अनेक नवरे मंडळींना बायकोच्या माहेरचं काहीच आवडत नाही. सासरी जाणं नको आणि त्यांनी आपल्या घरी येणं नको. आपल्या विरुद्ध सगळं चाललंय असं वाटत राहतं, पण खरंच तसं ते असतं? की स्वत:मधले काही दोष त्याला कारणीभूत असतात?

“सगळं मी तिचंच ऐकायचं, मग माझ्या मनाचं काय? मी माझं मन कधीच मोकळं करायचं नाही का? माझ्या मनातलं मी बोलायला गेलं, की घरातील वातावरण बिघडतं. तिचा अबोला आणि भांड्यांचाच आवाज वाढतो. घरातील स्वयंपाकाला सुट्टी. त्यादिवशी मला टिफिन मिळतच नाही. सर्वच बाबतीत असहकार. माझ्या शारीरिक, मानसिक कोणत्याही गरजांचा विचारच केला जात नाही अशावेळी.”

Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”

नितीन आज पुन्हा सविताकडे आला होता. बायको, नम्रताविषयी मनात खूप काही साठलं, की तिच्याकडे येऊन मन मोकळं करायचं, हे त्याचं नेहमीचंच होतं. ती त्याला नेहमी समजून घ्यायची आणि समजावून सांगायची.

“नितीन का एवढा वैतागला आहेस? अरे, संसार म्हटलं, की या गोष्टी आल्याच. थोडंफार या गोष्टी प्रत्येकाच्या घरात होतातच. थोडं ॲडजस्ट करावं लागतंच.”

हेही वाचा : तू चाल पुढं तुला गं सखे भीती कुणाची…

“अगं, पण किती ॲडजस्ट करायचं? मला ज्या गोष्टी आवडत नाहीत. त्या ती मुद्दाम करते त्यामुळं माझी चिडचिड होते मग माझ्या तोंडून एखादा शब्द जातोच. मग ती तोच धरून ठेवते. आता बघ, आम्ही नवीन घर घेण्याचा विचार करीत होतो. तिला एका रिडेव्हलपमेंट स्कीममधील ३ बीएचके फ्लॅट नम्रताला आवडला. मलाही तो फ्लॅट खूप आवडला होता, पण पैशांचं सोंग आणता येत नाही म्हणून मी तिला त्याचा विचार सोडून द्यायला सांगितलं, परंतु त्या फ्लॅटचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तिचे वडील आणि भाऊ तिला मदत करायला तयार होते, पण माझी तयारी नव्हती. तरीही तिनं हट्टानं घर बुक केलं. तिला होमलोन मिळालं आणि वरच्या सर्व पैशांची मदत तिच्या वडिलांनी आणि भावानं केली. ‘मी नको म्हणत असताना तू त्यांची मदत का घेतलीस?’ एवढाच प्रश्न मी तिला विचारला तर ती चिडली. गेले १० दिवस ती माझ्याशी बोलत नाहीए. तिच्या माहेरच्या माणसांची मी किंमत ठेवत नाही, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत नाही यावरून सतत माझ्याशी वाद घालते. तूच सांग यामध्ये माझं काही चुकतंय का? माझ्या मनातलंही तिच्याशी बोलायचं नाही का?’

नितीन जे जे सांगत होता ते सर्व सविता ऐकून घेत होती. ती त्याची चांगली मैत्रीण होती. नम्रता आणि नितीन यांच्यातील वाद यापूर्वीही तिनं अनेकवेळा मिटवले होते. दोघांच्या स्वभावाचीही तिला चांगलीच माहिती होती. त्यांच्या वादातील कळीचा मुद्दा तिच्या लगेच लक्षात यायचा. नितीन नम्रताच्या माहेरच्या नातेवाईकांच्याबाबत नेहमी आकस दाखवायचा आणि हे नम्रताला अजिबात पटायचं नाही. आता लग्नाला २० वर्ष झाली होती. मुलं मोठी झाली होती, तरीही आजही पुन्हा त्याच त्याच गोष्टीवरून त्यांचे वाद होत होते. नितीननं आतातरी त्याचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं होतं, म्हणूनच ती प्रयत्न करीत होती. पण त्याच्या मनापर्यंत ते पोचत नव्हतं बहुदा.

