीत तिथे मुलांनी ती पाळावीत, ही अपेक्षाच चुकीची ठरते.
स्मार्ट फोन वापराबाबत अनेकदा मुलं आपल्या पालकांचंच अनुकरण करताना दिसतात. पालकांच्या स्मार्ट फोन वापराबद्दलच्या सवयींचा मुलांवर परिणाम होत असतो. म्हणूनच मुलांच्या स्क्रीन टाइमबद्दल काळजी वाटणाऱ्या पालकांनी काही गोष्टींचा स्वीकार करणं गरजेचं आहे –

हेही वाचा >> परीक्षा, गुण यापलीकडेही आहे जग! पालकांनी मुलांना ‘या’ गोष्टी शिकत स्वत:त करा ‘हे’ बदल

  • फोन वापराबद्दलचे नियम फक्त मुलांपुरतेच मर्यादित नकोत. पालकांनी स्वतःही ते नियम पाळावेत.
  • आपण फोन वापरतो तो कामासाठी आणि मुलं मात्र टाइमपास म्हणून वापरतात, ही मानसिकता बदलायला हवी.
  • कामाव्यतिरिक्त आपण स्वतः सोशल मीडियावर किती वेळ अॅक्टिव्ह असतो, याचा आधी पालकांनी विचार करावा.
  • या आधुनिक तंत्रज्ञानाला शत्रू न मानता मित्र कसं मानता येईल? त्यासाठी स्मार्ट फोनचा ‘स्मार्ट’ बनून कसा उपयोग करून घ्यायचा, याचं पालकांनी मुलांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.

हे मुद्दे विचारात घेतल्यानंतर मगच मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा करता येईल, याचा विचार मुलांबरोबर बसून, त्यांच्याशी चर्चा करून मगच घेण्यात यावा. त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घेतले जावेत –

  • लहान वयात स्वत:चा स्मार्ट फोन वापरायला मिळणं म्हणजे एक विशेष अधिकार मिळाल्यासारखं आहे. अधिकाराबरोबरच जबाबदारीही येते, याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी. फोनचा वापर नेमका कसा करायचा? याची कल्पना मुलांना दिली पाहिजे.
  • दिवसभरात घरातील सगळ्यांचाच स्क्रीन टाइम किती असावा? मनोरंजनासाठी किती वेळ राखीव असावा? याची चर्चा घरातल्या सगळ्यांनी एकत्रितपणे करून त्याबाबत निर्णय घेतला जावा.
  • स्क्रीन टाइम मॅनेजमेंट करताना हळूहळू, ‘एकावेळी एक उद्दीष्ट’ अशाप्रकारे असावं. एक ध्येय पूर्ण केल्यावर मग पुढचं ध्येय ठरवावं. यामुळे यश नक्की मिळतं.
  • घरात ‘नो स्क्रीन झोन’ तयार करता येतील. म्हणजे अशा काही जागा जिथे कोणीही फोन वापरणार नाही. उदा. जेवायला बसताना, गप्पा मारताना, बाथरूममध्ये. किंवा दिवसातलं किमान एका जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन, गप्पा मारत पूर्ण करायचं असा नियम करता येईल.
  • महिन्यातून एकदा किंवा दोनदा ‘नो स्क्रीन डे’ किंवा ‘डिजिटल डिटॉक्स डे’ पाळा. या दिवशी घरातील सगळ्यांनी ठरवून स्क्रीनपासून (अगदी टीव्हीचाही स्क्रीन) दूर राहायचे. मात्र, संपूर्ण दिवस घरातील सगळ्यांनी काहीना काही ॲक्टिव्हिटीज करणं आणि स्वत:ला एंगेज ठेवणं, महत्त्वाचं असेल.
  • सायबर बुलिंग, सायबर गुन्हे म्हणजे काय याची मुलांना समजेल अशा पद्धतीने माहिती द्या. जेणेकरून आपली मुलं यात अडकणार नाहीत किंवा अनोळखी लोकांकडून टार्गेट होणार नाहीत.
  • छंद जोपासा. स्क्रीन टाइम व्यतिरिक्त उरलेला वेळ छंदासाठी दिला तरी तो आनंद देणारा असतो, याची जाणीव मुलांना करून द्या. आनंद, दु:ख, राग, लोभ किंवा इतर कोणत्याही भावनिक गरजांसाठी आभासी जग नाही तर पालकच उपयोगी पडतात, याची खात्री मुलांना करून द्या. तसं झालं तर वारंवार सोशल मीडियावर व्यक्त होण्याची मुलांची सवय कमी होऊ शकते.
  • झोपेच्या वेळेशी सोशल मीडियासाठी केली जाणारी तडजोड अत्यंत हानीकारक आहे. ही सवय दीर्घकाळ राहिली तर, त्याचे आरोग्यावर दिसणारे दुष्परिणाम भयानक आहेत. म्हणूनच रात्री ठराविक वेळेनंतर घरातील सगळ्यांचेच फोन बंद व्हावेत यासाठी नियम बनवा आणि त्याचं काटेकोरपणे पालन करा.
  • चांगला स्क्रीन टाइम आणि वाईट स्क्रीन टाइम यातला फरक मुलांना समजावून सांगा. मुलांच्या हातातल्या फोनचा वापर चांगल्या कारणांसाठी होतोय की वाईट यावर पालक म्हणून मुलांच्या नकळतपणे लक्ष असणं आवश्यक आहे.
  • स्क्रीन टाइम मॅनेजमेंट ही एका रात्रीत घडून येणारी गोष्ट नाही. त्यासाठी पालकांनी पेशन्स ठेवणं, सातत्याने प्रयत्न करणं, मुलांसाठी नवनवीन ॲक्टिव्हिटीज शोधणं जेणेकरून ते मोबाईल किंवा इतर स्क्रीनपासून दूर राहतील, अशा गोष्टींची गरज आहे. शिवाय, हे फक्त मुलांपुरतंच मर्यादित न ठेवता आपणही अमलात आणायला काही हरकत नसावी.