डिस्प्लेला लावलेला तो गडद लाल रंगाचा नाजूक सोनेरी नक्षी असलेला पंजाबी ड्रेस तिने पुन्हा एकदा टक लावून पाहून घेतला आणि हातातल्या त्या भल्यामोठ्या मॉपने आधीच चकाकदार आणि गुळगुळीत असलेली समोरची फरशी अजून एकदा पुसली. संध्याकाळचे चार वाजले होते. तिने समोरच्या त्या ऑटोमॅटिक दरवाज्याकडे पाहिले. दिवाळी सुरु व्हाय़ला आठवडा उरला होता त्य़ामुळे लोकांची खरेदीची लगबग वाढली होती आणि आज तर दिवाळीच्या आधीचा रविवार होता. ती काम करत असलेला मॉल तर शहराच्या मध्यवर्ती भागातच होता, त्यामुळे दुपारपासूनच तिथे लोकांची रीघ लागायला सुरुवात झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : करून पाहा: प्रांतोप्रांतीचा आगळावेगळा फराळ!

मॉलसुद्धा अगदी सजला होता. रंगीबेरंगी कपडे, दिवाळीच्या खाद्यपदार्थांची दुकानं, इलेक्ट्रॉनिक्स, घरसजावटीच्या वस्तू अशा सगळ्या गोष्टींची अगदी रेलचेल होती. येणारी लोकंसुद्धा अगदी भरभरुन खरेदी करत होते. पिशव्यांच्या पिशव्या उचलून आपल्या गाड्यांमध्ये भरुन रवाना होत होते. आज तिची ड्यूटी लागली होती मॉलच्या शेवटच्या मजल्यावर असलेल्या फूडमॉलमध्ये. कित्येक तासांची शॉपिंग करुन जेव्हा दमायला होत होतं तेव्हा बहुतेक लोक क्षुधाशांती करायला या फुडमॉलचाच आसरा घेत होते. आज दुप्पट काम असणार याची तिला चांगलीच कल्पना होती. ती त्याच तयारीत फुडमॉलच्या एका कोपऱ्यात उभी राहिली. एखादं टेबल रिकामं झालं की त्यावरचं उष्टं खरकटं उचलायचं, ते स्वच्छ पुसायचं अन् नंतर येणाऱ्या लोकांसाठी तयार करायचं.

आणखी वाचा : यंदा दिवाळीत काढा, अशी रांगोळी!

बाजूला उभी राहून कुतूहलाने सगळं न्याहाळत होती. रोजचं असलं तरी आज त्याला खास ‘दिवाळी टच’ होता. लोकं आनंदी होती, खूश होती. सणाचं तेज सगळ्यांच्या चेह-यावर झळाळत होतं. बघता बघता फूडमॉलची ती जागा केव्हाच लोकांनी भरुन गेली. गलका, हशा, हसू, आरडाओरडा या सगळ्यात फूडमॉल केव्हाच विरघळून गेला होता.

आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार

“ए, शुक शुक, इधर आओ.” दटावणीच्या या सुराने तिची तंद्री भंग पावली. ती लगबगीने त्या आवाजाच्या दिशेने गेली. “इसको जरा साफ करना जल्दी.” समोरच्या टेबलकडे बोट दाखवून एका ५० वर्षीय माणसाने त्याच्या घोगऱ्या आवाजात तिला जवळपास हुकूमच दिला. तिने मुकाट्याने ते टेबल साफ केलं. जणू काही मशिननेच टेबल साफ केल्याच्या आविर्भावात त्या माणसाने तिच्याकडे साफ दुर्लक्ष करत त्याच्या समोरची खुर्ची ओढली आणि तिथे बसून तो मोबाईलमध्ये गुंग झाला. “थॅंक्यू हा.” ती पाठमोरी वळली तसा एक दबका पण गोड आवाज तिच्या दिशेने आला. त्या माणसाच्या बरोबर साधारण त्याच्याच वयाची असणारी, त्याची बायको आहे असं वाटणारी बाई त्याच्या बाजूला बसली आणि तिला ऐकू जाईल अशा आवाजात तिचे आभार मानले. ती नुसतंस हसली. त्या माणसाचा घोगरा आवाज तसाच चढा होता अन् त्यात कुठेतरी तो दबका आवाज हळूच मिसळत होता.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

लोक येत होते, खात होते आणि जात होते. काहीजण सगळंच्या सगळं अन्न तसंच टेबलावर टाकून निघून जात होते. ती जेव्हा नवीन होती तेव्हा या गोष्टीचं तिला फार वाईट वाटायचं आता मात्र तिला याने काहीही फरक पडेनासा झाला होता. त्रासाची पण सवय होतेच की. ती सगळ्या टेबलांवर नजर टाकत होती. लोक खरेदीच्या बॅगांवर बॅगा घेऊन बसले होते. काहीजण अजून काय काय घ्यायचं याच्यावर चर्चा करत होते. तिला गंमतच वाटली त्याची. तिने मनाशीच म्हटलं की हा त्रास आपल्याला नाही. मिळणाऱ्या पैशांतून मुळात इनमिन तीनच गोष्टी घेता येतील. बरंय तेच. जास्त पर्यायच नाहीत आणि त्यानंतर या अशा डोकेफिरु चर्चासुद्धा नाहीत. स्वतःशीच हसत तिने समोरचं टेबल सराईतपणे स्वच्छ केलं आणि मोर्चा पुढच्या टेबलकडे वळवला.

आणखी वाचा : मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा

त्यादिवशी घरी जाईपर्यंत रात्र झाली तिला. आता पुढचे काही दिवस हे असंच चालणार होतं. जाताना फक्त तिची नजर तो लाल रंगाचा ड्रेस शोधत होती. तो आता डिस्प्लेला नव्हता. कोणीतरी विकत घेतला असावा. आपली दिवाळी ही अशीच असते, असं मनाशी म्हणत ती मार्गस्थ झाली…