२८ वर्षाच्या पूजा तोमर हिने इतिहास रचला कारण ती रविवारी UFC Louisville 2024 मध्ये अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये ‘बाउट’ जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तोमरने ३०-२७, २७-३०,२९-२८ अशा फरकाने रायने अमांडा डोस सँटोसचा पराभव केला.

“हा विजय माझा नाही. हा विजय सर्व भारतीय चाहत्यांचा आणि सर्व भारतीय फायटरचा आहे. भारतीय फायटर्सला कुठेही स्थान नाही असे प्रत्येकाला वाटत होते. मला फक्त असे वाटले की,”मला जिंकायचे आहे आणि जगाला दाखवायचे आहे की भारतीय फायटर हरणारे नाहीत, अशा प्रतिक्रियातोमर एका व्हिडिओमध्ये दिली आहे.

Is America Ready for Female Leadership Kamala Harris Hillary Clinton
स्त्री नेतृत्वासाठी अमेरिका तयार आहे का ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….

“भारतीय गाणे आणि भारतीय ध्वजासह बाहेर पडल्याने मला आनंद झाला आणि मला अभिमान वाटला,” असेही ती म्हणाली.

सायक्लोन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ३० वर्षीय पूजाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये UFC सह करार केला होता, ती सर्वात मोठ्या मिश्र मार्शल आर्ट्स (mixed martial arts) स्पर्धेत भाग घेणारी भारतातील पहिली महिला ठरली. अंशुल ज्युबिली आणि भरत कंडारे यांनी यूएफसीमध्ये जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आमंत्रण असलेल्या ऐश्वर्या एस मेनन, सुरेखा यादव कोण? पाहा…

कोण आहे पूजा तोमर?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या बुढाणा गावात जन्मलेली तोमर, गेल्या वर्षी, UFC सह करार मिळवणारी पहिली भारतीय महिला फायटर ठरली. माजी राष्ट्रीय वुशु चॅम्पियन, तोमरने मॅट्रिक्स फाईट नाईट आणि वन चॅम्पियनशिपसह इतर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला.

सलग चार पराभवांनंतर, तिने वन चॅम्पियनशिप सोडली आणि २०२१ मध्ये मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये सामील झाली. तिने MFN मध्ये चार बाउट जिंकल्या, शेवटचा जुलैमध्ये रशियाच्या अनास्तासिया फेओफानोव्हा विरुद्ध विजेतेपदाचा बचाव केला.

हेही वाचा – “प्रवाशांना केवळ ड्रिंक्स सर्व्ह करण्याचे काम…” एअर होस्टेसने नोकरी सोडताना सांगितला तिचा अनुभव…

पूजा ही पाच वेळा राष्ट्रीय वुशू चॅम्पियन ठरली आहे आणि तिने कराटे आणि तायक्वांदोमध्येही भाग घेतला आहे. पूजा म्हणाली, ‘मला जिंकण्याची पूर्ण आशा होती आणि मी खूप आक्रमण केले. पण मी माझी शंभर टक्के कामगिरी करू शकलो नाही. दुसऱ्या फेरीत मला दडपण जाणवत होते. मला अजून खूप सुधारणा करायची आहे.

हेही वाचा – Women Ministers in Modi 3.0 : मोदींच्या मंत्रिमंडळात रक्षा खडसेंसह किती महिलांचा समावेश? केंद्रीय मंत्रिपदासाठी ‘या’ दोघींचीच निवड

रिपोर्ट्सनुसार, ती बाली, इंडोनेशिया येथील सोमा फाईट क्लबमध्ये प्रशिक्षण घेते, जिथे अंशुल जुबलीने यूएफसी फाईटसाठी प्रशिक्षण घेतले. ‘सायक्लोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजा तोमरला भारतीय सर्किटमधील सर्वोत्कृष्ट महिला फायटरपैकी एक म्हणून संबोधले जाते.