जगातील सर्वात प्रसिद्ध आणि बहुप्रतिक्षित सौंदर्य स्पर्धा म्हणून मिस युनिव्हर्स स्पर्धेचे नाव घेतले जाते. नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत निकारागुआची शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब पटकावला. मिस युनिव्हर्स २०२२ ची मानकरी आर बोनी गाब्रिअलने शेनिस पॅलासिओसला मिस युनव्हर्सचा मुकूट घातला. यानंतर निकारागुआची शेनिस पॅलासिओस कोण अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेड एरिना येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८४ देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर उपांत्य फेरीत २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात निकारागुआची शेनिस पॅलासिओस ही ७२ वी मिस युनिव्हर्स ठरली. यावेळी ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन ही दुसरी रनर अप ठरली. तर थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ड ही पहिली रनर अप आहे.
आणखी वाचा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी शिवानी रांगोळेने केला जुगाड, म्हणाली “भुवनेश्वरी मॅडम…”
शेनिस पॅलासिओस नक्की कोण?
शेनिस पॅलासिओस ही मिस युनिव्हर्स खिताब मिळवणारी निकारगुआतील पहिली महिला आहे. शेनिस पॅलासिओसचा जन्म ३० मे २००० मध्ये झाला. ती फक्त २३ वर्षांची आहे. विविध सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची तिची बालपणी सुरुवातीपासून इच्छा होती.
शेनिस पॅलासिओसने सेंट्रल अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मॅनाग्वा येथून मास कम्युनिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. शेनिस पॅलासिओसने आतापर्यंत चार वेळा विविध सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. शेनिस पॅलासिओसने २०१६ मध्ये मिस टीन निकारागुआ ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने २०२१ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धाही जिंकली होती. तिने शेनिस पॅलासिओसने निकारगुआला नवीन ओळख दिली आहे. ती मॉडेल आहे, असून तिने तिच्या देशाची पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली.
दरम्यान शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्स खिताब पटकवण्याआधी प्रश्नोत्तराच्या फेरीत सुंदररित्या उत्तर दिले होते. यावेळी तिला कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचं आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल, असं शेनिस म्हणाली. त्यावेळी शेनिसच्या उत्तराने परिक्षकांचं मन जिंकलं.