सध्या आफ्रिकेमध्ये हायमेनेक्टॉमी शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खतना या पद्धतीशी ही शस्त्रक्रिया साम्य साधते. वैद्यकीय कारणांव्यतिरिक्तही स्त्रियांवर ही शस्त्रक्रिया लादली जाते. या शस्त्रक्रियेच्या विरुद्ध स्त्रीवादी लोकांनी चळवळ सुरू केली. आफिकेमध्ये स्त्रीवादी चळवळी आधीपासून सुरू होत्याच. ‘ब्लॅक फेमिनिझम’ने स्त्रियांच्या अनेक मुद्द्यांवर कार्य केले. पण, मुळात ‘ब्लॅक फेमिनिझम’ म्हणजे काय ? ‘ब्लॅक फेमिनिझम’ची निर्मिती का झाली ? हायमेनेक्टॉमी शस्त्रक्रिया का करण्यात येऊ लागली ? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
स्त्रीवाद हा भारतासाठी नवीन नाही. राजकीय, सामाजिक, साहित्य अनेक स्तरांवर स्त्रीवादाचा प्रभाव आहे. पण, सर्वच स्त्रिया जशा समान नसतात, तसाच वैश्विक स्त्रीवादही समान नसतो. स्त्रीवादाचेही अनेक प्रकार आहेत. परंतु, त्यांचा उद्देश बहुतांशी समान आहे तो म्हणजे, स्त्रियांचे हक्क, स्वातंत्र्य, अधिकार अबाधित ठेवणे. त्यांना माणूस म्हणून जगताना येणाऱ्या समस्या दूर करणे. भारतीय स्त्री आणि आफ्रिकेमधील स्त्री या दोन स्त्रियांचे जगण्याचे मूलभूत प्रश्न वेगळे आहेत. त्यांना जगताना, पुरुषसत्ताक पद्धतीला सामोरे जाताना भेडसावणारे प्रश्न वेगळे आहेत. ‘ब्लॅक फेमिनिझम’ची सुरुवात येथून होते.

‘ब्लॅक फेमिनिझम’ म्हणजे काय ?

ब्लॅक फेमिनिझमला कृष्णवर्णीय स्त्रीवाद किंवा अश्वेत स्त्रीवाद असे म्हणतात ब्लॅक फेमिनिझम म्हणजे काय? कृष्णवर्णीय स्त्रीवाद हा कृष्णवर्णीय स्त्रियांच्या जीवनातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतो. कृष्णवर्णीय स्त्रियांचे प्रश्नच गंभीर आहेत. त्यांना वर्ण, वंश आणि लिंगभेद, त्यातून निर्माण झालेली असमानता यांना सामोरे जावे लागते. कृष्णवर्णीय स्त्रीवादाचा विचार केला तर कृष्णवर्णीय स्त्रियांवर पितृसत्ता, तर भांडवलशाही आणि वर्णद्वेषामुळे अत्याचार होतात, हे लक्षात येईल. कृष्णवर्णीय स्त्रियांना जागतिक स्तरावरील स्त्रीवादी चळवळींमधून वगळण्यात आले. त्यांच्यासह वांशिक भेद करण्यात आला. त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांना श्वेत-अश्वेत चळवळीतून वगळण्यात आले. यामुळे त्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी चळवळ निर्माण करणे आवश्यक होते. यातून कृष्णवर्णीय स्त्रीवाद जन्माला आला.
कृष्णवर्णीय स्त्रीवाद हा काही प्रकारांमध्ये विभागलेला आहे. कट्टरपंथीय कृष्णवर्णीय स्त्रीवादी केवळ वर्णद्वेषविरोधी नसून भांडवलशाहीविरोधी आणि पितृसत्ता उखडून टाकण्याची इच्छा बाळगतात. दुसरीकडे, उदारमतवादी कृष्णवर्णीय स्त्रीवादी, समाजाच्या विद्यमान व्यवस्थेमध्ये कृष्णवर्णीय महिलांसाठी समानता सुधारण्यासाठी सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा बाळगतात. कृष्णवर्णीय स्त्रीवादामध्ये हे सहसा समजले जाते की, काळ्या स्त्रियांना समाजात दोन प्रकारचे अत्याचार सहन करावे लागतात. पहिला म्हणजे त्या काळ्या आहेत आणि दुसरा म्हणजे त्या स्त्रिया आहेत. अशाप्रकारे, कृष्णवर्णीय महिलांना लैंगिकता आणि वंशवादाच्या रूपात असमानता आणि भेदभावाचा सामना करावा लागू शकतो.

Ladies group dance on Gan Bai Mogra Ganachi Saree marathi song video goes viral on social media
“गण बाय मोगरा गणाची साडी” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल ‘हौस असेल तर वेळ मिळतो’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
Bride introduction meet for those with white spots in Nagpur
पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर परिचय मेळावा नागपुरात
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

हेही वाचा : दोन फ्रेंडशिप डे का असतात? भारतातील मैत्रीची परंपरा माहीत आहे का ?

