-अपर्णा देशपांडे

आज अविन्या खूपच खूष होती. आज तिच्या विभागाची नवीन सीनियर मॅनेजर जॉईन करणार होती, जिला अविन्याला रोज रिपोर्ट करायचं होतं. तिचे इतर सहकारी तिला सारखे चिडवत होते, “ बघ बुवा अविन्या, आम्ही ऐकलंय, की तुझी नवीन बॉस ‘लोनर इन फॉर्टिज’ आहे. असं म्हणतात, की सिंगल बॉस आणि तेही एक स्त्री असेल तर फार छळकुटे असतात. त्यांना एकटं राहून राहून एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन आलेलं असतं, आणि त्याचा राग ते आपल्या टीम मेंबर्सवर काढतात. जरा सांभाळूनच राहा बाई!”

Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

अविन्यानं प्रत्येकवेळी त्यांचं म्हणणं खोडून काढलं. ती सांगायची, “असा एकतर्फी विचार करणं अत्यंत चुकीचं आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीनं लग्न करून किंवा न करता कायम एका पार्टनर सोबतच राहिलं पाहिजे, असा कायदा आहे का तुमचा? नाही ना! एखाद्याला सिंगल राहायचं आहे तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सिंगल व्यक्ती म्हणजे चिडकी, किरकिरी, टॉक्सीक असणार असा ठप्पा ठेवणं किती चुकीचं आहे! यापूर्वी मी ज्योत्स्ना मॅडमसोबत काम केलं आहे. त्या तर पंचेचाळीसच्या आणि सिंगल होत्या. आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणींबाबत किती सेन्सिटिव्ह असायच्या. त्यांनी कधीही फॅमिली असणाऱ्या माणसाचा राग किंवा मत्सर केला नाही. उलट कंपनीच्या ‘फॅमिली डे’ला सगळ्यांशी आपुलकीनं वागायच्या. आपण ही अशी लोनर म्हणजे खडूस, जळकुटी असली लेबलं लावणं बंद करायला हवीत.”

आणखी वाचा-‘हिट’ आणि ‘फ्लॉप’ दोन्ही अभिनेत्यासाठी महत्त्वाचं! – तृप्ती डिमरी

ती नेहमी असं मत मांडायची आणि तिचा हा विश्वास सार्थ ठरवणारी बॉस तिला लाभली. तिच्या नवीन बॉसबरोबर तिचं ट्युनिंग अगदी छान जमलं.
पण साक्षीचा मात्र काही वेगळाच अनुभव होता.
फार काळ वाट बघितल्या नंतर, मोठ्या प्रयत्नांनी साक्षीला तिच्या ड्रीम कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या दिवशी ती कामावरून आली तेच तोंड पाडून. आतुरतेने तिची वाट बघणारी आई तिचा नाराज चेहरा बघून म्हणाली, “पहिलाच दिवस म्हणून जरा टेन्शन होतं की काय? तू थकली आहेस ना बेटा?” पण साक्षी काहीच न बोलता आत निघून गेली.
“काय झालं?” आईनं विचारलं तर म्हणाली, पहिली नोकरी ज्या कारणासाठी सोडली, तेच पुन्हा माझ्या वाट्याला आलंय आई. गेल्याबरोबर माझी कलीग म्हणाली,“तुला स्नेहा मॅडमला रिपोर्ट करायचं आहे, सांभाळून गं बाई! लोनर आहे ती!”

आणखी वाचा-‘तिनं असं का केलं…?’

“म्हणजे काय साक्षी?”
“अगं, अविवाहित बॉस असली की तिला घरी जाण्याची फारशी घाई नसते. कामासाठी जास्त वेळ देण्याची तयारी असते. आणि एकटं राहून राहून अशा स्त्रिया थोड्या कडवट झालेल्या असतात. आपल्या एकटं राहण्याची शेखी मिरवतात, पण आत कुठेतरी खूप नाराजी असते. मग ती नाराजी त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर निघते.
बाकी मंडळी संसारी असतात, त्यांना सोशल लाईफ असतं, पण त्यांना कुणात मिसळायचं नसतं! त्याचा वचपा त्या आपल्या हाताखालील काम करणाऱ्या टीम मेंबर्सवर काढतात. त्यांना असं वाटतं, की यांनीही आपला जास्तीचा वेळ देऊन सगळे टारगेटस् पूर्ण करावेत नाहीतर मग त्या चिडचिड करतात. अशांना आम्ही खडूस लोनर बॉस म्हणतो.”
“ पण सगळ्या सिंगल स्त्रिया तशाच असतात, असं म्हणणं चूक होईल हा.”
“हो ना. सगळ्या एकट्या स्त्री अधिकारी अशा वागत नाहीत, माझ्या इतर मैत्रिणींचा अनुभव आहेच ना तसा, पण माझ्या वाट्याला पुन्हा एकदा खडूस लोनर बॉसच आलीय! फार चिडकी आहे म्हणे ही. आता मी काय करू?” साक्षी रडकुंडीला आली होती.

आणखी वाचा-समुपदेशन : भांडणं कशाला?

“तू काही दिवस वाट बघ साक्षी. कदाचित या मॅडमही चांगल्या असतील. आधीच काही तरी ग्रह करून नाराज नको होऊस.”
“ आई, तू आणि बाबा समजून घ्याल गं मला, पण मी सोळा सोळा तास हेच नाही करू शकत. मला वाचन करायचं असतं, जिमला जायचं असतं. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायचं असतं. उद्या लग्न होईल, मग सासरी वेळ द्यावा लागेलच ना. ती जर कडक बॉस असेल तर तर माझा जीव गुदमरेल.”
“मग एकच उपाय आहे. तुझं काम तू चोख ठेवायचं. वेळा पाळायच्या. कधी करावं लागलंच जास्तीचं काम तर नक्की करायचं, पण सतत जास्तीचं काम सांगितलं, किंवा वारंवार घरी काम दिलं की गोड पण ठाम भाषेत ‘नाही जमणार’ सांगायचं. तुझं काम मात्र एकदम परफेक्ट ठेव. त्यात चुका नको. काय पटतंय ना?”
“एकदम पटलं! खरं तर तूच माझी बॉस असायला हवी होतीस आई.”
“असं? मग तर तू मला पूर्णपणे गुंडाळून ठेवलं असतं आणि तुझे कामही मलाच सांगितलं असतंस. म्हणून बॉस थोडे कडकच असावेत बाई!” आई म्हणाली, आणि दोघी मनापासून हसल्या.

adaparnadeshpande@gmail.com