प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, ही म्हण आजपर्यंत आपण अनेकदा ऐकली आहे. मात्र, चक्क गूगल कंपनीच्या सीईओच्या यशामागे खरंच एका स्त्रीचा, म्हणजेच त्यांच्या पत्नीचा हात असल्याची माहिती DNA च्या एका लेखावरून समजते. सुंदर पिचाई ज्या उंचीवर पोहोचले आहेत, तिथे जाण्यासाठी त्यांच्या बायकोचा कोणता सल्ला महत्त्वाचा ठरला ते पाहा.

अंजली पिचाई ही जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या भारतीय सीईओ, सुंदर पिचाई यांची पत्नी आहे. सुंदर पिचाई हे गूगलच्या मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ या कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप हे तब्ब्ल २.०९ ट्रिलियन इतके आहे. मात्र, जगातील एवढ्या मोठ्या कंपनीचे सीईओ आणि जगात सर्वाधिक वेतन घेणारी व्यक्ती म्हणून जरी सुंदर पिचाई यांना लोक ओळखत असले, तरीही त्यांच्या या भरघोस यशामागे त्यांची पत्नी, अंजली यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

हेही वाचा : IIT, MIT मधून पदवी ते पीएचडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या आयआयटी मद्रासच्या पहिल्या महिला डायरेक्टर कोण? पाहा

सुंदर पिचाई यांचे वार्षिक वेतन हे १८०० कोटी रुपये इतके आहे. २०२२ मध्ये त्यांना १८६९ कोटी रुपयांचे वेतन पॅकेज देऊ केले होते. हे वेतन भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या पगारापेक्षादेखील अधिक आहे. म्हणजेच सुंदर पिचाई हे साधारण दिवसाला पाच कोटी रुपये कमावतात. मात्र, सध्या सुंदर यांचे गूगलमधील हे स्थान असण्याचे श्रेय ते आपल्या पत्नीला म्हणजेच अंजलीला देतात. सुंदर यांना ट्विटर आणि याहू यांसारख्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी चालून आली होती. मात्र, असे असताना अंजलीने सुंदर यांना गुगल कंपनीतच राहण्याचा सल्ला दिला होता.

जेव्हा सुंदर पिचाई अमेरिकेत राहण्यासाठी आले, तेव्हा काही काळ हे पिचाई जोडपे एकमेकांपासून दूर आणि कोणत्याही संपर्काशिवाय राहत होते. त्यावेळेस त्यांना एकमेकांना फोन करणेदेखील परवडत नसे. काही अहवालांच्या माहितीनुसार, तेव्हा सुंदर पिचाई यांना अनेक कंपन्यांनी आपल्यासोबत काम करण्यासाठी संधी देऊ केली होती. मात्र, सुंदर यांनी त्यांच्या पत्नी अंजलीने दिलेला सल्ला, म्हणजेच गूगल कंपनी न सोडण्याचा सल्ला ऐकून त्यावर ठाम राहिले. बायकोच्या याच सल्ल्याने आज सुंदर पिचाई अत्यंत यशस्वी असून, लवकरच अब्जाधीश बनणार आहेत.

हेही वाचा : कोण आहे टाटा अन् रिलायन्स कंपनीला टक्कर देऊ शकणारी जयंती चौहान? ‘या’ प्रसिद्ध कंपनीची आहे उपाध्यक्ष

सुंदर पिचाई गूगल कंपनीत रुजू झाल्यापासून, या कंपनीच्या शेअर्समध्ये ४०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आता AI च्या वाढत्या मागणीसह ही कंपनी दररोज नवनवीन उंची गाठत आहे. याच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत, सुंदर पिचाई लवकरच ‘अब्जाधीश’ होणार आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती ही एक बिलियन डॉलर्स म्हणजेच ७५०० कोटी रुपये [अंदाजे] इतकी आहे. खरंतर सुंदर पिचाई यांची ही कामगिरी अतिशय दुर्मीळ आणि कौतुकास्पद आहे. कारण, या जगात अगदी मोजके, ‘नॉन-फाऊंडर’ टेक एक्झिक्युटिव्ह अब्जाधीश आहेत आणि सुंदर पिचई त्यातील एक ठरणार आहेत.

अंजली पिचाई ही मुळची राजस्थानमधील कोटा येथे राहत असे. आयआयटी खरगपूरमध्ये केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेत असताना अंजलीची ओळख सुंदर पिचाई यांच्याशी झाली. आयआयटीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर अंजलीला एक्सेंच्युरेट [Accenture] या कंपनीत नोकरी मिळाली. तीन वर्षे या कंपनीत काम करून अंजली पुढे इंट्यूटमध्ये रुजू झाली. आता सध्या अंजली पिचाई ही याच इंट्यूट कंपनीत बिझनेस ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

Story img Loader