‘ब्लॅक फेमिनिझम’चा इतिहास

कृष्णवर्णीय स्त्रीवादाची सुरुवात साधारण १८०० च्या दशकात झाली. महिला हक्क आणि जाणिवा यांच्याकरिता लढणारे वकील सोजोर्नर ट्रूथ यांनी प्रथम कृष्णवर्णीय महिलांना होणाऱ्या त्रासाविषयी प्रथम भाष्य केले. १८५१ मध्ये ट्रूथ यांनी कृष्णवर्णीय महिलांना भेडसावणाऱ्या वांशिक आणि लैंगिक भेदभावाविषयी आवाज उठवला. तिच्या भाषणाचे शीर्षकच ‘मी एक स्त्री नाही का?’ असे होते. गोऱ्या स्त्रिया या नाजूक, सुडौल असल्यामुळे पुरुषांच्या पसंतीस उतरतात. अश्वेत महिलांना त्यांच्या वर्णामुळे नाकारले जाते, वर्णद्वेषामुळे महिलांवर होणारे अत्याचार तिने मांडले. अण्णा ज्युलिया कूपर यांनी १८५२ मध्ये कृष्णवर्णीय महिलांना आधार आणि सहकार्य करणारी संस्था स्थापन केली. कृष्णवर्णीय महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. शिक्षणामुळे अनेक प्रश्न सुटू शकतील असा त्यांना विश्वास होता. कूपर यांनी ‘ए व्हॉईस फ्रॉम द साउथ’ नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. सामाजिक बदल घडवण्यात कृष्णवर्णीय महिलांचा असणारा सहभाग त्यांनी यामध्ये लिहिला. या महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही सुरुवात म्हटली जाते. इडा बी. वेल्स या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या स्वतः एक वृत्तपत्र प्रकाशित करत. १८९० च्या दशकात त्यांच्या तीन कृष्णवर्णीय मैत्रिणींची त्यांच्या काळ्या वर्णावरून हत्या करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपली पत्रकारिता कृष्णवर्णीय महिलांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी वापरली. वर्णद्वेषी लोकांनी त्यांना मारण्याची धमकी दिली, वृत्तपत्राचे कार्यालय उद्ध्वस्त केले, त्यांना निर्वासित केले. तरीही त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध लढा दिला. अमेरिकेपासून अनेक राष्ट्रांमध्ये दौरे करून वर्णद्वेषाविरुद्ध जागृती केली. वर्णद्वेषासह या महिलांनी लैंगिक अत्याचाराचा सामना केला. स्त्री असल्यामुळे वांशिक युद्धांमध्ये या महिलांवर अधिक अन्याय झाला.

हेही वाचा : ‘युनेस्को’ने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली, पण घरात काय ? मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी विचार केला का ?

१९६० च्या दशकात कृष्णवर्णीय महिलांनी वर्णद्वेष आणि लिंगवाद यामुळे उद्भवलेल्या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी संघटना उभारली. स्टुडंट नॉन-व्हायलेंट कोऑर्डिनेटिंग कमिटी (SNCC) मधील कृष्णवर्णीय महिलांनी १९६८ मध्ये थर्ड वर्ल्ड वुमेन्स अलायन्सची स्थापना केली. या गटाने महिलांच्या आवाज आणि समस्यांसाठी वर्णद्वेषविरोधी संघटना आणि डाव्या वांशिक चळवळींमध्ये स्थान निर्माण करण्यात मदत केली. १९७३ मध्ये, कृष्णवर्णीय स्त्रीवाद्यांच्या एका गटाने नॅशनल ब्लॅक फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन (NBFO) ची स्थापना केली, ज्याने अश्वेत स्त्रियांना भेडसावणाऱ्या लिंगवाद आणि वर्णद्वेषाच्या दुहेरी समस्यांकडे लक्ष दिले. तसेच या महिलांचे आर्थिक प्रश्न सोडवण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. १९७० च्या दशकात, कृष्णवर्णीय स्त्रीवाद्यांच्या गटाने कॉम्बाही रिव्हर कलेक्टिव्हची स्थापना केली. गोऱ्या महिलांच्या स्त्रीवादापेक्षा आमचा स्त्रीवाद, आमचे प्रश्न वेगळे आहेत, हे सांगणे हा त्यांचा उद्देश होता. सर्वात प्रसिद्ध ब्लॅक चळवळींपैकी एक म्हणजे २०१३ च्या सुमारास तयार झालेली ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळ. ही चळवळ तीन कृष्णवर्णीय समुदाय संयोजकांनी विकसित केली – पॅट्रिस खान-कुलर्स, अ‍ॅलिसिया गार्झा आणि ओपल टोमेटी यांनी कृष्णवर्णीय विरोधी हिंसाचाराच्या निषेधार्थ, विशेषत: पोलिसांच्या क्रूरतेच्या विरुद्ध सुरु केली. ही चळवळ केवळ कृष्णवर्णीय स्त्रीवादी मुद्द्यांवर स्पष्टपणे लागू होत नसली, तरी, लिंग, वर्ग, वय, लैंगिक प्रवृत्ती, स्थलांतरित स्थिती, धर्म किंवा क्षमता यांचा विचार न करता, सर्व कृष्णवर्णीय जीवनांमधील परस्परसंबंध आणि एकता या कृष्णवर्णीय स्त्रीवादी प्रश्न यावर ती भाष्य करते.

