आजचे स्लाइडशो स्वरूपातील गुगल डूडल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध वैज्ञानिक प्रयोगांची मांडणी या स्लाइडशोमध्ये करण्यात आली आहे. जागतिक तापमानवाढीसाठी अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे ग्रीनहाऊस. ग्रीनहाऊस तापमानवाढीसाठी कशाप्रकारे कारणीभूत ठरतात यासंदर्भात डॉ. युनिस न्यूटन फूट यांनी संशोधन केले. आज गुगल डूडलमध्ये युनिस फूट यांच्या २०४ व्या जन्मदिनानिमित्त त्यांची माहिती देण्यात आली आहे. यानिमित्ताने त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होत्या डॉ. युनिस फूट ?

गुगलच्या आजचा स्लाइडशो डूडलमध्ये शास्त्रज्ञ युनिस फूट यांचे कार्य सांगितलेले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या युनिस न्यूटन फूट यांचा आज २०४ वा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म दि. १७ जुलै, १८१९ मध्ये अमेरिकेतील शेतकरी कुटुंबामध्ये झाला. युनिस यांना लहानपणापासून नृत्य, कला यांच्यापेक्षा बीजगणित, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, हवामानशास्त्र अशा विज्ञानविषयांची आवड होती. त्यांनी ट्रॉय फिमेल सेमिनरीमध्ये शिक्षण घेतले. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड आहे, त्यांना विविध प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असे. तसेच त्यांच्यासाठी खास वैज्ञानिक चर्चासत्रे आयोजित करण्यात येत असत. तसेच, न्यूयॉर्कमध्ये त्या अनेक वर्षे वास्तव्याला होत्या. त्या काळात घडलेली स्थित्यंतरे त्यांच्यावर परिणाम करत होती. त्यातूनच त्या समाजवादी आणि स्त्री कार्यकर्त्या झाल्या.

डॉ. युनिस फूट यांचे कार्य

लहानपणापासून डॉ. युनिस फूट यांच्यामध्ये असणारी विज्ञानाची आवड भविष्यातही कायम राहिली. त्यांनी विज्ञानामध्ये आपले संशोधन सुरु केले . यासह त्या महिला संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागल्या. १८४८ मध्ये सेनेका फॉल्स कन्व्हेन्शन या पहिल्या महिला हक्क अधिवेशनात त्या सहभागी झाल्या. अधिवेशनाच्या संपादकीय समितीच्या त्या सदस्य होत्या. महिलांच्या हक्क, अधिकार यांच्या एका दस्तावेजावर पाचवी स्वाक्षरी करणाऱ्या डॉ. फूट या एक होत्या. त्यांनी सामाजिक आणि कायदेशीर स्थितीत महिलांसाठी समानतेची मागणी केली.

हेही वाचा : गटारी अमावस्येला कोकणाने पाहिलेले ‘ते’ २ अपघात; करुण अंताची कहाणी…

यावेळी, स्त्रियांना वैज्ञानिक क्षेत्रापासून मोठ्या प्रमाणात दूर ठेवले गेले. परंतु, डॉ. फूट यांनी स्वतः काही उपकरणे तयार केली. थर्मामीटर साठी त्यांनी काचेच्या उभ्या बाटलीत पारा ठेवला. त्याद्वारे त्यांनी तापमान मोजले. कार्बनडायॉकसाईडची वाढती पातळी वातावरणातील तापमानवाढीस कारणीभूत ठरते असे संशोधन त्यांनी मांडले. ग्रीन हाऊसचा तापमानवाढीवर परिणाम होतो, हे सांगणाऱ्या डॉ. युनिस फूट या प्रथम शास्त्रज्ञ होत्या.

फूट यांनी त्यांचे संशोधन प्रकाशित केल्यानंतर, प्रोसीडिंग्ज ऑफ द अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या जर्नलमध्ये वातावरणातील स्थिर विद्युतावर त्यांनी अभ्यास सुरु केला. अमेरिकेतील एका महिलेने प्रकाशित केलेले हे पहिले दोन भौतिक शास्त्रातील अभ्यास होते. १८५६ च्या सुमारास, अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक बैठकीत एका पुरुष शास्त्रज्ञाने डॉ. फूट यांचे संशोधन कार्य सादर केले. त्या चर्चांमुळे पुढील प्रयोग झाले, त्यातून ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणून ओळखले जाणारे संशोधन पुढे आले. जेव्हा कार्बन डायऑक्साइडसारखे वायू सूर्यापासून उष्णता घेतात तेव्हा पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान हळूहळू वाढते, असे मत डॉ. फूट यांनी मांडले. तसेच डॉ. फूट यांनी काही यंत्रे स्वतः बनवली. कागदनिर्मितीचे यंत्र हे त्यांनी स्वतः तयार केले होते. सतत कार्यरत असणाऱ्या डॉ. फूट यांचे सप्टेंबर, १८८८ मध्ये मॅसॅच्युसेट्स येथे निधन झाले.

हेही वाचा : चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत ‘नासा’ आणि ‘इस्रो’मध्ये फरक का आहे ? ‘नासा’ ४ दिवसात तर ‘इस्रो’ला ४० दिवस का ?

१९ व्या शतकात जेव्हा महिलांना समान हक्क नव्हते त्या काळात स्वतः संशोधन करून, जागतिक तापमानवाढीविषयी प्रथम संशोधन करणाऱ्या डॉ. युनिस फूट अनेकांना मार्गदर्शक ठरल्या. तत्याच्यावरती माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. तसेच त्यांचे संशोधन विविध सायन्स जर्नलमधून प्रकाशित करण्यात आले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who did the first research on the effects of greenhouse on temperature who is eunice foote vvk