ती एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याची पत्नी आहे, दोन किशोरवयीन मुलांची आईही आहे आणि सध्या तिनं वयाची ‘फक्त’ 50 वर्ष पूर्ण केली आहेत. एके काळी पूर्णवेळ गृहिणी असलेल्या या आईला तिचा पती आणि मुले नेहमीच पाठिंबा देतात. तरूणांना लाजवेल अशा या उत्साही जागतिक दर्जाच्या पॉवरलिफ्टरचं नाव आहे भावना भावे टोकेकर. भावनानं वयाच्या 41 व्या वर्षी वजन उचलण्यास सुरुवात केली आणि आज ती यशस्वी पॉवरलिफ्टर आहे. इन्टाग्रामवर तिचे हजारों चाहते तिच्या सुवर्ण कामगिरीच्या पोस्टकडे नजर लावून असतात हे विशेष.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भावनानं इंग्लंडमध्ये मँचेस्टर इथं नुकत्याच झालेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत पूर्ण पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस इव्हेंटमध्ये 75 किलो वजनी गटात अव्वल क्रमांक पटकावला. इतकंच नाही तर तिनं आधीचे ४ विश्वविक्रम मोडीत काढले. आश्चर्य म्हणजे ती या स्पर्धेत ती मास्टर 3 ॲथलिट (वय 50-54) म्हणून सहभागी झाली होती !
भावनाचं कुटुंब मूळचं पुण्याचं. तिची मातृभाषा मराठी आहे. मध्य प्रदेशात जन्मलेल्या भावनाचं कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झालं. बागकामा सारख्या उपक्रमांमध्ये ती नियमितपणे सहभागी होत असे. ती जिल्हा स्तरावर टेबल-टेनिसही खेळली. गुजरातमधील पंचमहाल संघाचं प्रतिनिधित्व तिनं केलं.
भारतीय हवाई दलाचे फायटर पायलट आणि कारगिल वॉर हिरो ग्रुप कॅप्टन श्रीपाद टोकेकर यांच्याशी भावनानं लग्न केलं. भावना नेहमीच तंदुरुस्तीबद्दल जागरूक राहिली. तिचा त्या दिशेनं प्रवास 2011 मध्ये सुरू झाला. डॉक्टरनं लिहून दिलेल्या औषधाचा प्रतिकार करण्यासाठी तिनं सायकलिंगला सुरुवात केली. ती जिममध्ये योग्य प्रशिक्षण घेऊ लागली. भावना ही एक लांब पल्ल्याची धावपटू (8-10 किलोमीटर) आहे आणि तिने काही मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. वजन उचलण्यात हात मारायला सुरूवात करण्यापूर्वी तिनं दोन अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या. भावनाला हवाई दलाच्या शरीरसौष्ठवपटूंनी वेटलिफ्टिंग / पॉवरलिफ्टिंगसाठी प्रवृत्त केलं आणि हवाई दलाच्या संघाच्या सावध, सराईत नजरेखाली जवळजवळ सहा वर्षे तिनं सतत रीतसर प्रशिक्षण घेतलं.
अधिक अभ्यास करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तिनं इंटरनेटची मदत घेतली. विशेषत: यूट्यूब व्हिडिओंद्वारे तिला प्रेरणा मिळाली. मग तेव्हा नव्यानं देशात आलेल्या ‘इंस्टाग्राम’शी तिची ओळख झाली. तिनं या प्लॅटफॉर्मवर मिळू शकणार्या सर्व फिटनेस पृष्ठांचे अनुसरण करायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवरच ती वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेस (WPC) कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे राज्य प्रमुख मोहम्मद अजमत यांच्या संपर्कात आली. अझमत यांच्या व्हिडिओंद्वारे तिला प्रोत्साहन मिळालं. ‘मी भारतीय पॉवरलिफ्टिंग संघात सहभागी होऊ शकते का ?’ असा सवाल तिनं त्यांना विचारला. अजमत यांनी होकार दिला आणि तिला बेंगळुरूला येऊन चाचण्या देण्यास सांगितले. स्नायुयुक्त आणि मर्दानी दिसण्याबद्दल सुरुवातीला तिला स्पष्टपणे प्रतिबंध होता, परंतु काही ऑनलाइन संशोधनामुळे हे गैरसमज बाजूला झाले.
गैरसमज आहे की वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग अगदी सारखेच आहेत, मात्र ते तसं निश्चितपणे नाही. पॉवरलिफ्टिंगच्या नियमांचं पालन करण्यासाठी तिला तंत्रात बदल करावे लागले आणि अजमतच्या यांच्या काटेकोर मार्गदर्शनाखाली तिनं वेगानं ते केलं. बेंगळुरूच्या चाचण्यांदरम्यान तिनं पॉवरलिफ्टिंगचं तंत्र आणि नियम जाणून घेतलं आणि मे 2019 मध्ये मास्टर्स 2 श्रेणीसाठी (40-45 वयोगट) तिची निवड झाली.
जुलै 2019 मध्ये रशियामध्ये ओपन एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी चार सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. 47 वर्षांची असताना तिनं रशियातील चेल्याबिन्स्क इथं झालेल्या खुल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 4 पदकं जिंकत आपलं नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं. आणि प्रेरणा शोधत असलेल्या सर्व भारतीयांसाठी ती प्रकाशझोतच ठरली.
सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पदक मिळवून देईपर्यंत भारतात वेटलिफ्टिंग /पॉवरलिफ्टिंग हा सहसा पुरुषांचा खेळ मानला जात असे. शरीर वाढवणं आणि स्नायू तयार करणं ही गोष्ट आपल्या देशात फक्त पुरुषच करतात ही साचेबंद चौकट त्यानंतर अनेक महिला वेटलिफ्टरनी मोडली. एक गृहिणी असलेल्या भावनानं त्याही पुढे जात स्वप्नांना (पाहायला आणि पूर्ण करायला) वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. नियमितपणे इन्स्टाग्रामवर स्वतःचे वजन- प्रशिक्षणाचे आणि यशस्वी कामगिरीचे व्हिडिओ ती पोस्ट करते. त्या पोस्ट बघून चाहते थक्क होतात. अनेकजण त्यांच्या फिटनेस प्रवासाची सुरूवात करतात…