Animal Movie Sexism: रणबीर कपूरचा चित्रपट अॅनिमल बॉक्स ऑफिसवर तुफान डरकाळ्या फोडतोय. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अभिनय व स्टंट्ससाठी या चित्रपटाला १०० गुण द्यायला हवेत पण लॉजिक, कथानक आणि प्रेक्षकांप्रती पार पाडलेलं कर्तव्य हे शून्याहुनही खाली आहे म्हणायला हरकत नाही. अगदी सिनेमाच्या नावाला साजेसं कथानक आहे असंही म्हणता येणार नाही कारण प्राणी सुद्धा कदाचित यापेक्षा जास्त लॉजिकल आणि प्रेमाने राहत असावेत. अॅनिमल ऐवजी या चित्रपटाचं नाव राक्षस वगैरे असतं तर आणखी चपखल बसलं असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रेमाची, पुरुषार्थाची, खोटी व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटात अनेक असे भाग आहेत ज्यामुळे तुम्हीही आयुष्यातील तीन तास इतक्या विषारी विचारांसाठी का व्यर्थ घालवलेत असा प्रश्न पडू शकतो. पण त्याहीपेक्षा खूपच मनाला लागलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटात स्त्रियांना दिलेली वागणूक. केवळ पात्रांपुरतीच नव्हे तर एक अभिनेत्री म्हणूनही त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर न करून सर्वच जणींचा वेळोवेळी अपमान करण्यात आला आहे. या अभिनेत्रींना आयटम सॉंग्सवर नाचायला लावलं नसलं तरी त्यांचा चित्रपटातील वापर व वावर फक्त पदार्थात मसाला मिसळावा इतकाच केलेला आहे.
चित्रपटातील आक्षेपार्ह्य मुद्द्यांवर बोलायचं गेलं तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे अल्फा मेल! कित्येक शतकं गेली आता कुठे फक्त हाणामारीच्या पलीकडे जाऊन पुरुषाची भावनिक बाजू समोर यायला सुरुवात झाली होती पण पुन्हा एकदा त्याच बुरसटलेल्या विचारांना खत पाणी घालणारा संवाद या चित्रपटातून पुढे आणला गेला. निदान हा चित्रपट खूप दशकांआधीच्या वेळेतील आहे असं सांगितलं असतं तरी ठीक पण आजच्या दिवशी कुठल्याच स्त्रीला फक्त फोल पुरुषार्थ गाजवण्यासाठी हाणामाऱ्या करणारा, मित्रांना दिलेल्या वाचनासाठी तिच्यापासून दूर राहणारा, इगोच्या वेडापायी घर-संसाराची राखरांगोळी करणारा पुरुष आपल्या आयुष्यात नक्कीच नको असेल. हे इतकं ठामपणे सांगण्याचं कारण म्हणजे कित्येक जणींच्या आयुष्यात अशी व्यक्ती अगोदरच आहे आणि ती आता चित्रपटातून इतकी ग्लोरिफाय करून बघणं म्हणजे त्या व्यक्तीला तसंच वागण्यासाठी मिळणारं प्रोत्साहन ठरू शकतं.
आजच्या जगात अल्फा मेल फक्त त्यालाच म्हणता येईल जो भावना समजून घेईल, वेळ देऊ शकेल, दुखलं- खुपलं तर विचारपूस करू शकेल, कविता करणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्याला आयुष्यभर जर आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्तच होता येत नसेल तर बाहेर पराक्रम गाजवण्याचा काय उपयोग? संपूर्ण चित्रपटात ज्या बापाच्या प्रेमासाठी रणविजय झगडतोय ते प्रेम त्याने स्वतः त्याच्या मुलाला द्यायला हवं होतं, आईच्या जीवावर मुलाला सोडून आपला बाबा कित्येक महिने दूर राहतो, हे बालपण तो स्वतः जगला असताना तोच अनुभव स्वतःच्या मुलालाही देण्यात कोणता न्याय आहे?
चित्रपटात कित्येक ठिकाणी वाक्यांमधून फक्त स्त्रीद्वेष्टेपणा दिसून आला आहे. “महिन्यातून चार वेळा पॅड बदलायला तुझा जीव जातो मी दिवसाला ५० पॅड बदलतोय” हे वाक्य म्हणजे एखाद्या स्त्रीच्या नैसर्गिक त्रासाची तुलना आपल्या कर्माच्या भोगांशी करणं यात कुठलं लॉजिक आहे. त्यातच तो म्हणतो की एका पुरुषासारखा विचार कर, तुझ्या वडिलांना कोणी मारायला आलं तर तू काय करशील.. एकतर वडिलांच्या प्रति प्रेम यामध्येही मुलगा- मुलगी हा भेदभाव कसा काय होऊ शकतो. वडिलांना त्रास झाला तर मुलीला कमी राग येणार आणि मुलगा बंदूक घेऊन लढायला जाणार ही म्हणजे मूर्खपणाची हद्दच झाली.
