टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव्ह यांना शनिवारी संध्याकाळी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. रॉयटर्सने दिलेल्या महितीनुसार, टेलीग्रामवर कंटेट मॉडरेटरची कमतरता आणि पोलिसांच्या सहकार्याच्या अभावामुळे प्राथमिक पोलीस तपासाचा भाग म्हणून दुरोव्ह यांना अटक करण्यात आली आहे. मॉडरेटरची कमतरता असल्यामुळे टेलीग्रामवर गुन्हेगारी कृत्ये वाढली आहेत, असे पोलीस अधिकार्‍यांचे सांगणे आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा दुरोव्ह यांना अटक झाली तेव्हा त्यांच्याबरोबर एक २४ वर्षीय महिला देखील होती. जुली वाविलोवा असे या तरुणीचे नाव आहे. जुली हिने दुरोव्ह यांच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी अटकळ पसरली आहे. एका X पोस्टवरून अटकळ सुरू झाली होती ज्यात जुलीचा विमानातील फोटो होता आणि कॅप्शनमध्ये दुरोव्ह त्याच्याबरोबर असलेली महिला असे लिहिले होते.

हेही वाचा – नासामधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘ही’ तरुणी झाली IRS आणि IPS अधिकारी! वाचा अनुकृती शर्माची प्रेरणादायी गोष्ट

षड्यंत्राबाबत सिद्धांत मांडणाऱ्यांच्या (conspiracy theoris) मते, ती महिला तिच्या आणि दुरोव्हच्या प्रवासाची प्रत्येक गोष्ट पोस्ट करत होती ज्यामुळे एजन्सींनादुरोव्हच्या स्थानाचा मागोवा घेणे सोपे होते कारण दुरोव्ह बराच काळ एजन्सीच्या रडारवर होता.

हेही वाचा – Afghanistan Taliban Rules For Women : आता स्त्रियांच्या आवाजावरही बंदी, तालिबानच्या नव्या फतव्यात महिलांवर जाचक निर्बंध!

जुली वाविलोवा कोण आहे? (Who is Juli Vavilova?)

जुली वाविलोवा ही क्रिप्टो कोच आणि दुबई येथील स्ट्रीमर असल्याचे सांगितले जाते. जुलीचे इंस्टाग्रामवर २२.३ K फॉलोअर्स आहेत. तिच्या इंस्टाग्राम बायकोमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिला चार भाषा येतात: इंग्रजी, रशियन, स्पॅनिश आणि अरबी. गेमिंग, क्रिप्टो, भाषा आणि मानसिकता(mindset) ही तिची आवड आहे. कझाखस्तान(Kazakhstan) , किर्गिस्तान (Kyrgyzstan ) आणि अझरबैजान (Azerbaijan) अशा विविध ठिकाणी पावेलबरोबर तिचे अनेक फोटो आहेत.

मोसाद एजंट? हनी ट्रॅप? (A Mossad agent? Honey trap?)

३८ वर्षीय व्यक्तीच्या मालकीच्या ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण नसल्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी पावेल दुरोव्हविरुद्ध वॉरंट काढले होते. प्लॅटफॉर्मवर मनी लाँड्रिंग, अंमली पदार्थांची तस्करी आणि pedophilic content देवाणघेवाण यासह बेकायदेशीर गोष्टींमध्ये गुंतल्याचा आरोप आहे. शनिवारी त्याच्या अटकेनंतर पावेलला ९६ तासांपर्यंत चौकशीसाठी ठेवले जाऊ शकते आणि त्यानंतर त्याच्यावर आरोप लावावे लागतील.

फ्रँको-रशियन अब्जाधीश अझरबैजानमधून त्याच्या खाजगी जेटने प्रवास करत होते आणि ले बोरगेटला पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर जुलीलाही अटक करण्यात आली होती. पण जुलीमुळे पावेलला अटक झावी असावी असा अंदाज बांधला जात आहे कारण कारण ती पावेलचे ठिकाण धोरणात्मकरित्या उघड करत होती. षड्यंत्राबाबत सिद्धांत मांडणारे तिला मोसाद एजंट म्हणून संबोधत आहे पण अधिकाऱ्यांकडून कोणताही माहिती अधिकृतपणे अद्याप जाहीर झालेली नाही. जुली पावेलची गर्लफ्रेंड आहे , ते दोघे कधीपासून डेटिंग करत आहेत याबाबत हे निश्चितपणे माहित नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is juli vavilova mystery woman present with telegram ceo pavel durov during his arrest snk