भारत सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी, अर्थसंकल्प २०२४ मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना विशेषत: मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. नुकतीच ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाली असून सुभद्रा योजना लवकरच सुरू होणार आहे.

यातील प्रत्येक योजना आणि त्यांचे फायदे पाहूया

Sharad Pawar
Sharad Pawar : “राज्यात ‘मविआ’चं सरकार आल्यास ३ लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार”, शरद पवारांचं मोठं आश्वासन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Indian origin Kamala Harris Rishi Sunak President Election
कौतुक कमला हॅरिसचं आणि..
Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांची पोस्ट चर्चेत! “माझी लाडकी बहीण ही फक्त योजना नसून, आपल्या बहिणींच्या…”
pune airport, bhopal, Bangkok, air flights
पुण्याहून हवाई प्रवास सुसाट…भोपाळपासून बँकॉकपर्यंत उड्डाण! पुणे विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक जाणून घ्या…
Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
Ajit pawar supporter, pimpri NCP MLA anna bansode, assembly session
दोन्ही बंडात साथ देणारा आमदार मंत्रिपद न मिळाल्याने अजितदादांवर नाराज; अधिवेशन सोडून परतले मतदारसंघात
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

‘माझी लाडकी बहीण योजना’

‘माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रातील महिलांसाठी जुलैमध्ये सुरू करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची सुरुवात झाली आहे.

या योजनेला पात्र कोण असणार?

  • सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे.
  • २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  • इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

  • ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी.
  • शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.

मोबाइलवरून कसा कराल अर्ज?

या योजनेसाठी सरकारने नागरिकांसाठी मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲप्लिकेशनला ‘नारी शक्ती दूत ॲप’ म्हणतात. ते ऊनलोड करून महिलांनी अर्ज भरायचा आहे.

सुभद्रा योजना

ओडिशा सरकारने सुभद्रा योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यामुळे ओडिशाच्या राज्य मंत्रिमंडळाने महिला सक्षमीकरण सुभद्राला मान्यता दिली आहे. ही योजना लवकरच सुरू होणार आहे.

भारतात सरकारने महिलांसाठी चार आर्थिक आणि गुंतवणूक योजना सुरू केल्या आहेत.

योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दोन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष १०,००० रुपये मिळतील. पाच वर्षांमध्ये, प्रत्येक पात्र महिलेला एकूण ५०,००० रुपये मिळतील.

हेही वाचा… फोन केला बंद अन् सोशल मीडिया केलं डिलीट; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या IAS परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

ही मदत थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि त्यांना सुभद्रा डेबिट कार्डदेखील मिळेल.

२१ ते ६० वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळेल. एका कुटुंबात दोन किंवा तीन पात्र महिला असल्यास सर्वांना याचा लाभ मिळेल. विधवा निवृत्ती वेतन आणि सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या महिलांसह सर्व पात्र महिलांना ही मदत मिळेल,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

पात्रता

अर्जदार महिला ओडिशाची रहिवासी तसेच २१ ते ६० वयोगटातील असावी. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, १ जुलै २०२४ ही अंतिम मुदत आहे. प्रशासनाकडून पुढील चार वर्षात तारीख निश्चित केली जाईल.

श्रीमंत कुटुंबातील महिला, सरकारी अधिकारी आणि आयकरदाते या योजनेसाठी पात्र नसतील. ज्या महिलांना दरमहा रु. १,५०० किंवा त्याहून अधिक किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून रु. १८,००० किंवा त्याहून अधिक मिळतात, त्या निकषांनुसार सुभद्रा योजनेसाठी अपात्र ठरतील.

फायदे

राखी पौर्णिमा आणि महिला दिन अशा दोन दिवशी प्रत्येक महिला लाभार्थ्याला ५००० रुपयांचा हप्ता मिळेल, असे दरवर्षी एकूण १०,००० रुपये मिळतील. पाच वर्षांमध्ये प्रत्येक पात्र महिलेला ५०,००० रुपये मिळतील.

प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक संस्थेमध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार असलेल्या १०० लाभार्थींना अतिरिक्त ५०० रुपयांचे इन्सेंटिव्ह मिळेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, २०२३ ही महिला लाभार्थींसाठी भारत सरकारची एक छोटी बचत योजना आहे. भारतातील महिलांमध्ये बचत करण्याची सवय व्हावी यासाठी ही योजना आखली गेली आहे.

हेही वाचा… संसाराची कसरत आणि स्वप्नांचा पाठलाग, IPS तनुश्रीने केलं लग्नानंतर स्वप्न साकार

अर्ज कसा कराल

  • बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज’ डाउनलोड करा अन्यथा बँकेला भेट द्या आणि फॉर्मची हार्ड कॉपी मागवा.
  • योग्य तपशिलांसह अर्ज भरा.
  • घोषणा आणि नामांकन तपशील भरा.
  • अर्ज, ठेवीची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे बँकेच्या एक्झिक्युटिव्हकडे सबमिट करा.

पात्रता

  • महिला लाभार्थी भारताची रहिवासी असावी – वयाचे बंधन नाही.
  • अल्पवयीन मुलीसाठी तिच्या वतीने तिच्या कायदेशीर पालकाकडून खाती उघडली जाऊ शकतात.
  • या योजनेवर वार्षिक ७.५% व्याजदर आहे.
  • व्याज त्रैमासिक चक्रवाढ आणि खात्यात जमा केले जाईल.
  • व्याज खाते बंद केल्यावर/बंद करण्यापूर्वी/ पैसे काढण्याच्या वेळी दिले जाईल.

मॅच्युरिटी

या योजनेतील ठेव, ठेवीच्या तारखेपासून दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजना

तुमच्या मुलीला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना अमलात आणली आहे.

पात्रता

  • १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी ही योजना असून पोस्टऑफिसमध्ये जाऊन हे खाते कायदेशीर पालकाद्वारे उघडले जाऊ शकते.
  • योजनेच्या नियमांतर्गत ठेवीदार मुलीच्या नावावर फक्त एकच खाते उघडू शकतो आणि चालवू शकतो.
  • मुलीच्या कायदेशीर पालकांना फक्त दोन मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी आहे.

फीचर्स

खातेदार एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि कमाल १५,००० रुपये गुंतवू शकतात. कोणत्याही आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा न केल्यास त्यांना ५० रुपये दंड आकारला जाईल. खाते उघडल्यापासून १४ वर्षांपर्यंत ठेवी (Deposite) ठेवता येतात. खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी मॅच्युअर होईल, परंतु खातेधारकाने २१ वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी विवाह केला असेल, तर ती तिच्या लग्नानंतर हे खाते वापरू शकणार नाही.

Story img Loader