world’s brightest students list: जगातल्या सर्वांत हुशार विद्यार्थ्यांच्या निवड चाचणीत भारतीय वंशाच्या प्रीशा चक्रवर्ती हिची निवड झाली आहे. अमेरिकेत राहणारी ९ वर्षीय प्रीशा चक्रवर्ती भारतीय वंशाची जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत सामील झाली आहे. ही परीक्षा खूप कठीण असते; मात्र ९ वर्षांच्या प्रीशा चक्रवर्ती जगातली सर्वांत बुद्धिमान विद्यार्थिनी होण्याचा मान पटकावला आहे.
‘world’s brightest students list’ च्या यादीमध्ये तिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. Johns Hopkins Centre कडून ही यादी जाहीर केली जाते. CYT ने २०२३-२४ सत्रात आपल्या कार्यक्रमात ९० देशांतील १६ हजार मुलांची परीक्षा घेतली होती. यापैकी केवळ ३०% पेक्षा कमी मुलांना सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पुरेसे उच्च गुण मिळाले आहेत. प्रीशा कॅलिफोर्निया वॉर्म स्प्रिंग्ज एलिमेंटरी शाळेत शिकते. चला तर जाणून घेऊयात ९ वर्षाची प्रीशा चक्रवर्ती आहे तरी कोण..
हेही वाचा >> Ram Mandir: राम मंदिरात ‘तिचा’ खारीचा वाटा! स्वच्छता कर्मचारी बिदुलाबाई यांचं योगदान ऐकून धन्य व्हाल
कोण आहे प्रीशा चक्रवर्ती?
अमेरिकेत राहणारी ९ वर्षीय प्रीशा चक्रवर्ती भारतीय वंशाची मुलगी आहे. प्रीशा चक्रवर्ती ही कॅलिफोर्नियामधील एक शहर – फ्रेमोंटमधील प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. प्रीशाने हायस्कूल आणि कॉलेज स्तरावर अनेक परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केली. यामध्ये SAT, ACT, शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षेसह अनेक परीक्षांचा समावेश आहे. प्रीशा वयाच्या ९ व्या वर्षी CYT ग्लोबल टॅलेंट सर्च प्रोग्रामसाठी पात्र ठरलेल्या सर्वात तरुण विद्यार्थ्यांपैकी एक आहे. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, प्रीशाला नेहमीच शिकण्याची आवड असते आणि ती सतत नवीन नवीन गोष्टी शिकत असते.
कार्यक्रम संचालकांनी केले अभिनंदन
भारतीय वंशाच्या प्रीशाचे अभिनंदन करताना, सीवायटीच्या कार्यकारी संचालक डॉ. एमी शेल्टन म्हणाल्या – या परीक्षेतील यश ही या विद्यार्थ्यांची ओळख नाही. या मुलांना रिसर्च आणि शिकण्याची आवड आहे. इतक्या लहान वयात इतकं ज्ञान असलेल्या या मुलांना माझा सलाम.