सध्या भारतातील महिला उद्योजक या जगामध्ये अतिशय उत्तम प्रगती करीत असून, अब्जाधीश होण्याचा दर्जादेखील प्राप्त करीत आहेत. TAFE [ट्रॅक्टर अॅण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेड] कंपनीच्या अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर [MD] मल्लिका श्रीनिवासन यांच्यामुळे त्यांच्या या कंपनीने कौतुकास्पद प्रगती केली असून, त्यांनी व्यवसाय क्षेत्रात खूप उंची गाठली आहे. उत्तम नेतृत्व आणि कमालीचे उच्च दर्जाचे व्यवस्थापकीय धोरण या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आज या कंपनीची उलाढाल तब्बल १० हजार कोटी रुपये इतकी आहे.

१९५९ साली जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन यांनी मद्रास विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हानियाच्या व्हार्टन स्कूल येथून आपले एमबीएचे पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर १९८६ साली मल्लिका यांनी त्यांच्या कुटुंबाने सुरू केलेल्या व्यवसायात सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला. प्रसिद्ध उद्योगपती एस. अनंतरामकृष्णन यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने चेन्नईला ‘भारतातील डेट्रॉईट’ [Detroit मिशिगनमधील एक शहर] बनविण्यास मदत केली होती.

morning sickness nausea vomiting of pregnancy
‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ?
garden, home, Kokedema technique, chatura
निसर्गलिप : कोकोडेमा तंत्राने घरात फुलवा बाग…
alyse ogletree, Breast Milk , newborn baby
अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे
children afraid of father parenting tips
समुपदेशन : बाबांची भीती वाटतेय?
Cambridge Union Society elects British Indian student Anoushka Kale as president
विसाव्या वर्षी मिळवला अध्यक्षपदाचा मान
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
garden plants exhibition loksatta
निसर्गलिपी : प्रदर्शनांचे दिवस

हेही वाचा : सिंगापूरमध्ये उभारली शाळा, सुरू केला ‘३३० कोटी’ रुपयांचा स्टार्टअप! जाणून घ्या कोण आहे ही भारतीय इंटरप्रेन्योर?

मल्लिका यांनी TAFE मध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर कमालीचे बदल केले. मल्लिका या अब्जावधींचे साम्राज्य स्थापन करून, ते यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या काही निवडक महिलांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आज त्यांची ही ट्रॅक्टर कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी बनली आहे; जिची उलाढाल ही साधारण १० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. इतकेच नाही, तर ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

एक उद्योगपती असण्याच्या बरोबरीनेच मल्लिका यांचा चेन्नईच्या IIT मधील गव्हर्निंग बोर्ड आणि ISB हैदराबाद येथे कार्यकारी मंडळात सहभाग आहे. तसेच AGCO, टाटा स्टील व टाटा ग्लोबल बेव्हरेजेस यांसारख्या मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये मल्लिका यांचा सहभाग आहे. एका अहवालानुसार असे समजते की, नुकत्याच अन्न आणि डिलिव्हरी जायंट ‘स्विगी’ या कंपनीचे स्वतंत्र संचालकपद मल्लिका यांनी सोडले असल्याची माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळाली.

हेही वाचा : भारतातील दुर्मीळ ‘हरगीला’ पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या पूर्णिमादेवी बर्मन कोण? ‘हरगीला आर्मी’बद्दल जाणून घ्या

सध्या मल्लिका श्रीनिवासन या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला उद्योजक असून, त्यांचे नेट वर्थ हे तब्बल २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे २३,७२७ कोटी रुपये इतके आहे. टीव्हीएस मोटर्सचे [TVS Motors] अध्यक्ष वेणू श्रीनिवासन हे मल्लिका यांचे पती आहेत. वेणू श्रीनिवासन यांचे नेट वर्थ हे सुमारे २९,३४१ कोटी रुपये इतके आहे, अशी माहिती डीएनएमधील त्या लेखावरून मिळते.

Story img Loader