Tips to Save Money on Online Shopping : धो-धो पाऊस सुरू झाला की दुसरा पाऊस सुरू होतो तो ‘मान्सून सेल’चा. मॉल्स आणि दुकानांबरोबरच सध्या वेगवेगळे ऑनलाईन सेल सुरू आहेत. हे सेल अगदी दर पंधरा दिवसांनी लागतात. यात कपडे, मेकअप आणि ॲक्सेसरीजचे सेल प्रचंड आकर्षक असतात. विशेषत: ज्यांना मोठ्या ‘ब्रॅण्डस्’चं वेड आहे त्या `चतुरां’ना ऑनलाईन सेलमध्ये आवडीची आणि किफायतशीर खरेदी केल्यावर मिळणारी ‘सुख-संतोष की चरम अनुभूती’ केवळ त्याच सांगू शकतील!

‘ब्रॅण्डेड’ वस्तू (किंवा अगदी आपल्याला माहीत नसलेल्या ब्रॅण्डचीही) दुकानात घेतल्यावर मिळणारी सूट आणि ऑनलाईन ॲपवर मिळणारी सूट यात जमीन- अस्मानाचा फरक असतो. (काहीजणी म्हणतील, की सगळेच ऑनलाईन खरेदी करू लागले तर दुकानदारांचे काय होणार? मात्र हा क्लिष्ट विषय घटकाभर बाजूला ठेवून तूर्त आपण फक्त ग्राहकाच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन सेल्सकडे पाहू या.)

Puneri patya viral only punekars know how to make and deal with thief funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंगल्याबाहेर खास चोरांसाठी लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
disabled girl emotional video | heart touching video
आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटलं तर या अपंग चिमुकलीची इच्छाशक्ती पाहा; Video पाहून कळेल जगणं म्हणजे काय
Nikhil Kamath :
Nikhil Kamath : ‘झिरोधा’च्या निखिल कामतांनी अखेर घर विकत घेतलंच; घर भाड्यानं घ्यावं की विकत? वाद पुन्हा ऐरणीवर
How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा
fraud with businessman in Buldhana by investing in stock market
सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा
Flipkart Big Diwali Sale goes live From Today
Flipkart Big Diwali Sale : दिवाळीपूर्वी ‘हे’ १० स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, डिस्काउंट, कॅशबॅकचा घेता येईल आनंद, वाचा काय आहे ऑफर
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral funny pueri pati
पुणेकरांचा नाद नाय! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर टाईमपास करणाऱ्या ग्राहकासांठी जबरदस्त मेन्यू; PHOTO पाहून पोट धरुन हसाल

मेकअप किंवा गृहोपयोगी उत्पादनांची ऑनलाईन खरेदी करणाऱ्या अनेक जणी ऑनलाईन कपडे, चपला वा हेअर ॲक्सेसरीजसारख्या वस्तू खरेदीचा विषय आला की जराशा कचरतात. पण आज आपण अशा काही ‘चुका आणि युक्त्या’ पाहू, ज्या अनुक्रमे ‘टाळल्या आणि आजमावल्या’ तर तुम्ही अल्पावधीतच या शॉपिंगमध्ये तरबेज होऊन जाल आणि शॉपिंगमध्ये आणखी पैसे वाचवाल.

स्टील द डील!
ऑनलाईन ब्रॅण्डेड कपडे वा चपलाखरेदीच्या केंद्रस्थानी असणारी सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ‘डिस्काउंट’ किंवा सूट आणि ग्राहक म्हणून अधिक डिस्काउंट मिळवण्यात लाज ती कसली! प्रत्येक ऑनलाईन सेलची जाहिरात ‘धमाका ऑफर’ छापाचीच असते. पण त्यात मिळणारं डिस्काउंट नेहमीच ‘धमाका’ असेल असं नाही. ऑनलाईन कपडे-ॲक्सेसरीज शॉपिंगमध्ये तरबेज व्हायचं असेल तर प्रथम आपल्याला या डिस्काउंटचा थोडा अभ्यास करायला हवा.

