Who is Youngest Female Astronaut Karsen Kitchen : पृथ्वीतलावर अवकाश पाहणं, आकाशातील चांदण्या मोजणं, चंद्राकडे एकटक पाहत बसणं हे अनेकांचे छंद असतात. काहीजण य अवकाशात भ्रमंती करून येण्याची स्वप्ने रंगवतात. अवकाशात झेप घेण्याची इच्छा लहानपणापासूचन प्रबळ होत गेली ती पूर्ण होतेच, असं एक उदाहारण आता आपल्यासमोर तयार झालंय. कारण वयाच्या अवघ्या २१ वर्षी कार्सन किचन या मुलीने अंतराळ प्रवास केलाय. एवढंच नव्हे तर एवढ्या लहान वयात प्रवास करणारी ती सर्वांत तरुण महिला ठरली आहे. कॅरोलिना जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन स्पेसक्राफ्टवर किचनने प्रवास केला. तिच्यासोबत नासा प्रायोजित एरोस्पेस शास्त्रज्ञासह इतर पाच प्रवासी होते. सहा सदस्यांच्या क्रूने २९ ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.०७ वाजता पश्चिम टेक्सास साइटवरून सब-ऑर्बिटल फ्लाइटवर प्रक्षेपित केले आणि सुमारे १० मिनिटांनंतर ते उतरले. हे वाहन ऑटो असल्याने या विमानात पायलट नव्हते. पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येण्यापूर्वी किचन आणि उर्वरित क्रूने शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव एका मिनिटापेक्षा थोडा जास्त काळ घेतला. त्यांच्या न्यू शेपर्ड प्रोग्रामसह, ब्लू ओरिजिनने आता अधिकृतपणे ४३ लोकांना अवकाशात पाठवले आहे.
कार्मन रेषा ओलांडणारी सर्वांत भारतीय तरुण महिला
अंतराळात प्रवास करणं हे कार्सेनचं स्वप्न होतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ६२.१४ मैल अंतरावर असलेली आणि बाह्य अवकाशाची सीमा असलेली कार्मन रेषा ओलांडणारी ती सर्वात तरुण महिला ठरली आहे. किचनने तिचे वडील आणि युएनसीचे प्राध्यापक जिम किचन यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा इतिहास रचला आहे. पृथ्वीतलावर उतरल्यानंतर तिने तिच्या अनुभवाबद्दल सांगितलं. डब्ल्यूआरएएल न्यूजशी बोलताना ती म्हणाली, “आपला सुंदर ग्रह पाहणे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव होते.” तिने पृथ्वीला शून्य गुरुत्वाकर्षणातून पाहिले तेव्हा तिचे जीवन बदलल्याचंही तिने सांगितलं. “मी लहान असताना रात्रीच्या आकाशाकडे पाहत बसायचे. याबाबत माझ्या खूप आठवणी आहेत”, असंही ती म्हणाली.
We just completed our eighth human spaceflight and the 26th flight for the New Shepard program. Our #NS26 crew included: Nicolina Elrick, Rob Ferl, Eugene Grin, Dr. Eiman Jahangir, Karsen Kitchen, and Ephraim Rabin. Thank you, astronauts!
— Blue Origin (@blueorigin) August 29, 2024
Learn more: https://t.co/pDVVGzNUc2 pic.twitter.com/ezlOy9OBo7
करमन रेषा ओलांडणारी किचन ही सर्वात तरुण महिला असली तरी हा टप्पा गाठणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली नाही. तिचे वडील, जिम किचन हे २०२२ मध्ये न्यू शेपर्ड २० फ्लाइटमध्ये प्रवासी होते. तिने अंतराळात हा ऐतिहासिक क्षण गाठल्यानंतर पृथ्वीवर तिच्या वडिलांनी तिचं मनपूर्वक स्वागत केलं. अंतराळ प्रवासातील त्यांच्या आठवणी हे दोघे बापलेक आता कायमस्वरुपी जपणार आहेत.
कार्सेनचं शिक्षण किती?
किचन यूएनसी-चॅपल हिल येथे कम्युनिकेशन्स आणि ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करत आहे. २०२५ मध्ये ती पदवीधर होईल. परंतु, तरीही ती बाहेरील अॅक्टिव्हिटीमध्ये सर्वाधिक लक्ष देते. तिने तिच्या LinkedIn नुसार, UNC स्कायनेट रोबोटिक टेलिस्कोप नेटवर्कसह ऑप्टिकल टेलिस्कोप ऑपरेशन्ससाठी शैक्षणिक प्रोग्रामिंगचे आयोजन देखील केले.