महासत्ता असलेल्या अमेरिकेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापासून ते सीएटलसारख्या प्रगत शहरांपर्यंत सर्वत्र अनेकांना आजही जातिभेदाचा सामना करावा लागतो. समाजात असमतोल पसरवणारा जातिभेद संपविण्यासाठी जातिभेदावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव ‘ती’ने सीएटलच्या नगर परिषदेमध्ये ठराव मांडला. हा ठराव मंजूर करणारी सिएटल कौन्सिल ही अमेरिकेतील पहिलीच कौन्सिल ठरली. असा हा आगळा ठराव मांडणाऱ्या क्षमा सावंतबद्दल आता सर्वांनाच औत्सुक्य लागून राहिले आहे.

आणखी वाचा : ‘ती’ची यशोगाथा : डाऊन सिंड्रोम व्याधीग्रस्त महिलेने नकार पचवून उभारला स्वतंत्र यशस्वी व्यवसाय!

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

अमेरिकेच्या सीएटल कौन्सिलमध्ये अलीकडेच जातिभेदावर बंदी आणणारा पहिला कायदा संमत झाला. असा कायदा संमत करणारे सीएटल हे अमेरिकेतील पहिलेवहिले शहर ठरले. या कायद्यासाठीच्या सर्व लढ्याचे श्रेय एका भारतीय महिलेला जाते, तिचे नाव क्षमा सावंत. जातीआधारित भेदभावावर बंदीचा ठराव अमेरिकेच्या सीएटल शहराच्या कौन्सिलमध्ये आणणारी आणि तो स्वतः लिहिणारी ही अमेरिकन कौन्सिलची पहिली भारतीय महिला सदस्या आहे. सीएटल नगर परिषदेमध्ये हा कायदा ६ विरुद्ध १ अशा फरकाने संमत झाला. आशियाई अमेरिकन आणि इतर स्थलांतरितांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अथवा अमेरिकेतील सीएटलसारख्या अन्य शहरांमध्येही जातिभेदाला सामोरे जावे लागते. “आशियाई देशांमध्ये जसा दिसतो तसा जातिभेदभाव अमेरिकेत प्रत्यक्ष दिसत नसला तरी तो इथे आहे आणि तेच वास्तव आहे,” असे क्षमा म्हणते. क्षमाने ज्या वेळी जातिभेदभावप्रतिबंधक प्रस्ताव सीएटल नगर परिषदेमध्ये विचारासाठी मांडला त्या वेळी भारतीयांमध्येच याबद्दल चर्चेला सर्वप्रथम तोंड फुटले. याही अडचणींवर मात करत सीएटल नगर परिषदेने जातिभेदाला पायबंद घालणारा कायदा संमत केला. त्यामुळे सामाजिक न्याय आणि समानतेच्या दृष्टीने अमेरिकासारख्या देशातील नगर परिषदेने उचलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

आणखी वाचा : आरोग्यासाठी घातक औद्योगिक क्षेत्रात महिला कामगार सर्वाधिक! सर्वेक्षणात लक्षात आली धक्कादायक बाब