तो कसा करायचा?
अगदी सोपं! येता-जाता जेव्हा तुम्हाला फावला वेळ मिळेल, तेव्हा ऑनलाईन कपडेखरेदीचं एखादं चांगलं, खूप वर्षे या क्षेत्रात काम करणारं ॲप उघडून नुसत्या तुमच्या आवडत्या ब्रॅण्डस् च्या कपड्यांच्या किंमती आणि त्यावर दिवसागणिक बदलणारा डिस्काउंटचा आकडा पाहात राहा. आपण जसे रोज इन्स्टा-फेसबुकवर सर्वार्थाने निरर्थक व्हिडीओ पाहात बसतो तसंच! फरक एवढाच, की ऑनलाईन खरेदीच्या ॲपवर घालवलेला वेळ निश्चितपणे फुकट जाणार नाही!

ज्या कपड्यावर, पायताणावर मागच्या सेलमध्ये ६५ टक्के डिस्काउंट होते, ते यंदा निव्वळ १०-१५ दिवसांच्या फरकाने तिथेच लागलेल्या दुसऱ्या सेलमध्ये ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे, हे तुमच्या लक्षात येईल. हळूहळू अमुक कपड्यांवर अधिकाधिक किती टक्के डिस्काउंट मिळू शकेल, याचे गणितच तुमच्या मनात एका बाजूस तयार होते. म्हणजे ‘या ब्रॅण्डेड टी-शर्टवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक डिस्काउंट आजवर कधीच आलेले नाही’, ‘अमुक परदेशी ब्रॅण्डच्या हील्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक डिस्काउंटला कधीच नसतात’ हे लक्षात येऊ लागते. मजा म्हणजे यासाठी आपण वेगळा अभ्यास काहीच केलेला नाही! उलट त्या-त्या वेळी ॲपवर कपडे ‘स्क्रोल’ करून स्टाईल्स न्याहाळताना करमणूकच झाली होती! आणि आपण `चतुरा’ मुळात असतोच चाणाक्ष. एकदा ‘ऑप्टिमम डिस्काउंट’ म्हणजेच सर्वाधिक सूट ओळखता यायला लागली, की मग वाट कसली पाहायची?  डिस्काउंट दिसले, की ताबडतोब ‘स्टील द डील’! तुम्ही ‘बेस्ट ऑनलाईन ग्राहक’ होण्याची परीक्षा विशेष प्रावीण्य मिळवूनच उत्तीर्ण झालात असे समजून आनंद वाटून घेण्याची हीच ती वेळ!

रीटर्न – रीऑर्डरचीही मजा
काही वेळा ऑनलाइन खरेदी करताना सर्वाधिक सूट ओळखण्यात जराशी चूक होते. म्हणजे- एखाद्या कुडत्यावर ७५ टक्के डिस्काउंट मिळाल्याने हर्ष होऊन आपण तो खरेदी करतो, घरी पोहोचतो आणि आपल्याला ‘फिट्ट’ होऊन आवडतोही. मग अचानक ४-५ दिवसांनी त्याच शॉपिंग ॲपवर फेरी मारताना तोच कुडता चक्क ८० टक्के डिस्काउंटवर गेलेला असतो! हाय रे दैवा! पण घाबरू नका! यासाठीही आमच्याकडे एक युक्ती आहे. प्रत्येक कपड्याला ‘रीटर्न पॉलिसी’ असते (आणि असावीच. ठरावीक अंतर्वस्त्रांना ती नसते, पण ती वेगळी गोष्ट आहे.). आधी ही रीटर्न पॉलिसी पाहून घ्या. त्वरित आताचा कुडता रीटर्नला टाका आणि लगेच तोच कुडता त्याच साईजमध्ये नवीन किंमतीत तिथूनच ऑर्डर करा! आहे ना मजा? (हे वाचताना काही जणी पटकन म्हणतील – हा काय ‘चिंधीपणा’ आहे? पण पुन्हा विचार करा! जर तुमचे १५०-२०० रुपये केवळ एका रीटर्न- रीऑर्डरने वाचत असतील तर तुम्हाला ते आवडणार नाही का? शिवाय तात्कालिक मानसिक समाधान वेगळं!)

आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी खरेदी करतो तेव्हा हाताशी वेळ कमी असल्याने हे करता येणार नाही. पण अनेकदा आपण फक्त ‘आवडले म्हणून’ खरेदी करत असतो. तेव्हा हे निश्चितच शक्य आहे.

