सध्या आफ्रिकेमध्ये हायमेनेक्टॉमी शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खतना या पद्धतीशी ही शस्त्रक्रिया साम्य साधते. वैद्यकीय कारणांव्यतिरिक्तही स्त्रियांवर ही शस्त्रक्रिया लादली जाते. या शस्त्रक्रियेच्या विरुद्ध स्त्रीवादी लोकांनी चळवळ सुरू केली. आफिकेमध्ये स्त्रीवादी चळवळी आधीपासून सुरू होत्याच. ‘ब्लॅक फेमिनिझम’ने स्त्रियांच्या अनेक मुद्द्यांवर कार्य केले. पण, मुळात ‘ब्लॅक फेमिनिझम’ म्हणजे काय ? ‘ब्लॅक फेमिनिझम’ची निर्मिती का झाली ? हायमेनेक्टॉमी शस्त्रक्रिया का करण्यात येऊ लागली ? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
स्त्रीवाद हा भारतासाठी नवीन नाही. राजकीय, सामाजिक, साहित्य अनेक स्तरांवर स्त्रीवादाचा प्रभाव आहे. पण, सर्वच स्त्रिया जशा समान नसतात, तसाच वैश्विक स्त्रीवादही समान नसतो. स्त्रीवादाचेही अनेक प्रकार आहेत. परंतु, त्यांचा उद्देश बहुतांशी समान आहे तो म्हणजे, स्त्रियांचे हक्क, स्वातंत्र्य, अधिकार अबाधित ठेवणे. त्यांना माणूस म्हणून जगताना येणाऱ्या समस्या दूर करणे. भारतीय स्त्री आणि आफ्रिकेमधील स्त्री या दोन स्त्रियांचे जगण्याचे मूलभूत प्रश्न वेगळे आहेत. त्यांना जगताना, पुरुषसत्ताक पद्धतीला सामोरे जाताना भेडसावणारे प्रश्न वेगळे आहेत. ‘ब्लॅक फेमिनिझम’ची सुरुवात येथून होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा