डोहाळेजेवण असो किंवा बारशासाठी बाळासाठी भेटवस्तू घेणे असो, बाळ मुलगा आहे की मुलगी याकरिता गुलाबी आणि निळ्या रंगाचा वापर केला जातो. गुलाबी, गुलाबी रंगाच्या छटा असणारे रंग हे मुलींसाठी असे अलिखित समीकरण तयार केले आहे. मुलगी असेल तर तिने पिंक-गुलाबी रंगाशी साधर्म्य साधणारे कपडे किंवा वस्तू निवडाव्यात, असा एक समज तयार करण्यात आला. मोबाईलच्या रंगांमध्येही ‘मेटॅलिक पिंक’ ‘रोझ पिंक’ या रंगांची निर्मिती विशेषतः महिलांसाठी करण्यात आली. परंतु, गुलाबी रंग मुलींसाठी आणि मुलग्यांसाठी निळा रंग कोणी ठरवला? बार्बीसाठीही पिंक रंगाची निर्मिती का करण्यात आली ? महिलांसंदर्भातील जाहिराती, आरोग्य योजनांमध्ये गुलाबी रंग का निवडण्यात आला हे जाणून घेणे रंजक ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुलांसाठी गुलाबी रंग वापरत होते का ?
साधारणतः १९व्या शतकात पेस्टल रंग लहान मुलांसाठी लोकप्रिय होऊ लागले. आता एक ट्रेंड दिसतो की, निळा रंग मुलांसाठी, तर गुलाबी रंग मुलींसाठी वापरला जातो. परंतु, १९व्या शतकात मुलींसाठी निळा रंग तर मुलांसाठी गुलाबी रंग होता. जून १९१८ मध्ये लेडीज होम जर्नलने एक लेख प्रकाशित केला होता, त्यात त्यांनी मुलांसाठी गुलाबी आणि मुलींसाठी निळा आहे, असा दावा केला. परंतु प्रसारमाध्यमांनी एक रंग किंवा दुसरा रंग एका लिंगाशी किंवा दुसर्या लिंगाशी संबंधित असल्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. ही संकल्पना पुढे ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ झाली. कपडे उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लिंग आणि लिंगाशी संबंधित कपडे, वस्तू यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. १९२७ ला टाईम मासिकाने छापलेल्या वृत्तानुसार डिपार्टमेंटल स्टोअर्सवरती रंग आणि वस्तू यांची यादी देण्यात आली होती. अमेरिकेमध्ये मुलग्यांनी गुलाबी रंगाचे कपडे घालावे, असे नियम करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील बेस्ट अँड कंपनी, क्लीव्हलँडमधील हॅले आणि शिकागोमधील मार्शल फील्डनेही मुलग्यांसाठी गुलाबी रंग निश्चित करण्यात आला. पण मग मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा रंग कसा झाला? खरंतर गुलाबी रंग हा लाल रंगाच्या जवळ जाणारा आहे. लाल रंग रोमँटिक तसेच ऍग्रेसिव्ह रंग म्हणून ओळखला जातो. या लाल रंगाची फिकट छटा म्हणजे गुलाबी रंग.
हेही वाचा : मासिक पाळीच्या वेळी गोड पदार्थ खाताय ? तज्ज्ञांच्या मते…
मुलींसाठी गुलाबी रंग का ठरवण्यात आला ?
१९४० नंतर मुलींसाठी गुलाबी रंग ठरवण्याकडे प्रवास सुरु झाला आणि यामध्ये मोठा सहभाग ‘बार्बी’चा होता. बार्बीने गुलाबी रंगाचा कपडे परिधान केले. तिच्या वस्तू मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाच्या होत्या. याला एक कारण म्हणजे अमेरिकेमध्ये सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ होती.या स्त्रीवादी चळवळीने युनिसेक्स कपड्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे मुलग्यांसाठी असणारा गुलाबी रंग मुलींना देण्यात आला. या रंगाचा अधिक प्रचार करण्याचे कार्य चित्रपट माध्यमांनी केले. तसेच तत्कालीन सेलिब्रेटीज या पिंक रंगाकडे आकर्षित झाले.