हेही वाचा : सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना प्रसूती रजेचा अधिकार आहे का? न्यायालयाचा नेमका निर्णय काय?

“नितीन, नम्रताच्या वडिलांनी आणि भावानं तिला घर घेण्यासाठी मदत केली तर बिघडलं कुठं? तुलाही तो फ्लॅट आवडलाच होता ना?”
“फ्लॅट मला निश्चितच आवडला होता. तो हातातून जाऊ नये अशी माझीही इच्छा होती, पण मला त्यांचे उपकार नकोत. पैशांनं ते मला विकत घ्यायला बघतात.”

“नितीन, तू विचारलंस ना माझं काय चुकतंय? मग तुला आता सांगते, खरं तर तुझा मेल इगो दुखावल्यामुळे तुला त्रास होतो आहे. तू गैरसमज करून घेतो आहेस. जावई म्हणून त्यांनी तुझा नेहमी आदरच केला आहे. पण तू कधीही त्यांना मनापासून स्वीकारलं नाहीस. त्यांचे पैसे म्हणजे नम्रताचे पैसे नाहीत का? तिचाही त्यावर हक्क आहेच ना तिच्या भावाप्रमाणे. पण तू ते कधी समजून घेतलं नाही. उलट ती माहेरी राहायला जायचं म्हणाली तरी तुला राग यायचा. तिच्या माहेरच्या नातेवाईकांशी ती फोनवर बोलत असली तरी तू अस्वस्थ व्हायचास. ते तिला काहीतरी तुझ्याविरुद्ध शिकवतात असाच तुझा समज असायचा. तिच्या नातेवाईकांशी तू ठराविक अंतर ठेवून वागलास, पण ते तुझेही कुणी आहेत, हे तू मान्य केलं नाहीस. तुला तुझे कुटुंबीय जेवढे जवळचे तेवढेच तिलाही तिचे असणारच ना कायम? हे तू समजून घेऊन तुला तुझ्यात बदल करायला हवेत. तू जर मनापासून हे स्वीकारलं नाहीस तर मात्र सतत मनात काही ना काही गैरसमज करत राहणार आणि त्रास तुला तर होणारच पण नम्रता आणि मुलांनाही होणार.

हेही वाचा : व्हिक्टोरिया स्टार्मर आहेत तरी कोण? ज्यांना ब्रिटनची फर्स्ट लेडी बनण्याचा मिळणार मान; वाचा सविस्तर

तू कितीही चिडलास, रागावलास तरी नम्रतामध्ये काहीही बदल होत नाही हे तुझ्या लक्षात आलेलं आहे ना, मग रडत खडत स्वीकारण्यापेक्षा आनंदाने काही गोष्टींचा स्वीकार कर. काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कोणत्याही प्रसंगात मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास तिला दे. तिच्या नातेवाईकांना मनापासून स्वीकारत आणि त्यांच्याशी मनमोकळं वाग, म्हणजे तुलाही नम्रताच्या वागण्यातील बदल दिसेल.”

सविता जे जे सांगत होती, त्याचा नितीन गंभीरपणे विचार करायला लागला आणि आत्मपरीक्षणही. आणि हळूहळू त्याला ते पटायला लागलं. इतकी वर्षं आपण एकाच पद्धतीनं विचार करतोय, हे त्याच्या लक्षात यायला लागलं होतं. आता यापुढे आपल्या विचारांचा चष्मा बदलायचा हे त्यानं ठरवलं आणि त्याचं त्यालाच समाधान वाटलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)