किती नट्टापट्टा करतात या बायका? यांना अजिबात वेळेची किंमत नसते…. कुठेही जायचं म्हटलं तर आमच्या ‘हि’च्यामुळे नेहमीच लेट होतो, असे शशांक त्याच्या एका मित्राला सांगत होता. काल सहज एका मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. मित्राने सहज विचारलं काय रे, आज रविवार ना, घरीच होतास ना, मग तरीही तुला यायला इतका उशीर का झाला? पार्टी सुरू होऊन तासभर झालाय. बरं हॉलही अगदी जवळचं होता मग यायला उशीर का? माझ्या मित्रांचे हे प्रश्न ऐकले आणि एक तीव्र सनक डोक्यात गेली. त्यावेळी त्यांना अरे सोनल येणार होती ना, त्यामुळे जरा वेळ झाला, असं सांगत हसत हसत तो विषय टाळला…

काही वेळाने पार्टी संपवून ते दोघेही घरी आले. त्यावेळी लिफ्टमधून येताना शशांक तिला दहावेळा बजावून सांगत होता, हे बघ यापुढे आपल्याला कुठेही जायचं असेल तर तू एकतर वेळेत तयार होत जा किंवा मग तुझी तूच त्या ठिकाणी जात जा….! प्रत्येक वेळी तुझ्यामुळे मी ऐकून घेणार नाही. यानंतर शशांक घरात शिरला. एका बाजूला बूट काढून टाकले, सॉक्सही तिथेच शेजारी फेकले आणि थेट सोफ्यावर जाऊन मोबाईल हातात घेऊन रेंगाळत बसला.
आणखी वाचा : मासिक पाळीच्या ‘त्या’ गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

दुसरीकडे सोनल मात्र बेडरुममध्ये जाऊन कपडे चेंज करुन आली. तिने शशांकलाही कपडे बदलण्यास सांगितले. तो कपडे बदलेपर्यंत तिने घरातली आवराआवर केली. शशांकनेच टाकलेले बूट तिने जागच्या जागी ठेवले. सॉक्स- कपडे धुवायला टाकले. किचनमध्ये जाऊन उरलेली दोन- तीन कामं उरकली. इकडे मात्र शशांक बेडवर छान आरामात झोपला होता. सोनलला त्याचं लिफ्टमधलं बोलणं फार लागलं होतं आणि ते लागणं फारच साहजिक होतं. त्यामुळे तिला झोपच येत नव्हती.

काही वेळाने ती सहज उठून बाल्कनीमध्ये गेली आणि सहजच एकटच तंद्री लावून बसली. तिची मनातल्या मनात घालमेल सुरु होती. यानंतर तिने सहजच विचार केला बायकांना खरंच तयार व्हायला इतका उशीर का बरं लागतो? त्याची साधारण कारण काय असतील? आणि दुसरीकडे पुरुष इतक्या लगेच तयार कसे होतात? याचा सर्वसाधारणपणे तिने विचार केला. काल सहजच गप्पा गोष्टी करताना ऑफिसमध्ये तिने माझ्याशी याबद्दल चर्चा केली. तेव्हा तिने तिची काही निरीक्षण मला सांगितली ती अशी…

१. सर्वात पहिलं म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यात कपड्यांबद्दल फार फरक असतो. म्हणजे सर्व साधारणपणे एखादा पुरुष फार फार तर शर्ट, टी-शर्ट, कुर्ता आणि जिन्स किंवा पायजामा असे कपडे परिधान करतो. त्यांच्याकडे या व्यतिरिक्त काहीही पर्याय नसतो. त्या उलट महिलांचं असतं तिला ऑफिसला जायचे असेल तर ती कुर्ता, टॉप त्यावर मॅच होणारी लेगिंस किंवा जिन्स परिधान करावे लागतात. एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा कार्यक्रम, सभारंभाला जायचे असेल तर मग तिला साडी नेसावी लागते. नाहीतर मग एखादा ड्रेस परिधान करावा लागतो. एखादी मिटींग असेल तर मग व्यवस्थित नीट दिसणारा डिसेंट कुर्ता परिधान करावा लागतो.

आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!

