अनेक व्यवसायिकांनी आयआयटी (IIT)आणि आयआयएम (IIM) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून पदवी घेतली आहे. या सस्थेंमधून शिक्षण घेणाऱ्या अनेकांपैकी एक म्हणजे विनीता सिंग, जिला भारतातील सर्वात समृद्ध व्यावसायिका महिला म्हणून ओळखले जाते. विनिता सिंग ही शुगर या सौंदर्यप्रसाधन कंपनीची संस्थापक आहे. ‘शार्क टँक इंडिया’ या टीव्ही मालिकेसाठी जज म्हणून निवड झाल्यानंतर या उद्योजिकेला चांगलीच प्रसिद्ध मिळाली. चक्क १ कोटी रुपयांची नोकरी नाकारून कोट्यवधींचा व्यवसाय उभारणाऱ्या उद्योजिका विनिता सिंग हिच्या प्रेरणादायी प्रवासाची ही गोष्ट आहे.
विनीता सिंगने दिल्ली पब्लिक स्कूल आणि राम कृष्ण पुराणात १९८७ ते २००१ पर्यंत शिक्षण घेतले. २००१ ते २००५ पर्यंत तिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. केले. त्यानंतर तिने मे २००४ मध्ये कोलकाता येथे आयटीसी लिमिटेडमध्ये तिची तीन महिन्यांची समर इंटर्नशिप पूर्ण केली.
२००५ मध्ये, तिने अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी प्राप्त केली. लंडन आणि न्यूयॉर्कमधील ड्यूश बँकेत तिची तीन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण झाली. तिच्या इंटर्नशिप दरम्यान, तिने लंडनमधील इमर्जिंग मार्केट्स स्ट्रक्चर्स डिव्हिजन आणि न्यूयॉर्कमधील स्ट्रॅटेजिक इक्विटी ट्रान्झॅक्शन युनिटमध्ये काम पूर्ण केले.
विनीता सिंगने SUGAR कॉस्मेटिक कंपनी उभारण्यापूर्वी तिचे दोन उपक्रम अयशस्वी ठरले होते. २०१५ मध्ये, तिने एक नवीन कंपनी लॉन्च करण्याचा विचार केला तेव्हा तिला मेकअप ब्रँडची कल्पना सुचली. त्या वेळी देशातील सौंदर्य प्रसाधने क्षेत्र तुलनेने मोठ्या ब्रँडसने व्यापले होते.
हेही वाचा – Women’s Day 2024 : मासिक पाळीबाबत महिला गूगलवर सर्च करतात हे प्रश्न; डॉक्टरांनी दिली उत्तरे
बाजारातील कॉस्मेटिक उद्योग महिलांच्या गरजा लक्षात घेण्यात अयशस्वी ठरली आहे असे तिचे ठाम मत होते. व्यवसाय उभारताना तिच्या सुरुवातीच्या ध्येयामध्ये श्रीमंत महिला, मॉडेल आणि अभिनेते होते. विनीता यांनी मार्केट रिसर्च केल्यानंतर “शुगर कॉस्मेटिक्स” ही कॉस्मेटिक्स कंपनी स्थापन केली. प्रथम शुगर कॉस्मेटिक्सने आपली उत्पादने केवळ ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये तिने उत्तर प्रदेशमध्ये शुगर कॉस्मेटिकचे पहिले दुकान सुरु केले.
हेही वाचा – चुलीनेच दिली ओळख! जेवण बनवून लोकांची प्रेरणा बनलेल्या ‘या’ मराठमोळ्या अन्नपूर्णा! कसा होता त्यांचा प्रवास
जेव्हा ती मुंबईत पहिल्यांदा राहायाल आली तेव्हा ती छोट्याश्या खोलीत राहात होती आणि पावसाळ्यात तिला वारंवार पुरस्थितीचा सामना करावा लागत होता. पण आज ती आता पवईतील एका आलिशान घरात राहते. कौशिक मुखर्जी हा विनीता सिंगचा पती आहे. एमबीए करत असताना, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले. तिचा नवरा कौशिक शुगर कॉस्मेटिक्सचा सीओओ आणि सह-संस्थापक आहेत. या जोडप्याची दोन मुले देखील आहेत.
विनिताचा हा प्रवास देशातील अनेक महिलांना आणि नवोउद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा देतो.