केतकी जोशी

नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे अनेक जणांसाठी धमाकेदार पार्टी असते. हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स, समुद्रकिनारे अशा सगळीकडे मस्त सेलिब्रेशनचा मूड असतो. अर्थातच अनेक ‘चतुरां’चेही पार्टीचे प्लॅन्स ठरले असतील. जवळचे मित्रमैत्रीणी, आवडीचं संगीत आणि मस्त आवडतं खाणं… बस्स! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणखी काय पाहिजे? पण सगळ्यांना अशा पार्ट्यांना जायला जमतंच असं नाही. विशेषत: मुलं लहान असतील किंवा घरात जास्त लोकांची जबाबदारी असेल किंवा ऑफिसला सुट्टी नसल्यानं भरपूर काम असेल, तर पार्टी कदाचित शक्य होणार नाही. आपल्यापैकी काहीजणींनाही यंदा बाहेर जाऊन सेलिब्रेशन करणं काही कारणांनी शक्य नसेल. पण काळजी करु नका आणि अजिबात मूड ऑफ करुन घेऊ नका! कारण घरच्या घरीही तुम्ही मुलाबाळांसह, परिवारासह मस्त पार्टी करून नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करु शकता.

Donald Trump Diwali Wishes
Donald Trump Wishes For Diwali : “मोदी आमचे चांगले मित्र, हिंदूंचं संरक्षण करू”, दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आश्वासन!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
lokprabha diwali magazine
दर्जेदार, सकस, वाचनीय लेखांची ‘सजावट’, ‘लोकप्रभा’ दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला
during Lakshmi Puja approaching demand for flowers has surged leading to increased prices
दिवाळीमुळे फुलांच्या दरात वाढ
guests at home, diwali celebration, tips
दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…
This year almost all tours during Diwali holidays have house full registration
दिवाळीच्या सुट्टीत सर्वच टूर्स कंपन्यांसाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी
pmc appealed pune residents to celebrate eco friendly diwali
दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन
Dombivli Phadke Road Diwali, Phadke Road,
डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, विद्युत रोषणाईने फडके रोड झळाळला

बाहेरचं कानठळ्या बसवणारं संगीत, प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक जॅम हे सगळं टाळून जर तुम्ही तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करणार असाल, तर उलट त्यामुळे तुमच्यामधलं फॅमिली बाँडिंग आणखीनच वाढेल. त्यांना बरोबर घेऊन पार्टीच्या मस्त नव्या कल्पना लढवून तुम्ही सेलिब्रेशन करु शकता. या पार्टीच्या निमित्तानं अगदी शांतपणे तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही ‘क्वालिटी टाईम’ देऊ शकता. घरातल्या सगळ्यांना या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेण्यासाठी काही मस्त आयडिया बघू या.

हेही वाचा: पार्टी अभी बाकी है! ऑफिस पार्टीज एंजॉय करायची आहे? मग वाचा या टीप्स

एकत्र स्वयंपाक करा

३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बाहेरून जेवण किंवा अगदी पिझ्झाही मागवणं एक प्रकारे ‘रिस्की’ असू शकतं. एकतर प्रचंड वाट पाहावी लागू शकते आणि किंमतीही जास्त असू शकतात. शिवाय भरपूर मागणी असल्यानं क्वालिटीबाबतही खात्री देता येईलच असं नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या परिवारातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन मस्त स्वयंपाक करु शकता. मात्र एकटीनंच स्वयंपाकघरात राबत बसू नका. तुम्हालाही पार्टीचा आनंद घ्यायचा आहे ना, मग तुमचा नवरा, मुलं यांनाही या प्रसंगीच्या ‘स्पेशल कुकिंग’मध्ये सहभागी करुन घ्या. सगळ्यांनी मिळून काहीतरी स्पेशल डिश ठरवा. त्यासाठीची पूर्वतयारी आधीपासूनच करुन ठेवा. भाज्या आणणं, निवडणं, चिरणं, सॅलड करणं वगैरे. प्रत्यक्ष अन्न शिजवताना नवरा, मुलं सहभागी झाली, तर ते सेलिब्रेशन दरवर्षीपेक्षा अगदी हटके ठरेल. सगळ्यांनी मिळून एकत्र मस्त डिनर करा.

