What does Indian Cricketers Wife : वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामन्याची धूम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू आहे. क्रिकेट हा भारतासाठी खेळ नसून क्रिकेटप्रेमींचा एक धर्म आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना क्रिकेटविश्वातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रचंड रस असतो. खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीवर भरभरून बोलणारे क्रिकेटप्रेमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा डोकावतात. समाज माध्यमावरून सुरू असलेल्या गॉसिप्समध्येही ते हिरीहिरीने सहभाग घेतात. खेळाडूंच्या प्रेयसी कोण, पत्नी कोण? किती खेळाडूंचे अनैतिक संबंध आहेत? खेळाडूंचे किती ब्रेकअप्स झालेत इथपासून ते कोणाचं कोणासोबत अफेअर सुरू आहे इथपर्यंतच्या सर्व चर्चा रंगत असतात. त्यामुळे आपण आज वर्ल्ड कप २०२३ मध्ये खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या पत्नींविषयी जाणून घेऊयात.
विराट कोहली – अनुष्का शर्मा
भारतीय क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचा प्रचंड बोलबाला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मॉडेल म्हणून स्वतःच्या करिअरला सुरुवात केली होती. क्लीन स्लेट फिल्म्झची ती सह संस्थापिका आहे. या जोडप्याला वामिका नावाची मुलगीही आहे. या जोडप्याची मैदानातील उपस्थितीही क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय असतो.
रोहित शर्मा – रितिका सजदेह
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह ही पूर्वी सेलिब्रिटी मॅनेजर होती. आता ती क्रीडा व्यवस्थापक आहे. रोहितचा सर्व कारभार तीच पाहते. युवराज सिंगच्या माध्यमातून ती २००८ साली रोहित शर्माला भेटली होती. सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. प्रत्येक मॅचवेळी ती स्टेडिअममध्ये हजर राहून पतीला चिअरअप करताना दिसते.
हार्दिक पांड्या – नताशा स्टॅनकोविक
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याची बायको नताशा स्टॅनकोविक ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मूळची सर्बियाची असून सत्याग्रह या बॉलिवूड चित्रपटातून तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. २०२० मध्ये हार्दिक पांड्याने तिच्याशी लग्न केलं. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.
सूर्यकुमार – देविशा शेट्टी
सूर्याकुमार यादव याचं देविशा शेट्टी या नृत्य प्रशिक्षकेची लग्न झालं आहे. ती द लाईटहाऊस प्रोजेक्ट या साामजिक संस्थेसाठीही स्वयंसेवकाचं काम करते. २०१२ मध्ये हे जोडपं एकमेकांना भेटलं आणि २०१६ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
शार्दुल ठाकूर – मिताली परुलकर
शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली परुलकर ही ऑल द जॅझ लक्झरी बेकर्सची संस्थापिका असून प्रतिभावान उद्योजिका आहे. तिचा बेकरीचा स्वतःचा ब्रॅण्ड आहे. तसंच, ती मॉडेलिंगही करते.
रविंद्र जडेजा – रिवाबा जडेजा
रवींद्र जडेजाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रिवाबा सोलंकीशी २०१६ मध्ये लग्न केले. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिवाबाने आपलं नशिब आजमावलं होतं. यावेळी त्या भाजपा आमदार म्हणून निवडून आल्या.
आश्विन – प्रीती नारायण
आश्विनची पत्नी प्रीती नारायण ही गृहिणी असून या जोडप्याला दोन मुलं आहेत. ती प्रत्येक सामन्यात आपल्या पतीला चिअरअप करायला स्टेडिअममध्ये येते.
के. एल. राहुल – अथिया शेट्टी
के. एल राहुल याची पत्नी अथिया शेट्टी हीसुद्धा अभिनेत्री आहे. अथिया शेट्टी ही सुनील शेट्टीची मुलगी असून तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत काम केलं आहे. यावर्षीच हे जोडपं विवाहबंधनात अडकलं.
जसप्रित बुमहार – संजना गणेशन
जसप्रित बुमहारची बायको संजना गणेशन ही स्पोर्ट्स अँकर आहे. हे जोडपं २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकलं.