डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“ मॅडम, मी आत येऊ का? रेवतींने आदबीनं विचारलं.

99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर

रमा मॅडम कामात होत्या, हेड ऑफिसला आजच रिपोर्ट पाठवणं महत्वाचं होतं. वारंवार फोन येत होते, त्यातच बॅलन्स शीट टॅली होत नव्हती. दोन क्लार्क सुट्टीवर असल्याने रमा मॅडमना स्वतःच बसून सर्व करावं लागणार होतं. त्या वैतागल्या होत्या, पण रेवतीं महत्वाच्या कामाशिवाय मध्येच अशी येणार नाही हे त्यांना माहीत होतं, त्यांनी तिला आत बोलावलं.

“ रेवतीं, मला काही रिपोर्ट अर्जंट पाठवायचे आहेत, तुझं जे काम आहे ते पटकन सांग. या बँकेत स्टाफला काही शिस्तच राहिलेली नाही. अचानक फोन करून सुट्टी घेतल्याचं कळवतात. जबाबदारीचं भानच नाही. काम करता करता रमा मॅडमची बडबड चालू होती. आता जो विषय आपण बोलायला आलो आहोत त्याची ही योग्य वेळ नाही हे रेवतीच्या लक्षात आलं ती म्हणाली, “ मॅडम, मी तुम्हांला मदत करते.” असं म्हणून तिनं कॉम्प्युटरचा ताबा घेतला, बॅलन्स शीटमध्ये नक्की काय चुकलंय हे तिच्या लक्षात आलं. तिनं पटकन दुरुस्ती करून रिपोर्टही तयार केला आणि मॅडमना विचारून पाठवला सुद्धा. रमा मॅडमनी हेड ऑफिसला फोन करून मेल सेंड केल्याचं सांगितलं आणि त्यांना हुश्श्य वाटलं. ग्लासभर पाणी त्या गटागटा प्यायल्या आणि रेवतीला म्हणाल्या,

“ धन्यवाद रेवती, तू मदत केल्यामुळं रिपोर्ट वेळेवर पाठवता आला. माझं टेन्शन कमी केलंस तू. खरंच थॅंक्यु. हो, पण या सगळ्या गडबडीत तू कशासाठी आली होतीस हे सांगितलंच नाहीस. काय काम होतं तुझं ?”

हेही वाचा >>>खासगी अभयारण्य उभारणाऱ्या त्या दोघी

रमा मॅडमचा मूड आता चांगला आहे हे पाहून रेवतीनं बोलायला सुरुवात केली, “ मॅडम मला पर्सनल लोन हवं होतं. ”

“रेवतीं, अगं, तुझं होमलोन चालू आहेच, मग आता पर्सनल लोनं कशासाठी? काही अडचण आहे का? मोकळेपणानं बोल बरं माझ्याशी.”

“ मॅडम, सईला डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, फायनल राउंडमध्ये तिला हवं ते कॉलेज मिळालं नाही, म्हणून मॅनेजमेन्ट कोट्यातून तिला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. त्या कॉलेजमध्येच जायचंय म्हणून हट्ट धरून बसली आहे.”

रेवतीनं सईची प्रवेशप्रक्रिया, तिला मिळालेले मार्क्स आणि विशिष्ट कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा असेल तर देणगी स्वरूपात द्यावी लागणारी रक्कम इत्यादी बाबतची सर्व माहिती त्यांना तपशीलवार दिली. थोडक्यात, आपल्या लेकींला तिच्या आवडीचं कॉलेज मिळावं म्हणून डोनेशन देण्यासाठी रेवतीला कर्ज हवं होतं.रेवतीं आणि सुरजनं लहानपणापासून सईचे सर्व लाड पुरवले होते. एकुलती एक मुलगी असल्याने तिचा प्रत्येक शब्द त्यांनी झेलला होता. करोनाच्या काळात सुरजचा बिझनेस ढासळला होत्या, त्यातच सासू सासऱ्यांच्या आजारपणासाठी सर्व गुंतवणूक खर्ची झाली. नवीन घर घेतलं त्याच्या कर्जाचे हप्ते चालू झाले होते. इतकी आर्थिक अडचण असताना केवळ लेकीच्या हट्टासाठी कर्ज काढावं हे रमा मॅडमना पटलं नव्हतं. या बाबतीत तिच्याशी बोलणं गरजेचं होतं.

हेही वाचा >>>हिजाब न घालता बुद्धिबळ खेळणारी सारा खादेम कोण आहे ? स्पेनने सारा खादेमला का दिले नागरिकत्व ?