नियम एकच- कपड्यावरचा ‘टॅग’ काढण्याची घाई मुळीच करायची नाही आणि कपडा ज्यात पॅक करून आला होता त्याच पिशवीत पुढचे काही दिवस पावतीसह राहू द्यायचा. पण यात त्रास तो काय?

‘३० डेज् रीटर्न’ सर्वोत्तम

आता अनेक ऑनलाईन शॉपिंग ॲप्समध्ये कपडे आणि ॲक्सेसरीजसाठी ३० दिवसांची ‘रीटर्न पॉलिसी’ असते. पण एका ॲपवर ‘३० डेज् रीटर्न’ आहे, म्हणून प्रत्येक ॲपवर ते मिळेल, असं मुळीच गृहित धरू नका. किंबहुना तुम्ही नीट पाहिलंत तर लक्षात येईल, की एकाच ॲपवरसुद्धा वेगवेगळ्या ब्रॅण्डस् साठी वेगवेगळी ‘रीटर्न पॉलिसी’ असते. काही ब्रॅण्डना ‘१५ डेज् रीटर्न’ मिळतं, तर काही ब्रॅण्डस् ना केवळ ‘७ डेज् रीटर्न’ असतं. कपडे वा ॲक्सेसरीज खरेदीच्या वेळी हे पाहायलाच हवं, नाहीतर नंतर पस्तावण्याची वेळ येते.

शिवाय प्रत्येक ऑनलाईन खरेदी ॲपला रीटर्न पॉलिसी मिळेलच अशी आपली समजूत असते. पण काही तुलनेने नव्या आणि समाजमाध्यमांवर वारंवार दृष्टीस पडणाऱ्या ॲप्सच्या रीटर्न पॉलिसीत काही तरी मेख असतेच, हेही तुमच्या लक्षात येईल. या सर्व गोष्टींमुळे रीटर्न आणि रीफंडच्या बाबतीत गाफील राहूच नका.

काही वेळा आपल्याला काही कपडे, चपला, ॲक्सेसरीज फार आवडतात, पण त्या आपल्याला कशा दिसतील, त्यात ‘कम्फर्टेबल’ वाटेल की नाही, याबद्दल आपल्यालाच शंका असते. तेव्हा तर रीटर्न आणि रीफंड पॉलिसी फार महत्त्वाची. त्या तपासल्या, की शॉपिंगच्या वस्तूंच्या अशा भरपूर ‘ट्रायल्स’सुद्धा तुम्हाला घेता येतील आणि त्याही एकही पैसा न गमावता!

‘शिपिंग चार्ज’ भरूच नका!
आता काही लोक म्हणतील, की ‘शिपिंग चार्ज’ भरण्याचे नाकारले, तर आमचे ऑनलाईन शॉपिंग पूर्ण होणार तरी कसे? तसे नाही हो! आम्हाला एवढंच म्हणायचंय, की आता अनेक शॉपिंग ॲप्स त्यांचा खप वाढवायला ‘शिपिंग चार्ज’ मुळातच पूर्णपणे माफ करू लागली आहेत. काही मेनस्ट्रीम ॲप्स तर अगदी तुम्ही १५०-२०० रुपयांचा दुपट्टा खरेदी केलात तरी त्यावर काहीही शिपिंग चार्ज आकारत नाहीत. अशी ‘नो शिपिंग चार्ज’ किंवा ‘नो कन्व्हिनिअन्स फी’ पॉलिसी ग्राहकासाठी सगळ्यात फायद्याची. काही वेळा आपल्याला एखादा टीशर्ट, टॉप, एखादी साधीशी चप्पल आवडलेली असते. त्याची किंमत फार नसते, पण केवळ शिपिंग चार्ज लागेल या भीतीनं आपण इतर काही ठराविक रकमेची खरेदी करायची वेळ येईपर्यंत वाट बघतो. या वेळेत आपल्याला आवडलेली वस्तू ‘आऊट ऑफ स्टॉक’ होते किंवा त्यावरचे डिस्काउंट कमी होते. त्यासाठी ही पॉलिसी तपासा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या.