२. महिला आणि पुरुषांमध्ये असलेला केसांचा फार मोठा फरक आहे. पुरुषांचे केस मुळातच बारीक असल्याने ते अगदी सहज हात फिरवतही नीट करता येतात. महिलांना मात्र प्रत्येक कपड्यांवर वेगवेगळी केशरचना करावी लागते. म्हणजे त्यांना ऑफिसला जायचे असेल तर त्या साधारण एखादा पोनीटेल किंवा थोडे केस नीट करुन क्लिप लावून जातात. पण जर तेच त्यांना एखाद्या लग्नाला जायचे असेल तर मात्र त्यांना केस बांधण्यासाठी काही तरी हेअरस्टाईल करणे बंधनकारक असते. अन्यथा त्यांनी केलेलं ड्रेसिंग फार फिकं दिसतं.

३. पुरुषांना मुळातच दागिने किंवा ज्वेलरी यात फारसा काही रस नसतो. जरी असला तरी पर्याय फार कमी असतात. पण महिलांना एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचे असेल तर मात्र त्या ड्रेसवर चांगले वाटतील असे इअररिंग्स, पेडेंट वगैरे पाहावे लागतात. बरं त्यात इतके पर्याय असतात की हा घालू की तो यावर त्यांचं घोडं अनेकदा अडलेलं असतं.

४. सर्वसामान्य पुरुष सहसा चेहऱ्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे मेकअप हा प्रकार पुरुषांना फार क्वचितच माहीत असतो. त्याउलट महिलांना मात्र त्याची खडान् खडा माहिती असते. एखादं नवीन आलेली लिपस्टिक ते, वापरण्यास योग्य नसलेला किंवा असलेला ब्रॆण्ड याबद्दल त्यांचा पुरेपुर अभ्यास असतो. एखादी महिला घराबाहेर पडण्यापूर्वी फार जास्त नाही पण अगदी लिपस्टिक, पावडर, काजळ हा सर्वसाधारण मेकअप तर नक्कीच करते.

५. या सर्व गोष्टी कमी म्हणून की काय तर मॅचिंग पर्स, त्यावर चांगले वाटणाऱ्या फुटवेअर, टिकली, बांगड्या अशा एक ना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. यातील प्रत्येक गोष्ट ही महिलेच्या सौंदर्यात भरच घालते.

आणखी वाचा : “बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका.. !”

काही दिवसांपूर्वी मी सहजच एक अहवाल वाचला होता. त्या अहवालाप्रमाणे एखाद्या महिलेला नीट तयार होण्यासाठी साधारणपणे २१ मिनिटे लागतात. ‘मार्क्स अँड स्पेन्सर’ने याबाबतचं सर्वेक्षण केलं होतं. यात त्यांनी दोन हजार महिलांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, एखाद्या महिलेला व्यवस्थित तयार होण्यासाठी साधारण २१ ते २७ मिनिटांचा कालावधी लागतो. तर यातील १० टक्के महिला जास्त वेळ घेतात. संध्याकाळी या वेळेत बदल होण्याची शक्यता असते.

आता तुम्ही म्हणालं एवढं सर्व कशाला करता, गरज काय, कशाला इतकी नाटकं करायची? पण ते करण्यामागे समस्त महिला वर्गाचा एकच उद्देश असतो तो म्हणजे छान, नीटनेटकं दिसणं. एखादी नटलेली महिला दिसायला फार सुंदर दिसते. तिला पाहून तुम्हालाही प्रसन्न वाटते. तिने परिधान केलेला ड्रेस, केलेला मेकअप, त्यावर परिधान केलेली ज्वेलरी हे सर्व तर आहेच, पण तिने कपाळावर लावलेली नाजूकशी टिकलीही तुम्हाला आकर्षित करुन जाते. यामुळे जर यापुढे तिला तयार व्हायला थोडा वेळ झाला तरी तिच्यावर न रागवता तिच्या कपड्यांचे कौतुक करा किंवा तिला ही साडी नको ती साडा परिधान कर…असा प्रेमळ सल्ला देऊन बघा, त्या तुमचं नक्कीच ऐकतील आणि त्यांचाही दिवस आनंदात जाईल!

Story img Loader