एका सीनमध्ये सुरुवातीलाच रणबीर कपूरचं पात्र बहिणीच्या नवऱ्याशी बोलताना तुम्ही आमच्या बहिणीला तुमच्या घरी बोलायची पण संधी देत नाही का असं विचारतो, संपूर्ण चित्रपटात हेच पात्र आपल्या आईला खोलीतून बाहेर जा म्हणताना, बायकोला शांत बसायला सांगताना हाच समानतेचा हट्ट विसरलेलाच दिसून येतो. थोडक्यात सांगायचं तर या चित्रपटाची कथा लिहिणाऱ्याला “वागण्या बोलण्यातला विरोधाभास दाखव” एवढंच काम दिलं असावं असं वाटतंय.
एक गोष्ट मला मात्र यात पूर्णपणे पटतेय, की एवढं सगळं माफ केल्यावर खरोखरच दुसऱ्या बाईबरोबरचे संबंध माफ करायला हरकतच नव्हती. म्हणजे आपला नवरा आपल्याशी कसाही वागुदे पण तो फक्त आपल्याशीच वागतोय ना, ही एवढीच जर स्त्रीने अपेक्षा ठेवावी असं म्हणायचं असेल तर धन्यच म्हणायला हवं. यातही आपल्या या वागण्याला ज्याप्रकारे हे रानटी पात्र योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतंय, खरंच काय म्हणावं, कुठून आणावी एवढी सकारात्मकता? बॉबी देओलच्या पात्राने महिलांना दिलेल्या वागणुकीबाबत तर बोलायलाच नको, कारण ते पात्र अतः ते इति ठासून नकारात्मकतेनेच भरलेलं होतं आणि बॉबी देओलचं कौतुक झालं असलं तरी त्या पात्रासाठी कोणाच्याही मनात तिळमात्रही आस्था नसणार हे स्पष्ट आहे. याउलट रणबीरच्या पात्रातील नकारात्मकता ही कूलपणाच्या व खोट्या प्रेमाच्या हट्टापायी झाकलेली होती. हीच प्रतिमा बघणाऱ्यांच्याही मनात असणार हे निश्चित कारण सिनेमागृहात त्याच्या प्रत्येक खुनशी कृतीवर टाळ्या वाजवणाऱ्यांचीच संख्या जास्त पाहायला मिळतेय.
ज्यांना चित्रपट आवडलाय ती मंडळी हा ग्लोरिफाय करून दाखवण्याचा नाहीतर खरी नकारात्मकता मांडण्याचाच प्रयत्न होता वगैरे म्हणतील पण मुळात आपला समाज हा व्यक्तिपूजक आहे. रणबीर गोळ्या मारताना कूल दिसला, सिगारेटचे झुरके ओढताना त्याचा Swag दिसला म्हणून आपणही अशाच प्रकारचा प्रयत्न करावा हे वाटणाऱ्यांची संख्या ज्यांना दिसत नाही ते नक्की याच समाजात राहतात का असा प्रश्न पडतो. मी काही मतं अशीही वाचली की चांगलं दाखवल्याने चांगलेपणा समाजात उतरत नाही तर वाईट दाखवल्याने वाईटपणा का उतरेल? एक लक्षात घ्यायला हवं की चित्रपट हा समाजाचा आरसा नाही तर आता मार्गदर्शक झाला आहे. जगात सिनेमा- सीरिज बघून होणारे गुन्हे हे याचं उदाहरण आहेत. मानवी मानसिकतेनुसार वाईटपणा स्वीकारायला फार कष्ट पडत नाहीत, अशावेळी तोच वाईटपणा रुपेरी पडद्यावर सजवून दाखवणं म्हणजे प्रोत्साहन देणंच नाही का?
एक निर्माता दिग्दर्शक म्हणून आपण कोणत्या वागण्याला ‘कूलनेस’ च्या व्याख्येत बसवतोय याचा विचार व्हायला हवा. आपलं कला स्वातंत्र्य जपताना, प्रयोग करताना आपण कोणत्या मानसिकतेच्या व किती बुद्धिमत्तेच्या लोकांसमोर कलाकृती मांडतोय हे विचारात घ्यायलाच हवं. नाहीतर असे सिनेमे बघून अराजकता पसरायला वेळ लागणार नाही आणि सिनेमा बघून कूल झालेली हीच जनता उद्या मनाने, बुद्धीने, आणि भावनेनेही थंड पडत जाईल.