Karnam Malleswari Indian First Women Olympic Winner : पॅरिसमध्ये क्रिडोत्सवाची धूम सुरू असून अनेक महिला खेळडू यात आपलं कौशल्य दाखवत आहेत. विविध क्रिडा प्रकरातील निपूण असलेल्या खेळाडू आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत असून स्टार नेमबाज मनू भाकेर हिनेही भारताचं ऑलिम्पिकच्या ट्रॉफीवर कोरलंय. त्यामुळे एकूण महिला खेळाडंचं प्रचंड कौतुक होतंय. पण भारताची पहिली महिला ऑलिम्पिक विजेती कोण तुम्हाला माहितेय का? याच विषयी आपण आज जाणून घेऊयात.

भारताची माजी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी (Karnam Malleswari) या ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्यांनी २००० सिडनी ऑलिपम्पिकमध्ये महिलांच्या ६९ किलो गटात कांस्यपदक मिळालं होतं. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी प्रशिक्षक नीलमशेट्टी अप्पाण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लेश्वरी यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. त्यानंतर उत्तम प्रशिक्षणासाठी त्या दिल्लीत स्थलांतरीत झाल्या.

Maharashtra kesari woman wrestling marathi news
महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीचा रंगणार फड, येणार नामवंत मल्ल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Indian cricket team to play warm up match in Dubai ahead of Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
Many youths participated in the Wardha bodybuilding competition
शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi's record during IND vs AUS Sydney Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

हेही वाचा >> कर्णम मल्लेश्वरी ते मनू भाकर! ऑलिम्पिकमध्ये ‘या’ ८ महिला खेळाडूंनी देशाला जिंकून दिली पदकं

अनेक स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड

१२ व्या वर्षी प्रशिक्षण सुरू केल्यानंतर मल्लेश्वरी (Karnam Malleswari) राष्ट्रीय शिबिरात सामील झाल्या आणि अवघ्या चार वर्षांनंतर त्या ५४ किलो वर्गात विश्वविजेत्या म्हणून उदयास आल्या. १९९३ च्या मेलबर्न वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये ५४ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या रुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लेश्वरी यांची पहिली महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली. त्यांनी १९९४ मध्ये इस्तंबूल वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्ण जिंकून आणि हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवून आपली कामगिरी सुरूच ठेवली.

मल्लेश्वरी यांच्या कारकि‍र्दीच्या शिखरावर सिडनी २००० च्या ऑलिम्पिक खेळात त्या (Karnam Malleswari) सहभागी झाल्या. त्यांनी स्नॅचमध्ये ११० किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये १३० किलो असं एकूण २४० वजन उचलल्यामुळे त्यांना कांस्यपदक मिळाले होते. परिणामी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला ठरली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांचं नाव भारताच्या क्रीडा क्षेत्रात कोरलं गेलं.

हेही वाचा >> २० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा

कर्णम मल्लेश्वरी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल

कर्णम मल्लेश्वरी (Karnam Malleswari) यांचा जन्म १ जून १९७५ मध्ये आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम येथे झाला. १९९७ मध्ये त्या विवाहबद्ध होऊन काही काळ त्यांनी खेळातून विश्रांती घेतली. १९९८ मध्ये बँकॉक आशियाई खेळात त्यांनी कमबॅक केले. येथं त्यांनी कांस्य पदक पटकावले. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी एथेंस विश्व भारोत्तोलन चॅम्पिअनशिपमध्ये सहभाग घेतला. परंतु, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, त्यांनी २००० मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. त्यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९५ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

Story img Loader