Why Women’s Day Celebrated on March 8: मानव प्राणी हा प्रामुख्याने नर आणि मादी या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. पूर्वी जंगलात समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक कामे करावी लागत असत. शिकार करणे, सर्वांचे रक्षण करणे ही कामे समूहामधील पुरुष करु लागले. तर महिला मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करु लागल्या. काही टोळ्यांमधील स्त्रिया या शिकार करण्यामध्येही सहभागी होत असत. हळूहळू टोळ्या, समूह मोठे होत गेले आणि त्यातून पुढे समाज ही संकल्पना उदयास आली.

जगातील बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक समाज व्यवस्था पाहायला मिळत असत. सुरुवातीला समान अधिकार असणारा महिला वर्ग हळूहळू मागे पडायला लागल्या. त्यांचे हक्क त्यांच्याकडून काढून घेतले गेले. अनाठायी गोष्टी त्यांच्यावर लादल्या गेल्या. यामध्ये अनेक अपवाद देखील होते. जसजशी मानवी समाजाची प्रगती होत गेली, तसतश्या महिला देखील प्रगती करु लागल्या. आजच्या युगातील महिला या चूल-मूल सांभाळत ऑफिसची जबाबदारीही पेलवत आहेत. खेळ-मनोरंजन ते राजकारण-संरक्षण अशा सर्वच बाबतीमध्ये त्या पुरुषांची बरोबरी करत आहेत. काही क्षेत्रांमध्ये महिला त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत आहेत. समाजाची वृद्धी होण्यासाठी महिला वर्ग अजून प्रगत होण्याची गरज आहे. महिलांचा समाजामध्ये सहभाग वाढावा तसेच त्यांना असलेल्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक

महिला दिनाची सुरुवात कधी झाली?

पहिल्या महायुद्धापूर्वी महिलांना घराबाहेर पडून काम करण्याची परवानगी नव्हती. या काळात पुरुष सैन्यामध्ये असल्याने विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी महिला उमेदवारांना संधी दिली जाऊ लागली. कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जात होते. कामाची वेळही अधिक असल्याचा महिला कर्माचारी आरोप करत होत्या. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये ही स्थिती होती.

कामाच्या ठिकाणी असलेल्या पितृसत्ताक विचारसरणी विरोधात १९०८ मध्ये अमेरिकेत कामगार चळवळ झाली. सुमारे १५,००० महिलांनी न्यूयॉर्कच्या मोर्चा काढत हक्कांसाठी आवाज उठवला. कामाचे तास कमी करुन वेतन वाढवले जावे, अशी मागणी नोकरदार महिलांनी केली. त्यांनी मतदान करण्याच्या अधिकाराची मागणी केली. यानंतर १९०९ मध्ये या चळवळीच्या एका वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. ८ मार्च रोजी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे अमेरिकेत हा दिवस महिला दिन साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हा ८ मार्च १९७५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. १९७७ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा – Womens Day 2023: महिलांना काय आवडत? Womens Day ला गिफ्ट द्यायचं तर हे ७ भन्नाट पर्याय बघाच

महिला दिन का साजरा केला जातो?

महिलांना समान संधी मिळावी, महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी तसेच समाजामध्ये महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता वाढावी यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. सध्या बऱ्याचशा महिला या प्रगती करत असल्या तरीही या वर्गातील काही महिलांना समान सन्मान आणि अधिकार मिळालेले नाहीत. यांच्या हक्कांची जाणीव समाजाला करवून देण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

आणखी वाचा – अंतर्वस्त्र निवडताना ‘Period Panties’ ला महिला देतायत प्राधान्य; कसा करायचा वापर? जाणून घ्या फायदे

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२३ थीम

काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंघाने यंदाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘DigitALL: Innovation and technology for gender equality’ असल्याची घोषणा केली. स्त्री-पुरुष यांमध्ये असमानतेच्या मुद्द्यावरुन निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या उद्देशाने ही थीम निवडण्यात आली आहे.

Story img Loader