डॉ. स्वाती हजारे
जन्मानंतर आईचे दूधच हाच बालकांचा सर्वोत्तम आहार असतो. पहिले सहा महिने आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टी बालकांना देऊ नयेत. कारण बालकांची पचनसंस्था अपरिपक्व असल्याने आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर आहार त्यांना पचवता येत नाही. त्याचा भार नाजूक, अपरिपक्व अवयवांवर म्हणजेच आतड्यांवर होऊन त्यांची वृद्धी/ पक्वता होण्याऐवजी हानी होते. त्याचा परिणाम बालकाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

अगदी पाण्यापासून ते सर्व पोषक तत्वे आईच्या दुधातून बालकाला मिळत असल्यामुळे पहिले सहा महिने पाण्याचीही आवश्यकता बाळास नसते. परंतु जर काही कारणास्तव बालकांना आईचे दूध मिळाले नाही- उदा. आईला दूध कमी असणे किंवा आईला दूध आलेच नाही किंवा बालकांमधील काही अवस्था- ज्यामध्ये आईचे दूध बालकास दिले जात नाही, अशा परिस्थितीमध्ये पावडरचे दूध (फॉर्म्युला) बालकांना दिले जाते. ही बाळांसाठीची दूध पावडर तयार करणाऱ्या अनेक कंपन्या असून पावडर : पाणी यांचे प्रमाण किती असावे हे त्यांच्या पाकिटावर लिहिलेले असते. साधारणत: हे प्रमाण ३० मिली पाणी + १ चमचा पावडर असे असते. परंतु यामध्ये हा चमचा त्या पाकिटात दिलेलाच वापरावा. यात पाण्याचे प्रमाण कमी-जास्त झाले, तर हे दूध पातळ किंवा घट्ट होते, ज्याचा बालकांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून सांगितलेल्या पद्धतीने, त्याच प्रमाणात ते तयार केले गेले पाहिजे. तसेच स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे.

आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला

काही ठिकाणी आईचे दूध नसेल तर गायीचे दूध बाळाला पाजले जाते. परंतु काही नवीन संशोधनांनुसार किमान एक वर्ष वय पूर्ण होईपर्यंत बालकांना गायीचे दूध दिले जाऊ नये. कारण गायीच्या दुधात असलेल्या काही प्रथिनांची ॲलर्जी बालकांना असू शकते. ज्याला सीएमपीए (CMPA – COW MILK PROTIEN ALLERGY) असे म्हणतात. यामध्ये बालकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा विष्ठेमधून रक्त जाणे, अशी अनेक लक्षणे आढळून येतात. म्हणून अशा अवस्थेत पावडरचे दूध (Formula Milk) दिले जावे.

आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…

सहा महिने पूर्ण झाल्यावर बालकांना वरचा आहार चालू केला जाऊ शकतो. पण आईचे दूध तसेच चालू ठेवून, वरचा आहार दिला जावा. म्हणून याला कॉम्प्लीमेंटरी किंवा पूरक (Complimentary Food) असे म्हटले जाते. हा आहार पातळ स्वरुपात- सुरुवातीस दिला जावा आणि तो १-२ वेळा दिवसातून असा सुरू करावा. नंतर हळूहळू त्याच्या स्वरुपास थोडे घट्ट करत जाऊन याच्या वेळा वाढवल्या जाव्यात. तसेच वयानुसार/ भुकेनुसार प्रमाण वाढवत जावे. यात भाज्या, फळे, कडधान्य, धान्य अशा भागांचा समावेश करावा. अंडे सोडून इतर मांसाहार बाळाला पचेल तसा दिला जावा. एका आठवड्याला एक पदार्थ नवीन असा वाढवत जावा. यामध्ये जर कोणत्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी असेल तर ती लक्षात येते व तद्नुसार ते पदार्थ टाळले जाऊ शकतात.

आणखी वाचा : उपवस्त्र ते प्रतिष्ठितवस्त्र

बालके जशी मोठी होऊ लागतात तसा यांचा आहार वाढून स्तनपान कमी होऊ लागते. एक वर्षांनंतर बालक व्यवस्थित जेवत आहे, तर स्तनपान चालू ठेवावे का? असा काही पालकांना प्रश्न पडतो. किंवा स्तनपानामुळे मुले वरील आहार व्यवस्थित घेत नाहीत असेही काही पालकांना जाणवते. तर हा एक बालकाच्या मानसिक वाढीचा भाग आहे. कारण बालकाच्या शारीरिक गरजा तर वरचा आहार भागवते, परंतु मानसिक सुरक्षिततेची भावना स्तनपान देते. ते बालकाला मानसिक स्थैर्य देते.

आणखी वाचा : ‘ये लडकी बहुत आगे जाएगी!’

याशिवाय बालकांना दात येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या हिरड्यांना सूज येते. त्यामुळे ही बालके खाली पडलेली खेळणी किंवा काही कडक पदार्थ चावायचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बालकांना जुलाब/ उलट्या होत असतात. रांगत असताना तेच हात बालके तोंडात घालतात. त्यामुळेही जंतूसंसर्गाचे प्रमाण वाढत असते. त्या वेळी आईचे दूध अशा अवस्थेत वारंवार होणाऱ्या जंतूसंसर्गाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांना देते. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे बाळांना जितकी जास्त वर्षे स्तनपान चालू राहील तितकी वर्ष अशा अनेक व्याधीविरुद्ध लढण्याची ताकद त्याच्या शरीराला आईच्या दुधातून मिळत राहील. म्हणजेच बालकाची शारीरिक तसेच मानसिक वाढ सर्वांगीण राहील.
drswatihajare@gmail.com

Story img Loader