आराधना जोशी
रोज जेवायला काय करायचं? यापेक्षाही मोठा प्रश्न आईसमोर असतो तो म्हणजे मुलांना शाळेच्या खाऊच्या डब्यात काय द्यायचं हा? काय-काय अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊनच डब्यात नेमके काय पदार्थ द्यायचे, हे ठरवावे लागते. काही पदार्थ गार चांगले लागत नाहीत किंवा काही पातळ पदार्थ डब्यात देता येत नाहीत, काही पदार्थ मुलांना आवडत नाहीत, त्यामुळे टिफिन तसाच परत येण्याची शक्यता जास्त असते. शाळेमध्ये शिक्षक-पालक मिटिंगमध्येही मुलांच्या टिफिनवरून बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. काही मुलं सतत ब्रेडचे पदार्थ आणतात तर, काहीजण पोळी आणतात, पण त्यासोबत जॅम, तूप-साखर, गूळ-तूप असं आणताना दिसत असल्याची तक्रार अनेकदा पालकांकडे केली जाते.
खरंतर खूप विचारपूर्वक मुलांना टिफिन द्यायला हवा. कारण जर सकाळची शाळा असेल तर, ब्रेकफास्ट म्हणून तो टिफिन उपयोगी पडतो आणि जर दुपारची शाळा असेल तर, जेवण म्हणून. यासाठीच टिफिनमध्ये आपण जे देणार आहोत किंवा देतोय त्याने मुलांना किती पोषण मूल्यं मिळणार आहेत, याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलं वाढत्या वयाची असतील तर, त्यांच्या गरजा अजून वेगळ्या असतात आणि जर ती ॲथलिट असतील, खेळाडू असतील तर अशा मुलांना अधिक पोषणाची गरज असते. हे पोषण आहारातून आणि मुख्यतः टिफिनमधून त्याला मिळतंय का, याकडे लक्ष द्यायला हवं.
घरात सगळीच कामं मलाच करावी लागतात, त्यामुळे टिफिन बनवायला वेळ मिळत नाही, या सबबीखाली अनेकदा दुकानातून काहीतरी खाऊची पॅकेट्स विकत घ्यायची आणि ती टिफिनमध्ये रिकामी करून तो डबा मुलांना द्यायचा, असं अनेकदा घडताना दिसतं. योग्य वयात योग्य पोषण मिळालं नाही तर, कालांतराने कुपोषणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. हे कुपोषण जर आटोक्यात आलं नाही तर, येणारी पुढची पिढीही कुपोषितच जन्माला येणार!
हेही वाचा >> मुलांना घडवताना पालकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे
चवीसोबत प्रेझेंटेशनही महत्त्वाचं
मुलांचा टिफिन तयार करताना रोज त्यात वेगवेगळ्या पोषण द्रव्यांचा कसा समावेश करता येईल, याचाही विचार करायला हवा. पदार्थ कसा बनला आहे, याच्याही अगोदर तो कसा दिसतोय, त्यालाही तितकंच महत्त्व असतं. टिफिन उघडल्यानंतर वेगवेगळे रंग, वेगळे आकार जर मुलाला दिसले तर, तो पदार्थ खाण्याची इच्छा आपोआपच त्याला होईल. म्हणूनच पदार्थाचं प्रेझेंटेशनही लक्षात घ्यायला हवं. हल्लीच्या न्यूट्रल फॅमिलीमध्ये मुलांसाठी वेगळं, घरासाठी वेगळं, ऑफिसच्या डब्यासाठी वेगळं असे चारी ठाव पदार्थ होत नाहीत किंवा तेवढा वेळही नसतो. त्यामुळे संपूर्ण घरासाठी जे बनेल, तेच मुलांच्या टिफिनमध्ये दिलं जातं. शक्य असेल तर ते टाळावं.
मुलांशी बोलून टाईमटेबल ठरवा
यासाठी गरज असते थोड्याशा प्लॅनिंगची, तयारीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्तीची. मुलांना समोर बसवून, त्यांना विचारून आठवड्याच्या टिफिनचं चक्क टाइमटेबलच बनवून फ्रिजवर लावून ठेवावं. त्यासाठी लागणारी पूर्वतयारी, भाज्या, फळांची खरेदी आधीच करून ठेवली तर, आकर्षक, ताजा आणि चवदार टिफिन तयार करायला वेळ लागत नाही.
टिफिन बनवताना मुलांचं वय महत्त्वाचं
टिफिन देताना आपण कोणत्या वयातल्या मुलांसाठी तो बनवणार आहोत, हे विचारात घ्यायला हवं. नर्सरी ते साधारण तिसरीपर्यंतच्या मुलांना सहज उचलून घास तोंडात ठेवता येईल, असे पदार्थ द्यावेत. त्यासाठी तूप जिऱ्याची फोडणी दिलेल्या ज्वारीच्या लाह्या, चुरमुरे, नैसर्गिक रंग घालून केलेले तिखट मिठाचे शंकरपाळे, वेगवेगळ्या भाज्या किंवा कडधान्य घालून केलेले पराठे (तुकडे करून), व्हेज सँडविच (पालकाच्या चटणीसह), इडली (त्यातच भाज्या घालून तयार केली तर वेगळ्या चटणीची गरज नाही) असे पदार्थ देता येतात. हल्ली अनेक शाळांमधून टिफिनमध्ये काय आणायचं याची लिस्टच दिलेली असते. तसं असेल तर, आईचे काम सोपं होतं किंवा काही ठिकाणी लहान मुलांना शाळेकडूनच पोषक आहार दिला जातो.
हेही वाचा >> लग्न ठरलं, आता पालकत्वाबाबत तुमचा काय प्लॅन? नवजोडप्यांनी यावर विचार करणं का गरजेचं आहे? जाणून घ्या!
मोठ्या वर्गात गेलेल्या मुलांना टिफिन जरा जास्त लागतो. वाढतं वय असल्याने भूकही जास्त असते. मात्र कमी वेळेत टिफिन संपवून खेळण्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. म्हणून अनेकदा उभ्यानेच टिफिन संपवण्याकडे कल असतो. अशा मुलांसाठी पोळी भाजी ऐवजी तिचा नवा अवतार फ्रॅंकी, थालिपीठ, मिक्स पिठांची धिरडी, पुरी, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ तसेच चायनीज फ्राईड राईस, चायनीज न्यूडल्स (भरपूर भाज्या घालून) असे पदार्थ द्यावेत. सोबत एखादं फळ (स्वच्छ धुवून पण न चिरता), काकडी, टोमॅटोच्या चकत्या, थोडासा सुका मेवा अवश्य द्यावा.
हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे, कोणत्याही वयाची मुले वारंवार आजारी पडून डॉक्टरांची औषधे घेऊ नयेत, इतकाच. मुलं आजारी पडली तर, पालकांची चिंता वाढते. शाळा बुडते, बुडालेला अभ्यास भरून काढण्याचं टेन्शन वाढतं. म्हणूनच ‘आहार हेच आपले औषध’ हा विचार लहानपणापासूनच मुलांना समजावून सांगा. त्याप्रमाणे मुलांचा टिफिन तयार करा. मदतीला असंख्य युट्युब चॅनल्स आहेतच!