Who is Avani Lekhara Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकची सुरुवात भारताने गोल्ड मेडलच्या जोरावर केली आहे. भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले असून अवनीने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. अवनी हिने २४९.७ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. पण, ही कसर आता अवनीने भरून काढली आहे.
कोण आहे अवनी लेखरा?
अवनी भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणून उदयास आली आहे. अवनी मुळची जयपूरची. आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने क्रीडाविश्वात नवा आदर्श निर्माण केला असला तरी तिचा हा प्रवास खरंतर तिच्यासाठी सोपा नव्हता. अवनी लेखरा हिच्यासाठी पॅरिस पॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास खडतर होता. तिचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय आहे. २०१२ मध्ये वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी एका अपघातामुळे तिला अर्धांगवायू झाला आणि तिला चालण्यासाठी व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. त्यानंतर तिचे आयुष्य प्रचंड संघर्षमय बनले. या कठीण प्रसंगाला तिने मोठ्या हिमतीने तोंड दिले आणि यशाकडे वाटचाल केली. ती अपंग झाली तेव्हा अवनीच्या वडिलांनी तिच्या धावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याने तिला या खेळासाठी दाखल केले. तिला शारीरिक वेदना असूनही, अवनीच्या मानसिक भावनेने तिला धनुर्विद्या, सराव, लक्ष आणि शिस्त आवश्यक असलेला खेळ घेण्यास प्रवृत्त केले.
२०१५ मध्ये शूटिंगच्या जगात प्रवेश
अभिनव बिंद्रापासून प्रेरित होऊन अवनीने २०१५ मध्ये स्पर्धात्मक शूटिंग सुरू केले. तिच्या समर्पण आणि नैसर्गिक प्रतिभेने तिला पटकन यश मिळवून दिले. शूटिंगसोबतच अवनी अभ्यासातही हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जयपूरच्या केंद्रीय विद्यालयातून झाले आहे. तिचा शूटिंगचा प्रवासही येथूनच सुरू झाला. ती सध्या राजस्थान विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेत आहे.
अवनीच्या क्रीडा इतिहासाचा शिखर २०२१ मध्ये आला, जेव्हा तिने पॅरालिम्पिक गेम्समध्ये इतिहास रचला आणि त्याच स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरालिम्पियन बनली. या कामगिरीबद्दल अवनीला भारत सरकारने पद्मश्री आणि खेलरत्न यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले होते. अवनीचे समर्पण भारताला अभिमानास्पद बनवत आहे.