हल्ली ‘बॉडी नर्चरिंग उत्पादनं’ विकणाऱ्या जवळजवळ प्रत्येक ब्रॅण्डची विविध सुगंधांची ‘बॉडी मिस्ट’ बाजारात उपलब्ध आहेत. बॉडी मिस्ट म्हणजे साध्या भाषेत सुगंधच. पण सुगंध तर बाजारात कित्येक परफ्यूम्सच्या रूपानं उपलब्ध होतेच की, तेही फार पूर्वीपासून. मग बॉडी मिस्ट आणि परफ्यूममध्ये फरक काय?

सुगंधी अर्काचं प्रमाण

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती

परफ्यूम आणि बॉडी मिस्ट या दोन्हीत वापरलेले घटक पदार्थ जवळपास सारखेच असतात. ते म्हणजे पाणी, अल्कोहोल, सुगंधी अर्क- म्हणजेच सुगंधी तेल (इसेन्शिअल ऑईल्स). परफ्यूममध्ये सुगंधी अर्क आणि अल्कोहोल दोन्ही बॉडी मिस्टच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतं. बॉडी मिस्टमध्ये मात्र सुगंधी अर्काचं प्रमाण कमी असल्यामुळे ते ‘डायल्युटेड’ असतं. अर्थातच परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकतो आणि बॉडी मिस्टचा तुलनेनं बराच कमी काळ. परफ्यूम हे शक्यतो कपड्यांवरूनच फवारले जातात. थेट त्वचेवर परफ्यूम फवारल्यास तिथे पुरळ येणं, खाज अशी समस्या निर्माण होऊ शकते. बॉडी मिस्ट मात्र थेट त्वचेवर फवारली तरी चालतात. त्यामुळे बॉडी मिस्टचा सुगंध जरी कमी टिकत असला, तरी ती त्वचेवर फवारल्यावर मंद सुगंध येण्याबरोबरच आपल्याला ‘फ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. काही बॉडी मिस्टमध्ये इतर काही त्वचास्नेही घटक वापरलेले असतात- उदा. कोरफडीचा अर्क वगैरे. सुगंध मंद असल्यामुळे बॉडी मिस्ट शक्यतो दिवसा- खास करून आंघोळीनंतर लगेच वापरली जातात आणि दिवसा वारंवारही वापरता येतात. तर परफ्यूम संध्याकाळी वा रात्रीच्या वेळी वापरणं अधिक चांगलं समजलं जातं.

सुगंध दरवळण्याचा काळ

‘बॉडी मिस्ट फारच डायल्युटेड असतं बुवा’ किंवा ‘निव्वळ पाणीच होतं ते! त्याचा सुगंध अजिबातच टिकला नाही’ अशी बहुतेक जणींची तक्रार असते. ती खरीच म्हणायला हवी. पण तुम्हाला त्वरित ताजंतवानं झाल्याची सुगंधी अनुभूती देणं एवढाच बॉडी मिस्टचा उद्देश आहे आणि तो ते पूर्ण करतं. परफ्यूमचा सुगंध मात्र बराच काळ दरवळत राहातो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही तो वास प्रभावित करतो. मात्र यामुळेच परफ्यूम खरेदी करताना चांगला सुगंध शोधणं अधिक गरजेचं ठरतं. वापरलेला परफ्यूमच मुळातच चांगल्या वासाचा नसेल किंवा तुमच्या मूडला किंवा प्रसंगाला तो साजेसा नसेल, तर तो बराच काळ टिकणारी डोकेदुखीही ठरू शकेल!

‘बॉडी मिस्ट’चा वास टिकावा म्हणून प्रथम आंघोळीसाठी त्याच विशिष्ट सुगंधाचं शॉवर जेल वापरा, नंतर त्याच सुगंधाचं मॉईश्चरायझर लावा आणि सर्वात शेवटी हे बॉडी मिस्ट फवारा, असा सल्ला उत्पादक कंपन्या देत असतात. त्यामुळे अशी एकाच सुगंधाच्या शॉवर जेल, बॉडी लोशन आणि बॉडी मिस्टची किटस् देखील कंपन्यांनी बाजारात आणलेली असतात. आम्हाला मात्र हा अधिक उत्पादनं खपवण्याचा प्रयत्न वाटतो! एकतर धावपळीच्या जगण्यात रोज आंघोळीसाठी शॉवर जेल वगैरेंचे चोचले पुरवणं शक्य नसतं. शिवाय हे सर्व वापरलं तरी त्यांचा एकत्रित सुगंधसुद्धा परफ्यूमच्या सुगंधाएवढा टिकेलच असं काही नाही. पण तुम्हाला ताजंतवानं वाटेल एवढं मात्र खरं.

किंमत

परफ्यूममध्ये सुगंधी अर्क अधिक असल्यानं त्यांच्या किंमती बॉडी मिस्टपेक्षा बऱ्याच जास्त असतात. अर्थात परफ्यूम अगदी कमी प्रमाणात फवारला तरी पुरतो, पण बॉडी मिस्ट मात्र अधिक प्रमाणात वापरावं लागतं. म्हणूनच परफ्यूमच्या बाटल्या इवल्याशा असतात. बॉडी मिस्ट मात्र १५० मिली, २०० मिली अशा बाटल्यांमध्ये येतं.

एक मात्र आहे, बॉडी मिस्ट असो किंवा परफ्यूम आपला मूड चांगला करण्यासाठी, डोकं शांत होण्यासाठी, तात्कालिक का होईना, पण आनंदी वाटण्यासाठी या ‘अरोमाथेरपी’चा उपयोग होत असतो. त्यामुळे यातलं काहीही वापरा, फक्त आपल्याला ज्यानं सर्वाधिक चांगलं वाटतं असा सुगंध मात्र शोधायला हवा!

Story img Loader