एका संशोधनानुसार, १९४० मध्ये, बेबी बुमर्सनी त्यांच्या मुलांना लिंग-विशिष्ट कपडे घालण्यास सुरुवात केली. बेबी बुमर ही २०व्या शतकात उदयाला आलेली संकल्पना आहे. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मदर प्रचंड वाढला. १९४६ ते १९६४ या काळात ज्या व्यक्ती जन्माला आल्या त्यांना बेबी बूमर म्हटले जाते. या बेबी बुमरच्या पिढीने त्यांच्या मुलांना गुलाबी आणि निळ्या रंगात बंदिस्त केले. याच काळात गर्भलिंग चाचणी करण्यात येत असे. तसेच ‘बेबी जेंडर रिव्हील’ कार्यक्रम होत असत. त्यामध्ये मुलगी असेल तर गुलाबी रंग आणि मुलगा असेल तर निळा रंग दर्शवण्यात येत असे.
अमेरिकन लक्षाधीश आणि प्रसिद्ध चित्रकार हेन्री हंटिंग्टन यांनी १८व्या शतकात दोन चित्रे काढली, ज्यात मुलीसाठी गुलाबी रंग देण्यात आला, तर मुलासाठी निळ्या रंगाचे कपडे दर्शवण्यात आले. अमेरिकन प्रेसने या चित्रांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. त्यामुळे मुलींसाठी गुलाबी रंग ठरवण्यास अधिक प्रोत्साहन मिळाले.
१९५३ मध्ये अमेरिकेत घडलेली एक घटना सुद्धा महिलांमध्ये गुलाबी रंगाची आवड निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. या वर्षी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवला होता आणि डिवाईट इस्न्होवर यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी ‘मॅमी इस्त्रोव्हर’ या गुलाबी रंगाच्या गाऊन मध्ये आल्या होत्या. त्यामुळे महिलांसाठी हा रंग अधिक प्रसिद्ध होऊ लागला. भारतामध्येही मायावती यांनी त्यांच्या प्रचारामध्ये गुलाबी रंगाचा वापर केला होता. महिलांसाठी गुलाबी रंगाच्या रिक्षा त्यांनी आणल्या. तसेच त्यांनी कायम गुलाबी रंग परिधान केला. स्तनाच्या कर्करोगासाठीही गुलाबी रंगाचा वापर करण्यात येतो.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मधील इतिहास विषयाचे संशोधक आणि प्राध्यापक जो पाओलेटी यांनी रंग आणि लिंगाधिष्ठिता यासंदर्भात संशोधन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार १९५० पर्यंत बाळाच्या लिंगानुसार विशिष्ट रंग याचे प्रमाण कमी होते. गुलाबी रंग हा निश्चितता, मजबुती याचे प्रतीक मानला जात होता. त्यामुळे मुलग्यांसाठी तो रंग ठरवण्यात आला होता आणि शांतता, संयम याचे प्रतीक समजले असल्यामुळे निळा रंग मुलींसाठी निवडण्यात आला. परंतु, दुसऱ्या महायुद्धानंतर स्त्रीवादाचे, आधुनिकरणाचे वारे वाहू लागले. त्यातून मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा रंग ठरवण्यात आला.
पाओलेट्टी यांनी असाही युक्तिवाद केला की, फ्रेंच संस्कृतीमध्ये मुलींकरिता गुलाबी रंग ठरवण्यात आला. तसेच फ्रेंचमधील फॅशन कार्यक्रमांमध्ये मुलांसाठी निळा आणि मुलींसाठी गुलाबी रंग प्रदर्शित करण्यात आला.
असा कोणताही लिखित नियम नाही की, मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे घालावे आणि मुलांनी निळ्या रंगाचे कपडे घालावे. परंतु, २०व्या शतकात ‘ट्रेंड’ सुरु झाला तो अजूनही सुरु आहे.