कॅप्टन गीतिका कौल यांची जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सियाचीनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला महिला डॉक्टर बनल्या आहेत. ‘फायर अॅण्ड फ्युरी’ कॉर्प्सने मंगळवारी ही माहिती दिली. प्रतिष्ठित सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर गीतिका यांनी हे यश संपादन केले.

हेही वाचा- Crime Against Women : “गुन्हे वाढले नाहीत, महिला पुढाकार घेऊन FIR दाखल करत आहेत”

भारतीय लष्कराच्या लेहस्थित ‘फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्स’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. काही छायाचित्रे शेअर करताना ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ने पोस्टमध्ये लिहिले आहे, “सियाचीन बॅटल स्कूलमध्ये यशस्वीरीत्या इंडक्शन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल यांची सियाचीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत गीतिका कौल?

कॅप्टन गीतिका कौल या भारतीय लष्करातील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या वैद्यकीय अधिकारी आहेत. मेडिकल ऑफिसर होण्यासाठी त्यांनी सियाचीन बॅटल स्कूलमधून कठोर प्रशिक्षण घेतले आहे. उंचावर चढणे, अतिथंड वातावरणात आवश्यक असलेली विशेष वैद्यकीय कौशल्ये, तसेच अत्यंत कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत. सियाचीनमध्ये सैनिकांचा कार्यकाळ तीन महिन्यांचा असतो. गीतिका यांच्याआधी या वर्षी जानेवारीत पहिल्यांदा सियाचीनमध्ये कॅप्टन शिवा चौहान या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधील

हेही वाचा- प्रिय केतकी, पत्रास कारण की.. तुझ्या धाडसाचं खूप खूप कौतुक!

कॅप्टन गीतिका कौल यांना सियाचीनमध्ये तैनात करण्यात आले आहे. सियाचीन ही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी आहे. या भागातील तापमान नेहमी उणे स्थितीमध्ये राहते. भारत आणि पाकिस्तानसाठी ही युद्धभूमी खूप महत्त्वाची आहे. हिमालयाच्या काराकोरम पर्वतश्रेणीच्या पूर्वेकडील भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५,७५३ मीटर म्हणजेच २० हजार फूट उंचीपर्यंत याचा विस्तार आहे. येथून भारतीय लष्कराचे जवान लेह, लडाख आणि चीनवर बारीक नजर ठेवून असतात. भारतीय लष्कराने १९८४ मध्ये सियाचीनमध्ये आपला लष्करी तळ बनवला.

Story img Loader