Health Insurance For Women : महिलांनो, जर तुम्ही वयाच्या तिशीत असाल, तर हा तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक काळ आहे. तुम्ही निवडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. महिलांनी या वयात आरोग्याची काळजी घेतली नाही, तर त्याचा थेट परिणाम वजनवाढीसारख्या समस्या किंवा हार्मोन्समधील चढ-उतारांवर दिसून येतो.
“लग्न करण्याची आणि मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे का? मी नोकरी केली पाहिजे का? काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत मला आता खूप जास्त थकवा का जाणवतोय?” इत्यादी प्रश्न महिलांना या वयात पडतात. पण, तरीसुद्धा महिला आरोग्याला प्राधान्य न देता, करिअर आणि कुटुंबाचा समतोल साधत अतिजास्त जबाबदाऱ्या पेलताना दिसतात. त्यामुळे या वयात आरोग्य विमा संरक्षणाचा विचार करणे अधिक गरजेचे आहे.
तुम्ही आरोग्य विमा काढला का? जर नाही; तर आपण कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा निवडावा? वयाच्या तिशीत आरोग्य विमा निवडताना काय पाहावे? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
तिशीतील महिलांसाठी Policybazaar.com ने १० लाख रुपयांच्या विमा योजना सांगितल्या आहेत.
- केअर हेल्थ इन्शुरन्स – केअर सुप्रीम (Care Health Insurance – Care Supreme)- १०,५९२ रुपये
- निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स – हेल्थ रिअशुर 2.0 प्लॅटिनम + (Niva Bupa Health Insurance – Health Reassure 2.0 Platinum+)- ११,९७० रुपये
- स्टार हेल्थ इन्शुरन्स – स्मार्ट हेल्थ प्रो. (Star Health Insurance – Smart Health Pro) – ८,१७५ रुपये
- आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स – अॅक्टिव्ह फिट प्लस (Aditya Birla Health Insurance – Activ Fit Plus) – ८,८६९ रुपये
- मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स – प्रोहेल्थ प्राइम प्रोटेक्ट (Manipal Cigna Health Insurance – ProHealth Prime Protect) – १०,९१२ रुपये
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स – आरोग्य लाभ (Reliance General Insurance – Health Gain) – ७,५९१ रुपये
- TATA AIG जनरल इन्शुरन्स – मेडिकेअर प्रीमियर (TATA AIG General Insurance – Medicare Premier)- १३,६६३ रुपये
- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स – ऑप्टिमा सिक्युअर (HDFC Ergo General Insurance – Optima Secure)- १६,२५४ रुपये
हेही वाचा – पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विदुषी सिंगने कशी केली होती परीक्षेची तयारी? घ्या समजून….
महिलांसाठी काही महत्त्वाच्या आरोग्य योजना जाणून घेऊ.
डिजिट अर्ली स्टार्ट योजना (Digit’s Early Start Plan)
डिजिट ही २५ ते ४५ वयोगटातील तरुण प्रौढ लोकांसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेला “अर्ली स्टार्ट प्लॅन” म्हणतात. गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे सीएमओ व डायरेक्ट सेल्स हेड विवेक चतुर्वेदी सांगतात, “या योजनेत प्रसूती फायदे, पूर्व काळजी आणि महिलांसाठी महत्त्वपूर्ण आरोग्य सेवांसह इतर आरोग्य सेवेच्या सर्वसमावेशक खर्चाचा समावेश केला जातो.
स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health Insurance)
महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्या विमा सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी अमिताभ जैन सांगतात, “स्टार वूमन केअर इन्शुरन्स विमा ही योजना विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आली आहे आणि ही विमा योजना आर्थिक संरक्षणाबरोबर आवश्यक वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देते.”
HDFC ERGO : महिला आरोग्य सुरक्षा योजना (HDFC ERGO : Women Health Suraksha Plan)
HDFC ERGO चे जनरल इन्शुरन्सचे संचालक व प्रमुख बिझनेस अधिकारी पार्थनिल घोष म्हणतात, “ही विमा योजना महिलांसाठी असून, त्यांना विशिष्ट कर्करोग, हृदयाचे आजार, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारपण यांमध्ये सहकार्य करते. या योजनेत एक लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या विम्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत”
हेही वाचा – ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स (Magma HDI General Insurance)
मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे मुख्य टेक्निकल अधिकारी अमित भंडारी सांगतात, “आयव्हीएफसारख्या आधुनिक उपचारांचा विचार केला जाणे, खूप महत्त्वाचे आहे. कारण- तिशीतील अनेक महिला उशिरा विवाह आणि कुटुंब नियोजनाचा विचार करतात.”
या योजनेत बाळंतपणाच्या काळात एक लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटलचा खर्च दिला जाईल. गर्भपात किंवा गर्भपातासह अन्य वैद्यकीय गोष्टींचा समावेश केला आहे. ४० वर्षांखालील महिलांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आयव्हीएफ (IVF) उपचार दिले जातील. दोन लाख ते तीन कोटीपर्यंतच्या विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत.