भारतीय शास्त्रज्ञ आणि उद्योगपती स्वाती पिरामल या ईशा अंबानीच्या सासूबाई आहेत. त्यांचा जन्म २८ मार्च १९५६ रोजी झाला होता. स्वाती यांनी आरोग्यसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्या पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष म्हणून फार्मास्युटिकल्स, आर्थिक सेवा आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांतील काम पाहतात. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
स्वाती यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांनी भारताच्या अॅपेक्स चेंबर ऑफ कॉमर्सच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून काम केलं आहे. इतकं नाही तर त्या हार्वर्ड बोर्ड ऑफ ओव्हरसर्सच्या सदस्य होत्या, तसेच त्या हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि पब्लिक हेल्थ येथील डीनच्या सल्लागार राहिल्या आहेत. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय.
अनंत यांच्या होणाऱ्या सासूबाई नीता अंबानींप्रमाणे आहेत खूप सुंदर, राधिका मर्चंटची आई काय करते? वाचा…
स्वाती यांनी वॉल्सिंगहॅम हाऊस स्कूल आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई इथून शिक्षण घेतलं. त्यांनी १९८० मध्ये मुंबई विद्यापीठातून मेडिसीनमध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून १९९२ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्या पोलिओ केंद्राच्या सह-संस्थापक राहिल्या आहेत, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो मुलांवर उपचार केले आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. स्वाती यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी २५ सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अनेक वेळा स्थान मिळवलं आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूडच्या तीन खानना किती मिळाले मानधन? जाणून घ्या…
स्वाती यांचं लग्न १९७६ मध्ये पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांच्याशी झालं. त्यांनी संसार आणि काम दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या सांभाळलं. त्यांच्या मुलाचे नाव आनंद असून मुलीचे नाव नंदिनी आहे. आनंद हे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे जावई आहेत. ईशा अंबानी व आनंद यांचं २०१८ मध्ये लग्न झालं, त्यांनी दोन अपत्ये आहेत.