फॅमिली गेम्स

तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर घरी पार्टी करणार असाल, तर मस्त ‘फन गेम्स’ खेळू शकता. तुमची मुलं, त्यांचे मित्रमैत्रीणी किंवा तुमचे नातेवाईक यांनाही या पार्टीसाठी बोलावून या फन गेम्सची रंगत आणखी वाढवू शकता. अंताक्षरी, चिट गेम्स, पासिंग द पार्सल, संगीत खुर्ची, डमशडास याबरोबरच आणखी सध्याचे ट्रेंडिंग गेम्सही खेळू शकता. किंवा अगदी तुमच्या लहानपणी खेळला असाल तेही गेम्स सुचवा. त्यानिमित्तानं तुमच्याही काही जुन्या आठवणी जाग्या होतील.

बॉनफायर पार्टी (शेकोटी)

डिसेंबर महिना म्हणजे मस्त थंडी असते. या थंडीत शेकोटी किंवा बॉनफायरची मजा काही औरच. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी तर ही आयडिया अगदी सगळ्यांना खूश करून टाकेल. तुमच्या घराच्या आवारात जर शेकोटीसाठी जागा असेल, तर मग घरातच पार्टीची मस्त तयारी करा. घरच्यांबरोबर मस्त पॉपकॉर्न खात एखादा छानसा चित्रपट एंजॉय करा किंवा छानसं संगीत लावा आणि कुटुंबाबरोबर डान्सचा आनंद घ्या. तुमच्या घराच्या गार्डनमध्ये, गच्चीत किंवा अंगणात शेकोटी पेटवूनही तुम्ही ही मजा लुटू शकता. सोबत काहीतरी मस्त स्नॅक्स किंवा भुईमुगाच्या शेंगा, पॉपकॉर्न असं काहीतरी चटपटीत खात सरत्या वर्षाला निरोप द्या. अंगाभोवती शाल लपेटून, शेकोटीच्या भोवती, जुन्या आठवणींना उजाळा देत किंवा नवीन काही ठरवत आपल्या जीवलगांच्या सोबतीनं सरत्या वर्षाची शेवटची रात्र आणि नवीन वर्षाची पहाट तुम्हाला वेगळाच आनंद मिळवून देईल.

हेही वाचा: आहारवेद : आम्लपित्तावर गुणकारी खरबूज

आणखी काही कल्पना

तुम्हाला अगदीच बाहेरचा माहोल अनुभवासा वाटत असेल, तर कुटुंबासह गाडीतून एखादी चक्कर मारून या. एखाद्या चाटच्या गाडीपाशी मस्त भेळ, पाणीपुरी असं काहीतरी चटपटीत खा, भरपूर थंडीत थंडगार आईस्क्रीमचा आनंद घ्या! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडच्याच बाजारपेठा मस्त सजलेल्या असतात. या सजलेल्या मार्केटमधून एक फेरफटका मारा. शॉपिंग करायलाच हवं असं नाही, पण नुसती चक्कर जरी मारलीत तरी एक वेगळाच उत्साह वाटेल.

एखादं रोप लावा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुमच्या मुलांना एकत्र घेऊन त्यांच्या आवडीचं एखादं रोप लावा. तुमच्याकडे मोठं अंगण नसेल, तर बाल्कनीत किंवा कुंडीत तरी छोटंसं रोप लावा. या रोपाची आपण वर्षभर काळजी घ्यायची आहे, असं मुलांना सांगा. आपलं रोपटं सांभाळलंत तर ते आपल्याला फळं, फुलं देतं, हे मुलांना समजावून सांगितलंत तर त्यांनाही त्यात रस वाटेल. नवीन वर्षाच्या निमित्तानं मुलंही मातीशी जोडली जातील.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत घऱी करायचं आहे याचा अर्थ सगळी कामं फक्त घरच्या बाईनंच करायची असं नाही. उलट तुम्हालाही ‘न्यू इयर पार्टी’चा आनंद घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा आणि जबाबादारी, कामं वाटून घ्या. म्हणजे बाहेरच्या धमाकेदार पार्टीला गेला नाहीत तरी तुमची ‘इयर एंड हाऊस पार्टी’ धम्माल होईल!

शब्दांकन : केतकी जोशी