“ रेवतीं, तुझं इतर कोणतंही महत्वाचं कारण असतं तर तुझ पर्सनल लोन मी लगेच मंजूर केलं असतं, पण डोनेशन देण्यासाठी तू कर्ज का काढते आहेस? या वयात लेकीचे सगळे लाड पुरवणं योग्य नाही. सुरजच्या आणि तुझ्या कष्टाची आणि समर्पणाची किंमत तिला आहे का? याचाही विचार कर. मुळात तिला एखादं विशिष्ट कॉलेज हवं असेल तर तिने तेवढा अभ्यास करायला हवा. ती तिची जबाबदारी आहे.”

“ मॅडम, मी आणि सूरज आमचं कर्तव्य पूर्ण करत आहोत. सुरज म्हणतो, ‘आपण कष्ट करतो, कमवतो ते कोणासाठी? आपल्या मुलाबाळांसाठीच ना? मग एकुलती एक लेक आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे आपण केलं तर कुठे बिघडलं?’ आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीत आम्ही तिला काहीही कमी केलं नाही. यामध्ये आमचं काही चुकतंय का? रेवतीं स्वतःची भूमिका स्पष्ट करीत होती. तिचा आणि सुरजचा प्रयत्न प्रामाणिक असला तरी यामुळं मुलीच्या वागण्यात बदल होत आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.

हेही वाचा >>>सिक्किमध्ये १ वर्षाची प्रसूती रजा, पण वैद्यकीयदृष्ट्या किती महिने सुट्टी हवी? तज्ज्ञ सांगतात…

“ खरं सांगू का रेवतीं तुला? तुझं चुकतंय. तुला आणि सुरजला तुमच्या वागण्यात बदल करायला हवा. आम्ही किती चांगले पालक आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात, मुलीवर या वागण्याचा नक्की काय परिणाम होत आहे, याचा विचार तुम्ही केला नाही, त्यामुळं ती हट्टी बनत चालली आहे. जे मागेल ते आपल्याला मिळतंय, हे तिच्या आता लक्षात आलेलं आहे, तुझ्या कष्टाची तिला जाणीव नाही. आई वडील आपल्यासाठी सर्व करतात याबाबत तिला काहीच वाटत नाही. उद्या तुम्हाला ती तेच बोलणार आहे,‘तुम्ही तुमचं कर्तव्य केलंत,’ पण हे कर्तव्य पार पाडत असताना तुम्हाला कोणत्या दिव्यातून जावं लागलं, लागतंय याची तिला जाणीव आहे का? रेवती, आयुष्यात पुढं जाण्यासाठी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरीही आपल्याला पुढं जाता यायला पाहिजे, हे तिनं आता शिकायला हवं. तिला नकारही पचवता आले पाहिजेत. मुलांना नकार पचवता आले नाहीत तर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात किंवा दुसऱ्याची हत्या करतात, ही उदाहरणे आपण सध्या वर्तमानपत्रात नेहमी वाचतो आहोत. त्यामुळं सजग राहाणं गरजेचं आहे. तुमच्या अडचणी तिनं समजून घेतल्या पाहिजेत. आता या वयात तुम्ही तिला हे शिकवलंत, तरच तिच्यावर खरे संस्कार होणार आहेत. मुलांना हवं ते दिलं म्हणजेच आपलं त्यांच्यावर प्रेम असतं असं नाही. पुढच्या आयुष्यात जगण्यासाठी, समाजातील बऱ्या वाईट गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तिला सक्षम बनवायला हवं. कोणत्या कॉलेजमध्ये आपण शिकतोय यावरून आपलं स्टेटस ठरत नाही. उलट आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपण कसा करतो हे अधिक महत्वाचं असतं, हे तिला समजावून सांगा. सईनं तिच्या मेरिटनुसार मिळालेल्या कॉलेजमध्ये शिकायला हवं. याबाबत तुम्ही दोघंही आग्रही राहा, ते तुमच्यासाठी आणि जास्त तिच्यासाठी महत्वाचं आहे. मी काय सांगतेय ते पटतंय ना तुला?

बराच वेळ रमा मॅडम तिच्याशी बोलत होत्या. तिला त्यांच्यासारखं समजून सांगणारं जवळचं असं कोणी नव्हतं. त्यामुळं आज तिनं त्यांच्यासमोर मनसोक्त रडून घेतलं. त्यांचं म्हणणं तिला पटलं होतं.

“मॅडम, मी आणि सूरज मुलीवर आंधळं प्रेम करत होतो, एकुलत्या एक मुलीला सर्व सुखं द्यायची असं आम्ही ठरवलं, त्यामुळं आम्ही तिला कधीही दुखावलं नाही. सतत तिच्या म्हणण्यानुसार वागत राहिलो. पण आता माझे डोळे उघडले आहेत. मी माझ्या वागण्यात बदल करेन. सुरजलाही हे समजावून सांगेन आणि आयुष्यात तिनं खऱ्या अर्थानं यशस्वी व्हावं असा प्रयत्न करेन.” रेवती ठामपणे म्हणाली.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)

smitajoshi606@gmail.com

Story img Loader