लग्न ही महिला आणि पुरुषांच्या जीवनातील एक महत्वाच घटना होय. लग्नानंतर दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात. यानंतर त्यांना केवळ स्वत:चा विचार न करता आपल्या कुटुंबाचा आणि साथीदाराचाही विचार करावा लागतो. त्यामुळे लग्नाआधी अनेक निष्काळजी असणारी मुलं-मुली लग्नानंतर जबाबदारीने वागताना आपणाला दिसतात. त्यामुळे अनेकजण लग्नानंतर सुधारतात असंही म्हटलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतर जसा आपल्या स्वभावात बदल होतो त्याचप्रमाणे शरीरातही अनेक बदल होतात. ज्यामध्ये सर्वांच्या नजरेत येतं ते म्हणजे स्त्रियांचं वाढतं वजन. वजन वाढणे ही अलीकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. महिलांना या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते आहे. लग्नानंतर महिला आणि पुरुष यांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बदलांचा समावेश असतो. मात्र, लग्नानंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जीवनावर जास्त परिणाम होतो. लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते? आणि त्याला कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहेत त्याबाबत जाणून घेऊयात.

हेही वाचा- काखेतील घामाच्या दुर्गंधीमुळे लाज वाटते? करा हे घरगुती उपाय

लग्नानंतर ‘या’ गोष्टी टाळा –

लग्नानंतर स्त्रियांचे वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचं कारण असंही आहे की, लग्नाआधी स्त्रिया स्वत:साठी वेळ देतात, पण लग्नानंतर त्यांना स्वत:साठी पूर्णवेळ देणं शक्य नसतं. तसंच त्यांच्या आहारातही बदल होतो, त्यामुळे त्यांचे वजन वाढते. लग्नानंतर कुटुंबातील मित्र आणि नातेवाईक नवीन जोडप्याला जेवणासाठी आमंत्रित करतात. अशा वेळी नवीन जोडप्यासाठी भरपूर तळलेले पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण टाळण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी, तुम्ही दुपारच्या जेवणासाठी जाऊ शकता. दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ खाल्ले तर ते तुम्ही चांगले पचवू शकता, परंतु रात्री जेवण केल्यामुळे वजनवाढीची समस्या अधिक असू शकते. त्यामुळे रात्री जेवायला जाणं टाळायला हवं.

व्यायाम –

लग्नानंतर विविध कामांचे व्याप वाढत जातात. त्यामुळे स्त्रियांना व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पुरेसा व्यायाम न केल्यानेही वजन वाढते. त्यामुळे दररोज थोडातरी व्यायाम करायला हवा. ज्या स्त्रियांना दररोज व्यायाम करणे जमत नाही त्यांनी दोन दिवसांतून किमान २० ते ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. याशिवाय तुम्ही योगा किंवा डान्स क्लासमध्येही सहभागी होऊ शकता. ज्यामुळे वजन नियंत्रित होईल.

लैंगिक संबंध व इतर कारणे –

हेही वाचा- आहारवेद : मासिक पाळीच्या विकारांवर गुणकारी- पावटा

लग्नानंतर स्त्रियांचे वजन वाढण्याचा थेट संबंध लैंगिक संबंधांशी जोडला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ असे सांगतात की, लैंगिक संबंधांना सुरुवात झाल्यानंतर वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीराला असे वाटते की, आता त्याने गरोदरपणासाठी तयार व्हायला हवे. गरोदरपणात दोन जीव सांभाळावे लागतात. पहिला ज्या शरीरामध्ये नवीन अर्भक जन्माला येणार ते शरीर आणि अर्भक. या दोघांचेही पोषण महिलेवरच अवलंबून असते. त्याची तयारी म्हणून शरीरातील फॅटस् चे प्रमाण वाढत जाते. शिवाय बाळंत होत असतानाही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होते. अशा वेळेस लागणाऱ्या ऊर्जेसाठीही शरीरात फॅटस् ची साठवणूक सुरू होते. शारीरिक संबंधांमुळे मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यामुळे वजन वाढते. शिवाय अनेकवेळा फॅमिली प्लॅनिंगसाठी महिला गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करतात त्यामुळेही वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

हेही वाचा- ‘वर्क फ्रॉम होम’ची संधी शोधताय? घरबसल्या ‘या’ कामातून मिळवू शकता बक्कळ पैसे

वाढता तणाव –

लग्नानंतर अनेक स्त्रियांना नवीन वातावरणाशी जुळवून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लग्नापूर्वी ज्या स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी दररोज व्यायाम आणि जिम करतात शिवाय खाण्यापिण्याचीही योग्य काळजी घेतात त्यांचे लग्नानंतर विचार बदलतात. अनेक स्त्रिया लग्नानंतर इतर जबाबदाऱ्यांमुळे फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. शिवाय त्यांना नवीन जबाबदाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी खूप कसरत करावी लागते. या समस्यांमुळे जो तणाव निर्माण होतो त्यामुळेही महिलांच्या शरीरात बदल जाणवतो ज्यामुळे त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why women gain weight after marriage learn how sex affects weight jap