भारत आणि आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदाणींचा समावेश झाला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदाणी यांनी मोठी झेप घेतली आहे. उद्योगपती गौतम अदाणी हे आज कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. जीत अदाणी हे या भारतीय उद्योगपतीचे सर्वांत लहान पुत्र आहेत. अदानी पोर्ट्स आणि एसईझेड लि.चे सीईओ पद भूषविणारा त्यांचा भाऊ करण अदाणी यांच्याप्रमाणेच जीत अदाणी यांनी अलीकडच्या वर्षांत मोठी कामगिरी केली आहे. जीत अदाणी सध्या समूहातील फायनान्स विभागाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी करिअरची सुरुवात ग्रुप सीएफओ पदावरून केली होती. जीत अदाणी कदाचित जगातील सर्वांत श्रीमंत २६ वर्षांच्या व्यक्तींपैकी एक आहेत. कारण- त्यांचे वडील आशियातील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा जैमीन शाह कोण आहे?

१२ मार्च २०२३ रोजी अहमदाबादमध्ये जीत आणि दिवा जैमीन शाह यांचा साखरपुडा अगदी साधेपणाने करण्यात आला. सोहळ्यासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अदाणी कुटुंबीयांची होणारी धाकटी सून दिवा जेमीन शाह ही एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचे वडील हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या दिवा सी दिनेश अॅण्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. त्यांची कंपनी मुंबई आणि सुरत स्थित आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवा जेमीन शाह तिच्या वडिलांना व्यवसायामध्ये मदत करते.

कोण आहे जीत अदाणी?

गौतम अदाणी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदाणी आणि धाकट्याचे नाव जीत अदाणी आहे. धाकटा मुलगा जीत अदाणी याचा जन्म ७ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. जीत अदाणी यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. जीत अदाणी समूहाशी संबंधित आहेत. जीत अदाणी यांची २०२२ मध्ये अदाणी समूहामध्ये उपाध्यक्ष (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जीत अदाणी समूहाच्या एअरपोर्ट व्यवयासासह अदाणी डिजिटल लॅब्सचेही नेतृत्व करतो. अदाणी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. अदाणी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल व वायुउत्खनन, वीजनिर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण, कोळसा खाण या व्यवसायांत गुंतलेला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is diva jaimin shah jeet adanis fiance and gautam adanis chhoti bahu chdc pdb
Show comments