१९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा जग युद्धामुळे हादरून आणि बिथरून गेले होते, तेव्हा पौराणिक बचाव रेंजर आणि खासकरून सुपरहिरोजनी अनेक लोकांना काल्पनिक जगात घेऊन जाण्यासाठी मार्ग खुला केला होता. त्या जगात प्रचंड आकार असणारे हे नायक, जगातील सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी समर्थ असतात.

ऑस्ट्रेलियन – भारतीय अभिनेत्री आणि स्टंटवूमन, मेरी ॲन इव्हान्स [८ जानेवारी १९०८ – ९ जानेवारी १९९६] हिने ‘फिअरलेस नाडिया’ नावाचा वापर करून, अनेक भारतीय चित्रपटांत काम केले आहे. मात्र, १९३५ सालच्या काळात आलेला ‘हंटरवाली’ हा तिचा सुप्रसिद्ध सिनेमा ठरला होता. त्यामध्ये नाडियाला प्रमुख भूमिका बजावण्याची संधी मिळाली होती. इतकेच नव्हे, तर नाडिया ही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका बजावणारी पहिली महिला ठरली होती.

Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
sajid nadiadwala written lai bhaari story
Video : ‘या’ हिंदी चित्रपट निर्मात्याने लिहिली ‘लय भारी’ सिनेमाची कथा; आमिर खानही ऐकून झाला चकित; म्हणाला, “त्याचा चेहरा बघून…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
pedro almodovar loksatta latest marathi news
बुकबातमी: पेद्रो अल्मोदोव्हर कथा लिहितो….
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”

हेही वाचा : तब्ब्ल ‘एक कोटी’ रुपयांच्या नोकरीला नकार देऊन, स्वतः उभारला करोडोंचा स्टार्टअप! कोण आहे ‘ती’ जाणून घ्या…

नाडिया आणि भारतीय सिनेमा

पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे ८ जानेवारी १९०८ रोजी फिअरलेस नाडियाचा म्हणजेच मेरी ॲन इव्हान्स जन्म झाला. मार्गारेट आणि स्कॉट्समन हर्बर्ट इव्हान्स, अशी तिच्या आई-वडिलांची नावे होती. नाडियाचे पालक हे ब्रिटिश सैन्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. भारतात येण्यापूर्वी ते सर्व कुटुंब ऑस्ट्रेलियामध्येच राहत होते. मात्र, हर्बर्टची रेजिमेंट जेव्हा मुंबईत गेली, तेव्हा १९१३ साली हर्बर्टसह पाच वर्षांच्या नाडिया या त्याच्या लेकीनेही ऑस्ट्रेलिया ते मुंबई, असा प्रवास केला होता.
परंतु, १९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान नाडियाच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे नादिया आणि तिच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले. त्यांनी सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर येथे आपले पुढील आयुष्य सुरू केले. वायव्य दिशेच्या सरहद्द प्रांताला [आताचा खैबर पख्तुनख्वा] भेट दिल्यानंतर नाडियाने नेमबाजी, मासेमारी, शिकार व घोडेस्वारी शिकून घेतली.

१९३० साली नाडियाने एक नाट्यकलाकार म्हणून भारत दौरा केला. त्यानंतर तिने ‘झारको सर्कस’साठी काम करण्यास सुरुवात केली. १९३० साली, मुंबईमधील वाडिया मूव्ही टोन या बड्या ॲक्शन आणि स्टंट कंपनीच्या जमशेद “J.B.H.” वाडिया यांनी नाडियाची हिंदी चित्रपटसृष्टीशी ओळख करून दिली. जेव्हा मेरीने [फिअरलेस नाडिया], तिला चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले, तेव्हा वाडिया थोडे गोंधळून गेले होते. मात्र, नंतर त्यांनी तिला, ‘देश दीपक’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटात तिला एका गुलाम मुलीची छोटी भूमिका [कॅमिओ] देण्यात आली होती. त्यात मेरीचे सुंदर सोनेरी केस आणि निळे चमकदार डोळे हे विशेष आकर्षण होते.

हेही वाचा : पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, पाहा कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…

त्या चित्रपटानंतर मेरीला ‘नूर-ए-यमन’मध्ये परिजाद नावाच्या राजकुमारीची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. पुढे तिने अनेक चित्रपटांमधून काम केले. मात्र, १९३५ साली आलेल्या ‘हंटरवाली’ सिनेमात तिला पहिल्यांदाच प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. इतकेच नव्हे, तर या चित्रपटातील तिच्या धडाकेबाज आणि अप्रतिम कलाबाजींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या प्रचंड लोकप्रिय झालेल्या भूमिकेमुळेच तिला पुढे ‘हंटरवाली’ म्हणून लोक ओळखू लागले; त्याच नावाने तीला प्रसिद्धी मिळाली.

मोशन पिक्चर्समध्ये राजकन्या किंवा राण्यांच्या भूमिका करणाऱ्यांसाठी नाडियाने मोठा बदल घडवून आणला होता. “आयुष्यात मी सर्व काही करून पाहीन,” असे म्हणणारी प्रत्येक ‘सुपरवूमन’ अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार असल्याचे वेळोवेळी सादर करण्यात आले होते. अशा गोष्टी ब्रिटिश राजवटीच्या उत्तरार्धात प्रेक्षकांना पाहणे फार पसंत पडू लागले होते. अशी सर्व माहिती ‘शीदपीपल’ [shethepeople] मधील एका लेखावरून आपल्याला मिळते.