Why Colour Purple on Women’s Day 2024 : दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीच्या सन्मान आणि अस्तित्वासाठी हा एक खास दिवस आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत उतरल्या आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक जण हा दरवर्षी हा दिवस आपापल्या परीने साजरा करतो. काही महिलांना भेटवस्तू , तर काही ठिकाणी महिलांच्या मोलाच्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला जातो.

महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित असणारा हा जागतिक दिन जांभळा, हिरवा व पांढरा अशा तीन वेगवेगळ्या रंगांचे प्रतीक आहे. तर यापैकी जगभरातील महिलांच्या मोर्चे आणि स्त्रीवादी चळवळींमध्ये जांभळा रंग महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, हा रंग का निवडला जातो? याचे महत्व काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे? नसेल, तर आज आपण या लेखातून याबद्दल अधिक जाणून घेऊ.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा

जांभळा रंग काय दर्शवितो आणि या रंगाचा वापर का केला जातो ?

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (IWD) वेबसाइटनुसार, जांभळा, हिरवा व पांढरा या रंगांना आंतरराष्ट्रीय महिलादिनी खूप महत्त्व दिले जाते. १९०८ मध्ये युनायटेड किंग्डममधील वूमेन्स सोशल ॲण्ड पॉलिटिकल युनियन (WSPU)पासून या रंगांची उत्पत्ती झाली. जांभळा रंग न्याय व प्रतिष्ठेचे प्रतीक, हिरवा रंग आशेचे, तर पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे.

‘डब्ल्यूएसपीयू’ (WSPU) ब्रिटिश मताधिकार चळवळीचा एक गट मँचेस्टरमध्ये १९०३ मध्ये एमेलिन पंखर्स्टने स्थापन केला होता. १८३२ मध्ये महिलांना मतदानाचा हक्क देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला होता. डब्ल्यूएसपीयूने म्हणजेच विमेन्स सोशल ॲण्ड पॉलिटिकल युनियनने राष्ट्रातील महिलांसाठी मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि महिलांच्या मताधिकाराच्या समर्थनार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या व पांढऱ्या रंगांचा वापर करण्यात आला होता आणि मग हेच रंग महिला दिनाचे प्रतीक बनले.

हेही वाचा…Success Story: कायद्याची पदवी, संगीताची आवड…; भेटा कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात IAS होणाऱ्या पल्लवी मिश्राला

जांभळा रंग स्त्रीवादी चळवळतेचे प्रतीक का आहे?

युनायटेड स्टेट्समध्ये नॅशनल वूमन पार्टीने जांभळा, पांढरा व सोनेरी अशा तीन रंगांचे (Gold) संयोजन स्वीकारले. ६ डिसेंबर १९१३ रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तपत्रात संस्थेने या रंगांचे महत्त्व स्पष्ट करीत म्हटले, जांभळा रंग निष्ठा व स्थिरतेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. हे रंग आमच्या उद्देशाच्या गुणवत्तेचे प्रतीक आहेत आणि सोनेरी रंग आमच्या उद्देशाचे मार्गदर्शन करणाऱ्या मशाल, प्रकाश आणि जीवन, शुद्ध व निश्चल करण्याचे प्रतीक आहे .

तर, पांढऱ्या रंगाला चळवळीच्या ध्वजांमध्ये स्थान मिळाले. अनेक स्त्री-विरोधकांनी याचा विरोध करीत मर्दानी व कुरूप चित्रे चित्रित केली होती. तर याचा विरोध परेडमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून आणि स्लॅश घालून करण्यात आला. त्यामुळे हे पांढरे कपडे मतदानाचा अधिकार मागणाऱ्या त्या प्रत्येक महिलेच्या स्त्रीत्व आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत. एकंदरीत आपण या लेखातून आज महिला दिनानिमित्त जांभळ्या रंगाला का महत्त्व दिले जाते ते पाहिले.

Story img Loader