उद्योगपती रतन टाटा हे जगातील सर्वांत लोकप्रिय उद्योगपतींपैकी एक आहेत. दिग्गज उद्योगपची स्वत: रतन टाटा असो किंवा टाटा कुटुंबातील अन्य सदस्य सर्वच मीडियांपासून अंतर राखून ठेवतात हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, आता रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाच्या पुढील वारसाची चर्चा सातत्याने सुरू असते. टाटांचे साम्राज्य देश-विदेशांत पसरलेले असून, पुढील पिढीला आता समूहाची सूत्रे हाती देण्यास सज्ज केले जात आहे. दरम्यान, यामध्ये सातत्याने चर्चा होते ती म्हणजे ‘लेआ टाटा’ यांची. लेआ टाटा यांना सध्या कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तयार केले जात असून, भविष्यात उद्योगाची कमानही त्या पेलू शकतील, अशी चर्चा आहे. चला तर, जाणून घेऊ कोण आहेत या लेआ टाटा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेआ टाटा आहेत तरी कोण?

नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांच्या पोटी लेआ टाटा यांचा जन्म झाला असून, ते दोघेही अत्यंत यशस्वी व्यावसायिक आहेत. लेआ टाटा यांनी आयई बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यासोबतच लिया टाटा यांनी १० वर्षांतील बहुतांश काळ भारतीय हॉटेल उद्योगासाठी काम केले आहे. २००६ मध्ये त्यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेससाठी सहायक विक्री व्यवस्थापक म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्या सहायक व्यवस्थापक या पदावर गेल्या.

टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करण्यासाठी लेआ, माया व नेविल या तीन भावंडांची निवड झाली आहे. त्यामध्ये लेआ टाटा यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. रतन टाटा यांनी मे २०११ मध्ये हॉस्पिटल सुरू केले. टाटा फिलान्थ्रोपिक ऑर्गनायझेशनच्या बोर्डावर प्रथमच तीन तरुण पिढीची नियुक्ती करण्यात आली. १५४ वर्षे जुन्या टाटा समूहाच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तसेच कोलकाता येथील कर्करोग रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्यासाठी टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टने (TMCT) लेह, माया व नेविल यांची विश्वस्त म्हणून निवड केली आहे.

कोण आहेत नेविल टाटा?

नेविल टाटा हे एक वारसच नाही तर तरुण उद्योजकही आहेत. ते नवल टाटा यांचे चिरंजीव असून, नात्याने ते रतन टाटा यांचे चुलतभाऊ आहेत. टाटा इंटरनॅशनलमधून नोएल टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. जून १९९९ मध्ये त्यांची ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांची आई सिमोन डुनॉयर यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. नोएल टाटा यांची २००३ मध्ये टायटन इंडस्ट्रीज व व्होल्टासचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. ट्रेंटमध्ये नेविल हायपर लोकल फूडचे व्यवस्थापन पाहतात. ही कंपनी वेस्टसाईड, स्टार बाजार व लँडमार्क स्टोअरचेही व्यवस्थापन करते.

हेही वाचा >> पती व मुलगी भारतात परतले, ती काम करण्यासाठी थांबली अन्…; येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या परिचारिकेची कहाणी

तनिष्क, टायटन व फास्ट्रॅक हे कंपनीच्या मालकीचे काही ब्रॅण्ड आहेत. नोएल टाटा यांचे मेहुणे सायरस मिस्री यांची २०११ मध्ये रतन टाटा यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. पण, २०१६ मध्ये त्यांना ‘टाटा सन्स’च्या प्रमुखपदावरून काढून टाकण्यात आले आणि फेब्रुवारी २०१७ पर्यंत रतन टाटा यांनी तात्पुरत्या स्वरूपात संस्थेचा ताबा घेतला.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is ratan tata niece leah tata can take command of the group in future srk
Show comments