भारतीय- अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ असलेली क्षमा सावंत ही मुळातच एक कार्यकर्ती आहे. कामगार, युवावर्ग, शोषित तसेच वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ती समाजसेवक म्हणून काम करते; क्षमा सावंत ही काही मुरब्बी राजकारणी नाही. सीएटल शहराच्या वेबसाईटवरील तिच्याविषयीच्या माहितीमध्ये सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारी ती एक समाजसेवक असल्याची ओळख नोंदवलेली आहे. याच माहितीनुसार क्षमा तिच्या सहा आकडी मिळकतीमधील आवश्यक तितकीच रक्कम स्वतःसाठी स्वीकारून बाकीची सामाजिक न्यायासाठीच्या कार्याला दान करते. कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या ‘कमिटी फॉर वर्कर्स’शी ती जोडलेली आहे. २०१४ पासून क्षमा सीएटल शहराच्या नगर परिषदेवर कार्यरत आहे. तसेच सार्वजनिक पदावर निवडून आलेली ‘सोशलिस्ट अल्टरनेटिव’ची ती एकमेव महिला सदस्या आहे. ही संस्था स्वतःला मार्क्सवादी म्हणवते आणि त्याच अनुषंगाने भांडवलशाही, असमानता, वंशवाद, लैंगिकता यांविरोधात संघर्षात्मक काम करते. संस्थेच्या वेबसाईटवर ‘सोशलिस्ट अल्टरनेटिव’च्या उद्दिष्टांमध्ये व्यापक संघटन, श्रमिकांसाठी नवा राजकीय पक्ष उभारणे, प्रत्येकाला किमान १५ डॉलर्सची वेतनवाढ मिळवून देणे, सर्वांकरिता उच्च दर्जाची आरोग्यसेवा आणि पूर्णपणे अनुदानित शिक्षण उपलब्ध करून देणे यांचा समावेश केलेला आहे.

आणखी वाचा : ‘ती’ची यशोगाथा : डाऊन सिंड्रोम व्याधीग्रस्त महिलेने नकार पचवून उभारला स्वतंत्र यशस्वी व्यवसाय!

१९७३ साली पुण्यात जन्मलेल्या क्षमा सावंतचे बालपण आणि शिक्षण १९९६ पर्यंत मुंबईत झाले. तिची आई इतिहास आणि भूगोल विषयांची शिक्षिका होती. निवृत्तीच्या वेळी ती शाळेची प्राचार्या होती. तर क्षमाचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते. ती तेरा वर्षांची असताना मद्यधुंद कारचालकामुळे झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले, असे क्षमानेच २०१३ साली सीएटल सिटी कौन्सिलवर निवडून आल्यानंतर लॉस एन्जेलिस टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तर त्याच वर्षी ‘अल जझिरा’ने क्षमाविषयी लिहिले होते की, मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातून ती आलेली असली तरीही जातिव्यवस्थेचे परिणाम आणि भोवताली आत्यंतिक गरिबी पाहतच ती लहानाची मोठी झाली. यामुळे तिच्या विचारांना निश्चित दिशा आणि सुस्पष्टता मिळाली आणि ती समाजवादी विचारसरणीकडे वळली. याच सुमारास ‘सीएटल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत क्षमा सावंत म्हणते, ‘भारतातून आल्यामुळे साहजिकच अमेरिकेसारख्या श्रीमंत देशामध्ये गरिबी नावालाही नसेल, कुणीही बेघर नसेल, अशीच अपेक्षा होती. परंतु इथे आल्यानंतर दिसलेले चित्र अगदी त्याउलट होते.’

आणखी वाचा : नातेसंबंध: बायको ठरतेय डोकेदुखी ?

क्षमाने कॉम्प्युटर सायन्समध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी १९९४ साली प्राप्त केली. पती विवेक सावंतसह अमेरिकेतल्या मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून क्षमाने दीड वर्ष काम केले. अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर क्षमाने नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून २००३ साली डॉक्टरेट मिळवून २००६ साली ती सीएटलमध्ये राहायला आली आणि सोशलिस्ट अल्टरनेटिवशी जोडली गेली. तिने महिला समानता तसेच कष्टकऱ्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली. अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्ससाठीही तिने काम केले. कौन्सिलकडे नोंदवलेल्या माहितीनुसार क्षमाने सीएटल युनिव्हर्सिटीच्या सेंट्रल कम्युनिटी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन टॅकोमा येथे शिकवायला सुरुवात केली. २०१२ साली वॉशिंग्टन राज्य विधानसभेसाठी समाजवादी पर्यायी उमेदवार म्हणून तिने निवडणूक लढवली आणि तिला २९ टक्के मते मिळाली. डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराला हरवून अमेरिकेच्या प्रमुख शहरात निवडून आलेली ती पहिली समाजवादी महिला ठरली होती.