-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“अनिकेत, मला कोणतीही कारणं सांगू नकोस. तू जिथे असशील तिथून लगेच निघून ये. मी नेहमीच्या कॅफेमध्ये अर्ध्या तासात पोहोचते आहे.”

Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
children, couples, issues,
दुसरं मुलं हवं की नको?…
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Vatpornima
असा नवरा हवा गं बाई! स्वयंपाक ते केरकचरा सगळं नवऱ्याने केलं, पण…; बाईच्या मनातला साथीदार नक्की कसा असतो?
Supriya sule on dhonde jevan
“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”, धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती!

“सायली, मी महत्त्वाच्या कामासाठी फॅमिलीबरोबर बाहेर आलोय. मला लगेच येता येणार नाही.”

“असं कोणतं महत्त्वाचं काम चालू आहे?”

“सायली, तुला माहिती आहेच की माझ्या लग्नासाठी घरच्यांचे प्रयत्न चालू आहेत! आईनं एक मुलगी पसंत केली आहे, तिच्या घरी कुटुंबियांबरोबर एकत्र भेटायचं ठरलं आहे. मला हे टाळता येणार नाही. आई-बाबा तेवढ्यासाठी गावाहून आले आहेत. आता आम्ही तिकडेच निघालोय. मी तुला नंतर फोन करतो… बाय.”

“अरे, पण माझं ऐकून तरी घे ना…”

अनिकेतनं फोन कट केला. तिनंही रागानं फोन बाजूला भिरकावून दिला. तिची चिडचिड आणि त्रागा शेजारी बसलेली मयुरी बघत होती. गेले चार दिवस ती अशीच डिस्टर्ब होती.आज तर सकाळपासून तिनं काहीही खाल्लेलं नव्हतं. मयुरी तिची रूम पार्टनर असल्यामुळे तिच्या वागण्यातले बदल ती बघत होती. गेली तीन वर्षं एकत्र राहात असल्यानं मयुरीला सायलीच्या स्वभावाची चांगलीच माहिती झाली होती. गेले आठ दिवस अनिकेत तिला भेटलेला नव्हता आणि त्यामुळे ती बेचैन झाली होती, हे मयुरीला कळत होतं.

आणखी वाचा-पाककलेतील शिक्षण ते आहारतज्ज्ञ, कसा होता मानवी लोहियाचा ‘वेलनेस गुरु’ बनण्याचा प्रवास, पाहा

“सायली, अनिकेत आजही भेटायला नाही म्हणाला?”

“मयुरी, बघ ना तो अशीच वेगवेगळी कारणं सांगून मला भेटायचं टाळतोय.”

“पण, तुला तरी कशाला भेटायचं आहे त्याला? त्याच्या वेळेनुसार तो भेटेल की. जवळचा मित्र असला तरी त्यालाही त्याचं पर्सनल लाईफ आहे ना? सगळं सोडून तो तुला भेटायला का येईल?”

“मला त्याची सवय झाली आहे. दोन दिवस तो भेटला नाही तरी मी अस्वस्थ होते. वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मारतो आणि त्याच्याशी बोलल्यानंतर मी फ्रेश होते. आम्ही एकमेकांबरोबर खुश असतो.”

“सायली, तुला मी मागच्या आठवड्यातच विचारलं होतं, की तुला अनिकेत आवडतो का? तुझं त्याच्यावर प्रेम आहे का? त्याच्याशी लग्न करायचं आहे का? तेव्हा तर अंगावर झुरळ पडल्यासारखं चटकन म्हणालीस, ‘छे, तू काहीतरी काय बोलतेस?’ एवढंच नाही, तर जेव्हा अनिकेतनं तुला प्रपोज केलं होतं, तेव्हा त्यालाही असंच उडवून लावलंस तू. मग आता हे तुझं काय चाललंय?”

आणखी वाचा-“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”, धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती!

“मयुरी, अगं तो फक्त माझा चांगला मित्र आहे.त्याची भेट झाली नाही की मला चैन पडत नाही.”

“अनिल, तुषार, कौस्तुभ हेपण तुझे चांगले मित्र आहेत. पण ते भेटले नाहीत तर तू अशी बेचैन होत नाहीस! मग अनिकेतच्या बाबतीत असं का?”

“अनिकेत माझा क्लोज फ्रेंड आहे गं! मैत्रीच्या जरा पुढचं आमचं नातं आहे.”

“सायली, तुझी सुखदुःखं तू माझ्याकडे शेअर करतेस. आपण रूम पार्टनर आहोत, एकाच घरात राहतो आणि मीपण तुझी क्लोज फ्रेंड आहे ना?”

“ऑफकोर्स, तू ही माझी क्लोज फ्रेंड आहेसच.”

“मग, जेव्हा सुट्टीच्या वेळेस मी माझ्या गावी जाते, तेव्हा तू बेचैन होत नाहीस. वारंवार मला फोन करत नाहीस. पण आता अनिकेत भेटला नाही तर तू अस्वस्थ का होतेस?”

“मयुरी म्हणजे तुला म्हणायचंय काय?”

आणखी वाचा-जगातील पहिल्या मिस AI ब्युटी स्पर्धेत भारतीय मॉडेल अंतिम स्पर्धेत! पाहा कोण आहे ‘झारा शतावरी’?

“आता तुझ्यावर ‘डीटीआर’ करण्याची वेळ आलेली आहे. ‘डीफाईन द रिलेशनशिप बिटविन यू अँड अनिकेत’! तुझं त्याच्यावर प्रेम नाही, तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही, पण तरीही तो भेटल्याशिवाय तुला चैन पडत नाही. आज तर त्यानं लग्नासाठी मुलगी बघायला जातोय, हे सांगितल्यावर तुझी अधिक चिडचिड झाली आहे. उद्या त्याचं इतर कुणाशी लग्न झाल्यानंतर तो तुला वेळ देऊ शकणार आहे का? मग तुमच्यातल्या क्लोज फ्रेंडशिपचं काय होणार? की ही फक्त ‘सिच्युएशनशिप’ आहे? की अजून काही? ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’? कारण फक्त तुम्हा दोघांना एकमेकांच्या सहवासात छान वाटतं एवढंच? तुला त्याच्याबरोबर कोणती रिलेशनशिप कंटिन्यु करायची आहे? तुमच्या नात्याचा बंध आणि नात्याची परिभाषा एकदा समजून घे. म्हणजे त्या नात्यात अडकायचं की थांबायचं, हे तुझं तुला ठरवता येईल.”

सायली शांतपणे ऐकत होती. ‘नात्यास नाव आपुल्या, देऊ नकोस काही’ हे प्रॅक्टिकली शक्य नसतं! त्यामुळे ‘डी.टी.आर.’ करणं हे महत्त्वाचं आहे, हे मयुरीचं म्हणणं तिला पटलं होतं. आपल्या पुढच्या आयुष्यासाठी तरी आपण या नात्यात का अडकतोय हे ठरवायलाच हवं, हे तिनं ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)