अलीकडच्या काळात महिलांमध्ये दारू आणि धूम्रपानाचे व्यसन वाढत आहे. विशेषतः शहरांत राहणाऱ्या महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का ? सिगारेट आणि दारू ही पुरुषांपेक्षा महिलांना जास्त घातक असते. सिगारेट आणि दारूच्या व्यसनामुळे महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. सिगारेट आणि दारूच्या सेवनामुळे महिलांना कॅन्सरचा धोका हा असतोच, पण तो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही मारून टाकतो. दरम्यान, केंटकी विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक धूम्रपान करतात, असं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धूम्रपान ही एक अशी सवय आहे की जी सुटणे फार कठीण आहे. या संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना धूम्रपानाची जडलेली सवय सोडवणे कठीण जात आहे.
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान
धूम्रपान हे जगभरातील घातक रोगांचे प्रमुख कारण आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये, दरवर्षी ४.८ लाखांहून अधिक लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतो. २०२१ पर्यंत अंदाजे ११% अमेरिकन नागरिक सिगारेटचं व्यसन करत असल्याचं समोर आलं आहे, ज्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. मात्र, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रिया लवकर व्यसनाधीन होण्याची शक्यता असते आणि या व्यसनावर मात करण्यासाठी त्यांना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागते. डॉक्टरेट विद्यार्थिनी सॅली पॉस सांगतात, “महिलांमध्ये व्यसन लागण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त असते आणि जडलेली सवय सोडवणे कठीण जाते.”
धूम्रपानाच्या अतिसेवनामुळे महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. महिलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण हे २७ टक्के आहे, तर २५ टक्के पुरुषांना धूम्रपानामुळे लठ्ठपणाला सामोरे जावे लागत आहे.
धूम्रपान सोडण्याचा दर पुरुषांमध्ये अधिक!
धूम्रपानाची जडलेली सवय सोडणे महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोपे जाते, तर महिलांना ही सवय सुटत नाहीये. महिलांना लठ्ठपणा असण्यामुळे आणि सिगारेटमधील काही घटकांमुळे धूम्रपान सोडणे कठीण जात आहे. सलग २८ दिवस धूम्रपान नाही केले तर व्यक्तीमधील कार्बन मोनोऑक्साईडची पातळी १० (PPM) ने मोजली गेली, त्यामुळे पुरुषांमध्ये असणाऱ्या निकोटीनची मात्रा अधिक असूनही महिलांना सिगारेट सोडणे जड जात आहे. याचे कारण महिलांमध्ये असणारी मानसिक अस्वस्थता आणि लठ्ठपणा कारणीभूत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >> समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या
धूम्रपानाचे गरोदरपणात होणारे दुष्परिणाम कोणते?
गर्भपात, गर्भात व्यंग असणे, गर्भाची वाढ खुंटणे, मुदतपूर्व प्रसूती, वारंवार आजारी पडणे, कामाची क्षमता कमी होणे, रक्तदाब, हृदयरोग, टाइप २ मधुमेह, कॅन्सर, हाडांचा ठिसूळपणा, व्यसनांच्या आहारी जाणे, व्यसन, चुकीच्या सवयींमुळे आपले व्यक्तिमत्त्व कमकुवत होते. आजच्या प्रगतशील समाजात विविध संधी उपलब्ध आहेत. शारीरिक स्वास्थ्य, सक्षम व्यक्तिमत्त्व व स्थिर मानसिकतेची यासाठी नितांत गरज आहे, हे लक्षात ठेवायला हवे.