स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गाणारे आपण खरंच स्त्रियांना पुरुषांबरोबरीने समान वागणूक देत आहोत का? सामाजिक, आर्थिक क्षेत्रात स्त्रियांची कितीही प्रगती झाली तरीही स्त्रियांची लिंगभेदापासून सुटका नाहीच. आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात कामगिरी केली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आज त्यांच्या बरोबरीने पुढे पाऊल टाकत आहे. तटस्थ, स्वाभिमानी, स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी असलेल्या स्त्रीच्या मनातील घालमेल कुणाला समजेल का?

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक, व्यावसायिक आयु्ष्यात लढणाऱ्या स्त्रिच्या खांद्यावर घरकामाचं ओझं असतं, हे कुणाला का दिसत नाही? आजही अनेक स्त्रिया नोकरी किंवा व्यवसाय करून घरकामही करतात. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवली जाते, या अपेक्षांचं काय? ही अपेक्षा समानतेला धरुन आहे का? पुरुषांकडून अशी अपेक्षा का ठेवली जात नाही?

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

नोकरी करणाऱ्या पुरुषांना कधी घरकामाचं ओझ नसतं. आजही कित्येक घरात नोकरीहून घरी परतल्यानंतर पुरुषांच्या हातात आयता चहा-पाणी येतो, पण स्त्रियांच्या बाबतीत हे उलट आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घरी जाताच किचनमध्ये जाऊन घरच्या माणसांसाठी चहा, स्वयंपाक करावा लागतो. हा भेद कधी नाहीसा होणार? असमानतेची ही रेष कधी पुसली जाईल?

पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया घर चालवायला करतात आर्थिक मदत

जेव्हा पुरुषांना स्त्रियांच्या घरकामाविषयी प्रश्न विचारला जातो तेव्हा अनेकदा त्यांच्या तोंडून उत्तर येतं की घर चालवायला आम्ही आर्थिक मदत करतो. पण पुरुषांनो, ही आर्थिक मदत आज स्त्री सुद्धा तितक्याच ताकदीने करत आहे.
ग्रामीण भागात सुद्धा अनेकदा शेतमजूरी करणाऱ्या किंवा गृहउद्योग करणाऱ्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने घर चालवताना दिसतात. पण फक्त घरकाम करणारे पुरुष शहरी भागात म्हणा किंवा ग्रामीण भागात खूपच क्वचितच दिसतात.

घरकामाला कमी महत्त्व

घरकाम हे फक्त स्त्रियांसाठी असतं, असे अनेक जणांना वाटतं. आजही “आई थकली, तिच्याने जास्त काम होत नाही, म्हणून घरात लवकर सून आणा”, असं आग्रहाने बोललं जातं. नोकरी करणारी स्त्री असली तरी तिला घरातील सर्वांचे जेवण आणि घरकाम करुनच घराबाहेर पडावं लागतं. नोकरीवरुन घरी परतताना सुद्धा रात्री भाजी कोणती करावी? हाच प्रश्न कित्येकदा स्त्रियांच्या डोक्यात फिरत असतो.
फक्त घरकामाचं टेन्शन नाही तर मुलांनी टिफीन संपवला असेल का? शाळेत त्यांचं मन रमतं का? पॅरेंट्स मिटिंग कधी आहे? मुलांचा गणवेश धुतला आहे का? त्यांना सकाळी टिफीनमध्ये काय देऊ? इथपासून ते वृद्ध सासू-सासऱ्यांच्या बीपी-डायबिटीजच्या गोळ्या आणि नियमित चेकअप इथपर्यंतची सर्व जबाबदारी घरच्या स्त्रीवर असते. पण तिच्या मनातील ही घालमेल कधी कुणाला दिसणार आहे का? पुरुषांप्रमाणे तिलाही एकाच विश्वात कधी रमता येणार?

स्त्रियांना पुरुषांप्रमाणे फक्त आणि फक्त नोकरी निवडण्याचं स्वातंत्र्य का नाही?

पुरुष जसा ठामपणे सांगतो, “मी नोकरी करतो, मग घरकाम मी कसं करणार?” तसं स्त्रिया का सांगू शकत नाही? स्त्रियांना पुरुषांप्रमाणे फक्त आणि फक्त नोकरी निवडण्याचं स्वातंत्र्य का नाही? न सांगता, न विचारता त्यांना गृहीत का धरलं जातं? “अरे ती बाई आहे.. तिला नोकरी करुन घरकाम करावं लागेल”, ही मानसिकता कशी निर्माण होते?

स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली आज आपण एकीकडे कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान करतोय पण त्याच कर्तृत्वान स्त्रियांच्या खांद्यावर असलेलं घरकामाचं ओझं कुणाला का दिसत नाही?

Story img Loader