डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“काहीही झालं तरी मला माझा संसार मोडायचा नाहीये, मॅडम, मी अनिकेतची कोणतीही फसवणूक केलेली नाहीये. माझ्या आईबाबांनी खूप पैसे खर्च करून आणि कष्टानं माझं लग्न करून दिलं आहे आणि माझा असा तुटणारा संसार बघून त्यांना किती वाईट वाटेल? आता या वयात त्यांच्या आयुष्यात कोणतंही दुःख यावं असं मला वाटत नाही. प्लीज प्लीज माझा संसार वाचवा.” प्रियांका अगदी अगतिकतेनं मला सांगत होती. अनिकेत मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता.

Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

“अत्यंत स्वार्थी बाई आहे ही. तिच्या आईवडिलांना त्रास होईल म्हणून मी हे लोढणं आयुष्यभर सांभाळू? त्यांनीच माझी फसवणूक केली आहे. आपल्या मुलीमधील दोष लपवून त्यांनीच तिच्याशी माझं लग्न लावून दिलं आहे, तिला लग्नामध्ये स्वारस्य नव्हतं तर तिचं लग्नच कशाला करायचं? लग्नाचा अर्थ तरी तिला आणि त्यांना समजतो का? मी तिच्या आयुष्यात जबरदस्तीने घुसखोरी केलेली नाही. तिच्या पूर्वायुष्यात कोणी होतं तर तिनं मला लग्नापूर्वीच तसं सांगायला हवं होतं. माझं आयुष्य तिनं का पणाला लावलं?”

“माझा तसा कोणताही भूतकाळ नाहीये. मॅडम, हा माझ्यावर विनाकारण आरोप करतोय. कोर्टामध्ये दाखल केलेल्या अर्जातही त्यानं माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले आहेत. मला त्या सगळ्या गोष्टीत काही रसच नाहीये.” प्रियंकानंही स्वतःचं समर्थन केलं.

आणखी वाचा – डिजीटल लिंगभेद आणि निरक्षरता

“हेच हेच मला नको आहे, कारण तिला कशातच रस नाहीये. म्हणूनच मला वेगळं व्हायचं आहे, मॅडम, लग्न होऊन सात महिने झाले तरी आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. मी दहा दिवस तिला स्वित्झर्लंडला हनिमूनसाठी घेऊन गेलो होतो, पण तिथे मला तिनं अंगाला हातही लावून दिला नाही, तरीही मी संयम ठेवला. पण आता ती एका बेडवर झोपण्यासही नकार देऊ लागली. माझा हलकासा स्पर्शही तिला नकोसा वाटतो. त्यामुळेच माझी फसवणूक झाल्याने माझं लग्न रद्द करावं, असा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला आहे.”

नक्की काय झालं आहे ते समजावून घेण्यासाठी मी प्रियांकाला बोलतं केलं. “मॅडम, अनिकेतला माझ्यामुळे त्रास होतो हे मी समजू शकते, पण तो माझ्या जवळ आला की काय होतं ते मलाच कळत नाही, माझ्या अंगाला दरदरून घाम फुटतो, मी घाबरून जाते, माझ्यासोबत खूप वाईट घडतंय असं मला वाटायला लागतं. लहानपणी मी एकदा शेजारच्या काकांनी काकूंवर कशी जबरदस्ती केली ते पाहिलं होतं ते सर्व गलिच्छ आणि घाणेरडे आहे आणि आपल्या बाबतीत असं व्हायला नकोच, असं वाटून त्या बाबतीत माझ्या मनात किळस निर्माण झाली आणि आता लग्न झाल्यानंतर जेव्हा केव्हा अनिकेत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कधी माझ्यापासून दूर जातोय असं मला होऊन जातं. ही गोष्ट कोणालाही सांगता येत नाही, मी एकदा आईशी बोलले पण ती म्हणाली, सुरुवातीला सर्वच मुलींना असं वाटतं, पण तुला हळूहळू सवय होईल. मॅडम, मला अनिकेतला सुखी करायचं आहे, पण तो मला समजून घेऊ शकत नाही.”

आणखी वाचा – तंत्रज्ञान आणि असमानता : बाईला कशाला लागतो मोबाईल?

लग्नानंतर घरातील सर्व जबाबदारी प्रियांकानं खूपच चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. सासू, सुना, नणंदा भावजया या सर्व नात्यांची तिने छान जपणूक केलेली होती. परंतु लग्न टिकवण्यासाठी नवरा-बायकोच्या शारीरिक नात्यांचा बंध जुळणे आवश्यक आहे. विवाह संस्थेचा तो महत्त्वाचा पाया आहे. आणि प्रियांकाला ‘सेक्सफोबिया’ आहे, लग्न टिकवण्यासाठी तिची ही भीती दूर करणं महत्त्वाचं होतं. पण त्यासाठी दोघांची तयारी होणं गरजेचं होतं.

“प्रियांका, तू या सर्व गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. लग्नानंतर पती- पत्नी दोघांनीही एकमेकांशी मनाने आणि शरीराने एकत्र येणं गरजेचं आहे. हा एक सुंदर आणि हळुवार अनुभव आहे आणि यातील स्वर्गसुख अनुभवण्यासाठी तुझी मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. तुझे आई-वडील, मावशी, काका, मामा-मामी यांच्या एकमेकांच्या नात्यातील आदर, प्रेम तू बघितलं असशील. तुझ्या मित्रमैत्रिणींमधील जवळीकता तू अनुभवली असशील. यामध्ये कोणताही गलिच्छपणा अथवा किळसवाणा प्रकार नाहीये. तुलाही आई होण्याची इच्छा असेल, तुझ्याही काही स्त्रीसुलभ भावना असतील, पण तू त्या दाबून टाकल्या आहेस. प्रेमातील सुंदरता लक्षात घे म्हणजे तुझ्या मनातील वाईट प्रसंगाच्या स्मृती आपोआप निघून जातील, एकदा तू अनुभवलंस, की तो क्षण आणि ते सुख तुला हवंसं वाटेल, प्रयत्न कर.”

“अनिकेत, तूही तिची मानसिकता समजावून घे, कोणतीही घाई करू नकोस, तिला इतर सर्व गोष्टीतून विश्वास दे, प्रेमातील पवित्रपणाची जाणीव तिला होऊ देत, ती स्वतः तुझ्या जवळ येईल फक्त थोडा संयम ठेव. तशीच काही वेळ आली तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा लैंगिक उपचारतज्ज्ञ यांचीही मदत घेता येईल, पण लग्न मोडण्याचा विचार करू नकोस कारण यातून तुम्हा दोघांना आणि त्याबरोबर तुमच्या कुटुंबियांना ही त्रास होणार आहे.”

अनिकेत आणि प्रियांका दोघांनीही या गोष्टी पटल्या आणि तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले. एक तुटणारा संसार पुन्हा एकदा जोडता आला.
(लेखिका विवाह समुपदेशक आहेत)