हेही वाचा : विश्लेषण : ‘कलम ३७०’ची कूळकथा; हे कलम का आणि कोणासाठी ?

‘ब्लॅक फेमिनिझम’ची उद्दिष्टे

ब्लॅक फेमिनिझम म्हणजे कृष्णवर्णीय स्त्रीवादाचे अनेक प्रकार अस्तित्त्वात आहेत. तसेच हे किन्नर लोकांकरिताही काम करतात. काही स्त्रीवाद्यांना कृष्णवर्णीय महिलांना सत्तेच्या पदावर आणायचे आहे. कट्टर कृष्णवर्णीय स्त्रीवादी पितृसत्ताक पद्धती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. काहींची लढाई ही वर्णभेदाशी आहे. कृष्णवर्णीय स्त्रीवादी चळवळीचे मूळ उद्दिष्ट सर्व स्त्रियांसाठी अर्थपूर्ण असलेल्या स्त्रीमुक्तीसाठी एक मजबूत चळवळ उभारणे हे आहे. दडपशाहीच्या प्रणाली सामाजिक असमानतेमध्ये कशा प्रकारे योगदान देतात, याचे विश्लेषण करून कृष्णवर्णीय महिलांना सक्षम बनविण्याचे त्यांचे ध्येय आहे. वंश, लैंगिक प्रवृत्ती, सामाजिक वर्ग, वय आणि क्षमता यांचा विचार न करता सर्व प्रकारच्या स्त्रिया या चळवळीत सहभागी होऊ शकतात. ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळ केवळ काळ्या स्त्रियांच्याच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी कार्य करते. कृष्णवर्णीय पुरुष आणि स्त्रिया, विशेषत: पोलिसांच्या हातून महिलांना, किंवा कृष्णवर्णीय लोकांना हिंसाचाराला सामोरे जावे लागते, त्यांना न्याय मिळवून देणे, अशा घटना समाजासमोर आणणे, हे या चळवळीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

‘एफजीएम’चे प्रमाण जास्त का आहे ?

आफ्रिकेमधील अनेक राष्ट्रात ‘एफजीएम’ म्हणजे Female genital mutilation च्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, आफ्रिकेमधील २०० मिलियनहून अधिक महिला आणि मुली या ‘एफजीएम’च्या प्रकारातून गेलेल्या आहेत. ० ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलींकरिता ‘एफजीएम’ करण्याचे प्रमाण अधिक आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, एफजीएम’मुळे होणारी गुंतागुंत सोडविण्याकरिता १.४ अब्ज युएसए डॉलर वर्षाला खर्च येतो. ‘एफजीएम’करिताच आफ्रिकेमध्ये हायमेनेक्टॉमी शस्त्रक्रिया केली जाते, जी ‘खतना’ या प्रकाराशी साधर्म्य साधते. ‘डब्ल्यूएचओ’च्या मते, ‘एफजीएम’ हे केवळ महिलेच्या लैंगिक अवयवाला दुखापत पोहोचवते. यामुळे कोणताही फायदा होत नाही. योनीच्या येथील उघड्यावरील काही भाग हा यामध्ये कापला जातो. यामुळे प्रचंड वेदना, रक्तस्राव, अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीच्या वेळी वेदना, लघवीला त्रास होणे, शारीरिक संबंधांवेळी वेदना होणे, पाय बाजूला करताना वेदना होणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. आफ्रिकेतील जवळजवळ ३० देशांमधील मुली या प्रकाराला बळी पडतात. अज्ञान, परंपरांचे पालन, पुरुषसत्ताक, महिलांना असणारे दुय्यम स्थान, शिक्षणाचा अभाव यामुळे ‘एफजीएम’चे प्रमाण अधिक आहे. डब्ल्यूएचओने अहवाल प्रसिद्ध करून सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांचा एफजीएम’वर असणारा प्रभाव स्पष्ट केला आहे. महिलांची योनीशुचिता अबाधित ठेवण्यासाठी तसेच, त्यांच्या लैंगिक भावनांवर मर्यादा ठेवण्यासाठी या प्रकारांचा वापर आफ्रिकेतील ३० देशांमध्ये होतो. केवळ परंपरेमुळे चालत आलेल्या रूढी तेथील लोक आजही पाळत आहेत. यामध्ये महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

भारतातील स्त्रीवाद हा या कृष्णवर्णीय स्त्रीवादापेक्षा नक्कीच वेगळा ठरतो. तेथील महिलांच्या मूलभूत हक्कांवरच आज गदा आणली जात आहे. ‘एफजीएम’ सारख्या गोष्टी आजही परंपरा म्हणून सुरू आहेत. अधिकार, लैंगिकता, वर्ण, वंश अशा अनेक प्रश्नांसाठी तेथील महिलांना लढावे लागत आहे. कुठेतरी सर्वच स्त्रियांनी एकत्र येऊन परस्पर संवाद, सलोख्यातून प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader