ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून, १४ वर्षांनंतर लेबर पार्टी पुन्हा सत्तेत आली आहे. मजूर पक्षाने (लेबर पार्टी) बहुमताचा टप्पा ओलांडला आहे; तर हुजूर पक्षाला (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) १०० जागाही जिंकण्यात यश आले नाही. या वेळी ब्रिटन निवडणुकीच्या रिंगणात ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष आणि कीर स्टार्मर यांचा मजूर पक्ष एकमेकांविरोधात उभा होता. त्यात सुनक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कीर स्टार्मर यूकेच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनच्या मागील ५० वर्षांच्या इतिहासात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती देशाचा पंतप्रधान होण्याची घटना पहिल्यांदाच घडणार आहे. ६१ वर्षीय कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान बनले, तर ते ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून काम करणारे सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असतील. दरम्यान, कीर स्टार्मर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याने आता त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया स्टार्मर यांना ब्रिटनची ‘फर्स्ट लेडी’ बनण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्यानंतर आता ब्रिटनची फर्स्ट लेडी म्हणून व्हिक्टोरिया स्टार्मर या ओळखल्या जाणार आहेत.

पण, ब्रिटनची फर्स्ट लेडी बनण्याचा मान मिळविणाऱ्या व्हिक्टोरिया स्टार्मर आहेत तरी कोण, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. लेडी व्हिक्टोरिया स्टार्मर यांचा जन्म १९७३ मध्ये लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे व्याख्याते आणि आई एक डॉक्टर होत्या. व्हिक्टोरिया स्टार्मर यांचे आजी-आजोबा हे पोलिश-ज्यू स्थलांतरित होते; जे दुसऱ्या महायुद्धापूर्वी यूकेमध्ये स्थलांतरित झाले होते.

तर, कीर स्टार्मर हे एक घोडेस्वार आहेत. त्यांच्या आईचा जन्म डोनकास्टरमध्ये झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची आजी रेसकोर्सच्या जवळच राहत होती. आईच्या रक्तात घोडेस्वारीची आवड होती. त्यामुळे कीर यांनाही घोडेस्वारीचे वेड आहे.

व्हिक्टोरिया स्टार्मर यांचे शालेय शिक्षण लंडनमधील एका प्रतिष्ठित ऑल-गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण झाले; ज्याला चॅनिंग स्कूल, असेही म्हटले जायचे. त्यानंतर त्यांनी कार्डिफ विद्यापीठातून कायदा आणि समाजशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. चार वर्षांनी त्यांनी सॉलिसिटर पदवी मिळवली. त्यानंतर स्ट्रीट क्राईममध्ये तज्ज्ञ संस्था सोहो लॉ फर्म हॉज जोन्स अॅण्ड ॲलनसाठी त्यांनी काम केले.

कीर स्टार्मर आणि व्हिक्टोरिया स्टार्मर यांची भेट २००० च्या दशकाच्या सुरुवातीस झाली; ज्यावेळी कीर स्टार्मर डॉटी स्ट्रीट चेंबर्समध्ये वरिष्ठ बॅरिस्टर पदावर काम करीत होते. त्यानंतर २००७ मध्ये दोघांचे लग्न झाले. यावेळी व्हिक्टोरिया स्टार्मर यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये व्यावसायिक आरोग्य विभागात काम करण्यास सुरुवात केली होती.

स्टार्मर आणि व्हिक्टोरिया यांच्यातील भेटीची कहाणी खूपच मनोरंजक आहे. ती टाइम्स मॅगझिनसोबत शेअर करताना स्टार्मर यांनी सांगितले होते की, व्हिक्टोरिया ज्या कंपनीत एका केसच्या संदर्भात काम करीत होत्या, त्याच कंपनीत स्टार्मर यांनी फोन केला होता. त्यांना कागदपत्रे पुन्हा तपासायची होती.

योगायोगाने व्हिक्टोरिया यांनी त्या केसवर काम केले होते. त्यामुळे स्टार्मर यांनी केससंदर्भात केलेल्या चौकशीवर व्हिक्टोरिया चिडल्या. यावेळी स्टार्मर यांना शिवीगाळ करीत त्या म्हणाल्या होत्या, “तू स्वतःला काय समजतोस?” यावेळी जेव्हा स्टार्मरला व्हिक्टोरियाबद्दल कळले तेव्हा त्यांनी माफी मागितली आणि प्रपोज केले. व्हिक्टोरिया यांनीही ते मान्य केले. त्यानंतर दोघांनी २००२ मध्ये लग्न केले. हे दोघांनाही दोन मुले आहेत आणि ते आपल्या मुलांसह लंडनमध्ये १८ कोटी रुपयांच्या घरात राहतात. कीर स्टार्मर यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली तरीही व्हिक्टोरिया स्टार्मर आरोग्य विभागातील त्यांचे काम सोडणार नाहीत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is victoria starmer solicitor poised to be britains first lady sjr
Show comments