‘ती हल्कचं स्त्री रूप होती.’

‘तिला शोधत शत्रू कोर्टरूममध्ये आली आणि भयंकर नासधूस केली.’

Loksatta chaturang life encouraged think Cognitive Science
जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख

‘तिच्यामुळे कोर्टरूममधील सगळ्यांचे जीव टांगणीला लागले.’

‘हल्कच्या शत्रूची वकिली करते, म्हणजे नक्कीच दोघांचं प्रेमप्रकरण सुरु आहे.’

‘ती आपल्या भावाच्या शत्रूला तुरुंगातून सोडविण्याचा आटापिटा का करतेय?’

‘तीच नाव काय? ‘लेडी-हल्क’, ‘फिमेल-हल्क’ की ‘शी-हल्क’?

ती ‘शी-हल्क’चं… आजपासून तीच नाव ‘शी-हल्क’चं

आणखी वाचा : कोजागिरीचा… चंद्र होता साक्षीला!

जेनिफर वॉल्टरला आपल्या शरीरात नुकतेच झालेले बदल समजून, स्थिरस्थावर होईपर्यत प्रसारमाध्यमांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. चुलत भाऊ ब्रुस बॅनरचं ‘हल्क’ असणं, त्याच्या ‘सुपरहिरो’च्या व्याख्येभोवतीच वलय हे सगळं जेनिफरने अनुभवलेलं असतं. ब्रुसने हे सगळं स्वीकारलं असलं तरी तिला मात्र तिचं चाकोरीबद्ध, पडद्यामागचं आयुष्य पसंत असतं. पेशाने वकील असलेली जेनिफर एक दिवस अपघाताने पिळदार शरीरयष्टीची, हिरव्या रंगाची हल्क होते. पण तिचं ‘हल्क’मध्ये होणार रुपांतर आणि ब्रुसचं रुपांतर यामध्ये शारीरिक, मानसिक बदलांसोबतच सामाजिक घटकांचासुद्धा तितकंच विचार होणं गरजेचं आहे. २००८ मध्ये ‘आयर्नमॅन’ या सुपरहिरोपासून सुरु झालेल्या ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये ‘शी-हल्क’च्या निमित्ताने स्त्री सुपरहिरोची स्वतंत्र सिरीज येण्यास चौथा टप्पा आणि २०२२ सालाची म्हणजेच तब्बल १४ वर्षांची वाट पाहावी लागली. पण या चौदा वर्षामध्येसुद्धा ‘स्त्री सुपरहिरो’ असणं ही बाब पुरुष ‘सुपरहिरो’ असण्याइतकी सहजजोगी नाही, याची जाणीव या सिरीजमध्ये वारंवार होते.

आणखी वाचा : या सुषमा अंधारे आहेत तरी कोण?

विख्यात कॉमिक लेखक स्टॅन लीच्या कल्पनेतून साकारलेला हल्क नामक सुपरहिरो, २००३मधील ‘हल्क’ या सिनेमामधून पडद्यावर आला. प्रयोगशाळेत प्रयोग करताना शास्त्रज्ञ ब्रुस बॅनरचा संपर्क गामा विकिरणांशी होतो आणि त्याचं रुपांतर पिळदार शरीरयष्टीच्या रागीट, हिरव्या हल्कमध्ये होतं. हुशार पण स्वभावाने बुजरा असलेल्या ब्रुसच्या क्रोधाचा परमोच्च बिंदू म्हणजे हल्क असायचा. हल्क हा सुरुवातीपासून स्वभावाने अतिशय तापट, नासधूस करण्यात अग्रेसर सुपरहिरो होता. स्वतः ब्रुसला हल्कमध्ये परावर्तीत होणं, त्याच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागली. उलट जेनिफरचं हल्कमध्ये रुपांतर अपघाताच्या निमित्ताने झालं. ब्रुससोबतच्या अपघातामध्ये त्याच्या रक्ताचे अंश तिच्यात रक्त मिसळतात आणि गामा विकीरणांचा तिच्या शरीरात प्रवेश होतो. पण ब्रुसच्या तुलनेत जेनिफर स्वतःचं हल्कमध्ये होणार रुपांतर नियंत्रित करू शकते. त्यातही हल्कमध्ये रुपांतरीत झाल्यावरसुद्धा ‘जेनिफर’ म्हणून तिची ओळख कायम ठेवू शकते. त्यामुळे या टप्प्यावर ती ब्रुसच्या हल्कपेक्षा उजवी ठरते. असं असूनही तिचं द्वंद्व वेगळं होतं. सर्वप्रथम जेनिफरला हल्कसोबत येणार ‘सुपरहिरोत्व’ नको होतं. स्वतःच्या खांद्यावर विश्वाला वाचविण्याची जबाबदारी तिला नको होती. हल्कच्या निमित्ताने ब्रुसला मिळालेलं एकलकोंडत्व, कुटुंबापासूनचा दुरावा तिला टाळायचा होता. स्वतःचा संसार, मुले, करीयर हे सगळं तिला अनुभवायचं होतं. हल्कमुळे हे सगळं शक्य होणार नाही, याची तिला जाणीव होती. त्यात बाहेरच्या जगासोबत तिचं वेगळ युद्ध सुरु होतं.

आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

शी-हल्कच्या पहिल्याच दर्शनात कोर्टरूममध्ये झालेल्या नासधूशीला तिला जबाबदार धरण्यात आलं. तिनं शत्रूपासून उपस्थितांच रक्षण केलेलं असलं, तरी त्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर आला. ब्रुसच्या हल्कने पहिल्या प्रदर्शनापासूनच तोडफोडीचे उच्चांक गाठलेले असले तरी यावरून ब्रुसला कधीच बोल लावले गेले नाही. उलट त्याचं अनियंत्रित कोपिष्ट रूप माध्यमांमध्ये साजर केलं गेलं. जेनिफरला मात्र दुसऱ्याच दिवशी नोकरी गमवावी लागली. इतर कोणतीही कंपनी तिच्या हुशारीवर तिला कामावर ठेवू इच्छित नव्हती. ‘शी-हल्क’ हे तिचं नामकरणसुद्धा माध्यमांनी केलं अगदी तिच्या परवानगीशिवाय. जगभरातील सुपरहिरो किंवा विशेष शक्ती असलेल्या व्यक्तींचे खटले चालविण्यासाठी एक कंपनी तिला वकील म्हणून नियुक्त करते. पण त्यासाठी तिला ऑफिसमध्ये आणि कोर्टात हल्कच्या वेशात वावरण्याची अट घातली जाते. तसचं कोणाची केस निवडायची याचं स्वातंत्र्यसुद्धा तिला दिलं जात नाही. तुरुंगात खितपत पडलेल्या एमिल ब्लोन्स्की या गुन्हेगाराने सुरुवातीच्या काळात हल्क म्हणजेच ब्रुसला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे त्याची वकील म्हणून उभं राहणं जेनिफरला पसंत नसतं. तरीही कंपनी तिला भरीस पडते. जेनिफर जोडीदाराच्या शोधात विविध डेटिंग अॅप्स चाचपते पण तिथेही कोणीही जेनिफरला व्यक्ती म्हणून जाणून घेण्यास उत्सुक नसतो. प्रत्येकाला हल्कच्या प्रतिमेची भीती वाटत असते किंवा त्यास टाळू पाहत असतो.

आणखी वाचा : सुंदर मी होणार : कोंडा झाला तर…

ब्रुसचा हल्क मात्र सुरवातीपासून आक्रमक, हिंसक असला तरी अशा कुठच्याच प्रसंगांना तो सामोरे गेला नाही. कारण ब्रुस आणि जेनिफरमध्ये मूळ फरक होता लिंगाचा, पुरुष आणि स्त्री असण्याचा. कॉमिक पुस्तकांमध्ये स्त्री पात्रं ही प्रेयसी किंवा नातेवाईकांच्या भूमिकेत येतात. कित्येकदा त्यांचं निमित्त कथानकात मादकता आणण्याचं असतं. अगदी शी-हल्कची कॉमिकमधील प्रतिमाही मादकतेच्या परिमाणात पुरेपूर उतरते. अशावेळी स्त्री सुपरहिरो येणं ही संकल्पना पचनी पडणं बरच कठीण आहे आणि ही सिरीज नेमकं याच मुद्द्याला अधोरेखित करते. हे करण शक्य होतं, कारण या सिरीजच्या निर्मितीमध्ये जेसिका गाव, मेलिसा हंटर अशा अनेक स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे सुपरहिरो म्हणजे शारीरिक करामती आणि व्हीएफएक्स या पलीकडे ही सिरीज स्त्रियांच्या अनेक मुद्द्यांना हात घालते. सध्या ‘शी-हल्क ही हल्कपेक्षा ताकदीची आहे की नाही?’ या वादामध्ये इंटरनेट रमलं आहे. कारण मुळात व्यक्ती सामान्य असो किंवा सुपरहिरो पुरुष पात्र वरचढ असण्याचा हट्ट आजही सुटलेला नाही. त्यामुळे जेनिफरचा लढा अजून काही काळ सुरु राहणार असं दिसतंय.