Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताची युवा ॲथलीट प्रीती पाल हिने इतिहास घडवला. धावपटू प्रीती पालने हिने २०० मीटर रेस (T35) प्रकारात दुसरे कांस्यपदक जिंकले. तर ट्रॅक आणि फील्डमध्ये भारतासाठी तिने पहिले पदक जिंकले. अशाप्रकारे प्रीती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. यासह भारताच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे. दरम्यान प्रीती पॉलच्या यशाचे आता भारतासह जगभरातून कौतुक होत आहे. पण प्रीतीचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. सोशल मीडियावर पॅरालिम्पिक खेळांचे व्हिडिओ पाहून तिने सहा वर्षांपूर्वी धावायला सुरुवात केली. त्यानंतर आज कुठे तिची मेहनत फळाला आली आहे.

जन्मानंतर आजारामुळे तब्येत ढासळली पण…

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये जन्मलेली प्रीती एका शेतकरी कुटुंबातील आहे. ॲथलेटिक्समध्ये करिअर करणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. तिच्या वडिलांचे नाव अनिल कुमार जे दुधाची डेअरी चालवतात. प्रीतीचा संघर्ष एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. प्रीतीला बालपणी सेरेब्रल पाल्सी आजाराचे निदान झाले होते.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Amruta Fadnavis Marathi Ukhana
Amruta Fadnavis : “आज माझ्या नणंदा…” अमृता फडणवीसांनी हळदीकुंकूच्या कार्यक्रमात घेतला झक्कास उखाणा!
Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

सेरेब्रल पाल्सी हा एक आजार आहे ज्यामध्ये मेंदू आणि शरीराच्या स्नायूंचा एकमेकांशी ताळमेळ राहत नाही, या आजारातील व्यक्तीला कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी जास्त वेळ लागतो.

कमकुवत स्थिती आणि असामान्य पायाच्या स्थितीमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक वर्षे उपचार करूनही विशेष परिणाम झाला नाही. काही लोकांनी तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली पण प्रितीने कधीही हार मानली नाही आणि संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली.

यावेळी प्रिती चांगल्या उपचारांसाठी दिल्लीत आली होती. येथेच तिने जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रशिक्षक गजेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाला सुरुवात केली. यानंतर प्रीतीने पॅरा स्पोर्ट्समध्ये स्वतःची छाप सोडण्यास सुरुवात केली आणि आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिने दोन पदके जिंकून इतिहास रचला.

सोशल मीडियाने बदलले आयुष्य

वयाच्या १७ व्या वर्षी सोशल मीडियावर पॅरालिम्पिक गेम्सचे व्हिडिओ पाहिल्यावर प्रीतीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. यातून प्रेरणा घेऊन आपणही आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो हे तिला जाणवले. तरुण वयातच तिने स्टेडियममध्ये सराव सुरू केला. मात्र आर्थिक अडचणींमुळे तिला ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागला. पॅरालिम्पिक ऍथलीट फातिमा खातून यांना भेटल्यावर तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. फातिमानेच प्रीतीची पॅरा ॲथलेटिक्सशी ओळख करून दिली. फातिमाच्या पाठिंब्याने प्रीतीने २०१८ मध्ये राज्य पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. याशिवाय अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने भाग घेतला. १०० मीटर आणि २०० मीटर स्प्रिंटमध्ये चौथे स्थान मिळवून २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्ससाठी पात्र ठरल्यानंतर तिच्या प्रयत्नांना फळ मिळाले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रीतीने जिंकले पहिले पदक

प्रितीला भले आशियाई पॅरा गेम्समध्ये पदक जिंकता आले नाही तरीही तिने पॅरालिम्पिक खेळांसाठी स्वतःला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक गजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी ती दिल्लीला गेली जिथे तिने तिच्या धावण्याच्या टेक्निकवर भर देण्यासह तिच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले. २०२४ मध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्यावर प्रीतीच्या मेहनतीचे फळ मिळाले, जिथे तिने पॅरिसमध्ये पहिले पॅरालिम्पिक पदक मिळवण्यापूर्वी 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही प्रकारांमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत.

Story img Loader