Who is Marie Alvarado-Gil : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील वरीष्ठ सभागृहाच्या सदस्या (सेनेटर) मेरी अल्वाराडो-गिल या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्या चौथ्या स्टेट सिनेट जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व करतात. त्यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ चाड कँडीट यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. तसंच, यामुळे गॅरी कँडीट यांना दुखापतही झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेरी अल्वाराडो-गिल यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यात कँडीट यांनी दावा केला की, गिल यांनी कार्यालयात दहशतीचे वातावरण तयार केले होते. तसेच आपले शेवटचे भांडण झाले, तेव्हा गिल यांनी एका छोट्याश्या गाडीत माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. यामुळे माझ्या पाठीला जबर दुखापत झाली आणि ज्यामुळे माझ्या तीन हाडांना मार बसला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कँडीट यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. पाठीच्या दुखापतीचे कारण देत त्यांनी गिल यांच्या मागणीला नकार दिला होता, म्हणून ही कारवाई झाली, असे ते म्हणाले. तसेच नोकरीवरून काढून टाकण्याआधी गिल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कँडीट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. तसेच कँडीट यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. यामुळे मेरी अल्वाराडो गिल चर्चेत आल्या आहेत.

कोण आहेत मेरी अल्वाराडो गिल

२४ डिसेंबर १९७३ रोजी जन्मलेल्या मेरी अल्वाराडो गिल या प्रख्यात अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. कॅलिफॉर्नियाच्या चौथ्या स्टेट सिनेट जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करत असून २०२२ मध्ये कॅलिफोर्निया राज्य सिनेटसाठी निवडून आल्या आहेत. त्या सुरुवातीला डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्या होत्या. तर ८ ऑगस्ट रोजी त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा >> ‘नोकरी टिकवायची असेल तर लैंगिक सुख दे’, महिला सेनेटरची पुरुष कर्मचाऱ्याकडे मागणी, खटला दाखल

गंभीर आजारांवर मात

अल्वाराडो गिल या आर्थिक पुराणमतवादी म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक समस्यांवर पुरोगामी भूमिका घेतली आहे. अल्वाराडो गिलने २०१८ मध्ये गर्भाशयाचा कर्करोग आणि मेटास्टॅटिक थायरॉइड कर्करोगाचे निदान झाले होते. या आजारांवर त्यांनी २०१९ मध्ये यशस्वी मात केली. तसंच, त्यांना विशेष गरजा असलेली दोन मुले आहेत. यामुळे त्यांच्या दृष्टीकोनावर खोलवर परिणाम झाल्याचं म्हटलं जातं.

मेरी अल्वाराडो गिल यांची चाड कँडिटशी ओळख कशी झाली?

कॅलिफोर्निया विधानसभेसाटी प्राथमिक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर २०२२ मध्ये कँडिट हे अल्वाराडो गिल यांना भेटले. अल्वाराडो गिल त्यावर्षी राज्याचे सिनेटर म्हणून निवडून आल्याने त्यांनी कँडिटला चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केले. या खटल्यात आरोप आहे की अल्वाराडो गिलने यांनी कँडिटला प्रभावित केलं. त्यांना भावनिकरित्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचंही स्काय न्यूजने वृत्तात म्हटलं आहे. एवढंच नव्हे अल्वाराडो गिलच्या मुलांना आणणं-सोडणं, कुत्र्याची काळजी घेणं अशीही कामं कँडिटला सांगण्यात यायची.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is mary alvarido gil who demanded sexual pleasure from her partner chdc sgk