Shreyanka Patil : महिला प्रीमियर लीग २०२४ नुकतीच पार पडली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवत महिला प्रीमियर लीग २०२४ चा किताब आपल्या नावी केला. हा अंतिम सामना अतिशय रोमांचक ठरला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे, पण याचबरोबर आरसीबीच्या श्रेयंका पाटीलचे नावसुद्धा प्रकाशझोतात आले आहे.

२१ वर्षीय श्रेयंका पाटीलने महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात श्रेयंकाने अप्रतिम गोलंदाजीने सर्वांचे मने जिंकले. तिने ३.३ षटकांमध्ये फक्त १२ धावा देत चार विकेट घेतल्या. ती महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम स्पेल टाकणारी गोलंदाज ठरली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, २१ वर्षीय श्रेयंका पाटील कोण आहे? आज आपण आरसीबीच्या या महिला क्रिकेटर स्टारविषयी जाणून घेणार आहोत.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

कोण आहे श्रेयंका पाटील?

श्रेयंका पाटीलचा जन्म ३१ जुलै २००२ रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. श्रेयंका ही एक उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज आहे. २०१९ मध्ये कर्नाटककडून १६ वर्षीय वयोगटात खेळून तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ती वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे
श्रेयंका पाटीलचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. लहानपणापासून तिला आयपीएल बघायची आवड आहे आणि ती विराट कोहली आणि आरसीबीची खूप मोठी चाहती आहे. ती विराट कोहलीला तिचा आदर्श मानते. आरसीबीची चाहती ते आरसीबीची क्रिकेटरपर्यंतचा तिचा प्रवास खूप रोमांचक आहे.

हेही वाचा : आचारी वडिलांच्या लेकीचं गोड यश! अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळताच सरन्यायाधीशांनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट, कोण आहे प्रज्ञा सामल?

श्रेयंकाचा क्रिकेटचा प्रवास

२०१९ मध्ये कर्नाटककडून तिने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने जून २०२३ मध्ये आशिया कपच्या टी-२० स्पर्धेत इंग्लडविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात पहिल्यांदा खेळली. तिने ९ विकेट घेत स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला होता. डिसेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यात (WODI) ती खेळली. पाटील २०२३ मध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गुयाना अमेजन वॉरियर्स संघाकडूनसुद्धा खेळली. त्यावेळी ती पुन्हा एकदा सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली होती.
यंदाच्या महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर आरसीबीने दणदणीत विजय मिळवला. याशिवाय ती महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली आहे. तिने एकूण १३ विकेट घेतल्या आहेत. श्रेयंकाला पर्पल कॅप मिळाली, याशिवाय तिला इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कार मिळाला.

रणजी आणि १६ वर्ष वयोगटात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्यापासून आरसीबीची चाहती असणाऱ्या श्रेयंका ही त्याच संघाची आज स्टार बनली. तिचा हा उल्लेखनीय प्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे. महिला क्रिकेट संघाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण श्रेयंकासारख्या खेळांडूमुळे महिला क्रिकेट संघ आज पुढे जाताना दिसत आहे. अवघ्या २१ वर्षांची श्रेयंका अनेक महिला आणि तरुण मुलींसाठी प्रेरणा आहे. क्रिकेटमध्ये आवड असणाऱ्या तरुणींनी श्रेयंकाचा आदर्श जपत देशासाठी खेळण्याची जिद्द बाळगायला हवी.

Story img Loader