‘थारी बाय श्रुतिका’ हा श्रुतिका अर्जुन हिने सुरू केलेला एक लग्झरी साडी ब्रँड आहे. या साड्या भारतीय संस्कृती आणि परंपरा दाखवत त्याचे प्रतिनिधित्व करतात. लग्झरी ब्रँडच्या या साड्या मॉडर्न पद्धतीच्या असल्या तरीही त्या स्थानिक वीणकाम करणाऱ्या कलाकारांकडून पारंपरिक पद्धतीने म्हणजेच हाताने बनवल्या जातात. सस्टेनेबल आणि एथिकल [नैतिक] पद्धतींचा वापर करून या साड्यांसाठी दर्जेदार आणि युनिक डिझाईन तयार केली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रुतिकाच्या उत्तम फॅशन सेन्स आणि कुशल वीणकामाने या ब्रँडची सुरुवात झाली. आकर्षक रंग आणि सुंदर, परंतु किचकट अशा नक्षीवर हा ब्रँड काम करतो. प्रत्येक साडीवर प्रत्येक नक्षीची संकल्पना ही श्रुतिकाची असते. म्हणूनच श्रुतिका थारी बाय श्रुतिका हे एक फॅशन लेबल बनण्यासाठी प्रचंड मेहेनत घेते. पारंपरिक आणि मॉर्डन ‘अस्थेटिक्स’मुळेच हा ब्रँड सर्वांमध्ये वेगळा ठरतो.

हेही वाचा : कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….

स्थानिकांसाठी विकास उपक्रम [Local growth initiatives]

श्रुतिकाने, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये रिटेल ब्रँड म्हणून उत्तम जम बसवला आहे. साड्यांवरील उच्च दर्जाच्या आणि सफाईदार कामामुळे भारतातील अनेक लहानमोठ्या भागांत थारी साड्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. विविध प्रकारच्या बुटीक्ससह आणि दुकानांसह भागीदारी करून श्रुतिका असंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे.

ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी, थारी बाय श्रुतिका विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असते. फॅशन शो, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रदर्शने भरवून, ब्रँड लोकांपर्यंत पोहोचत आहे. इतकेच नाही तर ब्रँडबद्दल, कारागिरांबद्दल आणि त्यांच्या हेरिटेजबद्दलचे महत्त्व हे याद्वारे ग्राहकांना समजवून देण्याचे काम श्रुतिका करत आहे.

ब्रँडचा जागतिक विस्तार

प्रगत तंत्रज्ञानाच्या म्हणजेच ई-कॉमर्सच्या जोरावर थारी हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पोहोचला आहे. या ब्रँडमधील अनोख्या आणि उत्कृष्ट अशा साड्यांनी जगभरातील ग्राहकांना भुरळ घातली आहे. अनेक ग्राहक सुरक्षितरित्या पैसे देऊन, आपल्या भारतीय साड्यांची खरेदी करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बुटीक्स, इन्फ्लुएंसर आणि फॅशन हाऊसच्या मदतीने श्रुतिकाने जगभरात आपले एक स्थान निर्माण केले आहे. अशा भागीदारींमुळे श्रुतिकाला नवनवीन बाजारपेठांमध्ये येण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा : “…वाढदिवस साजरा केला जातो मग मासिक पाळी का नाही?” काय आहे ‘मासिका महोत्सव’ जाणून घ्या

जागतिक पातळीवर पोहोचलेल्या या व्यवसायामुळे श्रुतिकाने आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणही स्थापित केली आहे. श्रुतिकाच्या ब्रँडमुळे विविध ग्राहकांना दक्षिण आशियातील फॅशनबद्दल माहिती मिळते. त्यामुळे तिच्या ब्रँड अंतर्गत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, प्रदर्शने यामुळे भारतीय कपड्यांचे जागतिक आणि सांस्कृतिक स्तरावर कौतुक केले जात आहे.

जागतिक पातळीवर आपल्या उत्पादनाचा प्रसार आणि वाढ करून एक आंतरराष्ट्रीय लीडर होण्याचे थारी बाय श्रुतिकाचे ध्येय आहे. हा ब्रँड भारतीय वीणकाम आणि सांस्कृतिक वारशाला पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सस्टेनेबल माध्यमांद्वारे, ग्राहकांना उत्तम गुणवत्तेचे उत्पादन देणे हे या ब्रँडचे उद्दिष्ट आहे. इतकेच नाही तर जागतिक स्तरावर साडी फॅशनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी श्रुतिका काम करत आहे, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who tharii by shrutika is represents the tradition of weaves in global market with sustainable resource check out in marathi chdc dha
Show comments